अभियोग्यता चाचणीच्या राखीव निकालासाठी उमेदवारांना माहिती भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत !! – Maha TAIT Result 2025
MSCE Maha TAIT Result, Selection List, Cut Off, Answer Key
MAHA TAIT Result Update
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नुकताच अभियोग्यता व बुध्दिमापन चाचणीचा निकाल जाहीर केला आहे. मात्र, या निकालात तब्बल ३ हजार १८७ उमेदवारांचा निकाल तात्पुरता राखीव ठेवण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनी १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आवश्यक माहिती व कागदपत्रे www.mscepune.in या संकेतस्थळावरील लिंकवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
परीक्षा परिषदेने दिलेल्या सूचनांनुसार, बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या ६ हजार ३२० उमेदवारांपैकी निकाल राखीव असलेल्या उमेदवारांनी अंतिम वर्षास प्रविष्ट किंवा उत्तीर्ण असल्यास त्याची माहिती व निकालाची प्रत सादर करावी लागणार आहे. निर्दिष्ट मुदतीनंतर माहिती न दिल्यास अशा उमेदवारांच्या निकालाचा विचार केला जाणार नाही, असा इशारा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MAHA TAIT Result Date 2025
२०२५ या कालावधीत शिक्षक राज्यामध्ये मे आणि जून अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आल्या होत्या.या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल आज सोमवार दि. १८/०८/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. राज्यात २७ मे ते ३० मे आणि २ जून ते ५ जून या कालावधीत एकूण २६ जिल्ह्यांमध्ये ६० परीक्षा केंद्रांवर ही चाचणी घेण्यात आली होती. परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेला बसले. उमेदवार खाली दिलेल्या लिंक ने आपला निकाल तपासू शकता…या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
Click Here To Download PDF of Maharashtra TAIT Result 2025
How to check Maha TAIT Result 2025?
- Step 1: Go to the official website of the Maharashtra State Council of Examination at www.mscepune.in
- Step 2: Look for the link to the TAIT Result 2025 on the homepage and click on it.
- Step 3: Enter your roll number and other required details in the given fields.
- Step 4: Verify the details entered and click on the submit button.
- Step 5: The TAIT Result 2025 will be displayed on the screen, and you can download it for future reference.
Click Here To Download Maharashtra TAIT Result 2025
‘व्यावसायिक परीक्षांच्या निकालाबाबतची माहिती एकत्रित करण्यास वेळ लागत असल्याने शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा (टेट) निकाल जाहीर होण्यास विलंब होत होता. राज्य परीक्षा परिषदेने ‘आयबीपीएस’ मार्फत २७ ते ३० मे आणि २ ते ६ जून २०२५ दरम्यान राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ६० परीक्षा केंद्रांवर ही चाचणी तीन सत्रांमध्ये घेतली होती. नोंदणी केलेल्या दोन लाख २८,८०८ उमेदवारांपैकी दोन लाख ११,३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र, दोन महिने उलटूनही निकाल जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर MSCE यांनी प्रसिद्धीपत्रक प्रकाशित केले आहे. आता सर्व उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी व्यावसायिक अर्हतेचे (बी.एड., डी.एल.एड.) गुणपत्रक किंवा वैध प्रमाणपत्र संबंधित परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कमाल एका महिन्यात परिषदेकडे सादर करणे आवश्यक होते. मात्र, विविध संस्थांकडून व्यावसायिक परीक्षांचे निकाल वेगवेगळ्या वेळी लागल्याने ‘टेट २०२५’चा निकाल देण्यासाठी लागणारी माहिती एकत्र करण्यास वेळ लागला. ‘डीएलएड’चा निकाल पाच ऑगस्ट रोजी जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवारांच्या माहितीच्या आधारे टेट निकालाची अंतिम कार्यवाही सुरू आहे. हा निकाल लवकरच परिषदेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उमेदवारांनी परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणारी माहितीच तपासावी; अन्यथा नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असतील, असा इशाराही परिषदेने दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण २०२५/प्र.क्र.९२/टिएनटी-१. दि.२८/०२/२०२५ व मा. आयुक्त (शिक्षण), यांचे जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/टेट-३/वेप/२०२५/११९१. दि. १९/०३/२०२५ राजीच्या पत्रान्वये तसेच सदर परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का. १३-अ, दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ नुसार शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५” चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक २७/०५/२०२५ ते ३०/०५/२०२५ व दिनांक ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्हांमध्ये एकूण ६० परीक्षा केंद्रांवर ८ दिवसामध्ये प्रतिदिन तीन सत्रात करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण २२८८०८ परीक्षार्थी / उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेस एकूण २११३०८ उमेदवार प्रविष्ठ झाले होते.
शासन शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टिएनटि-१, दिनांक ०२/०५/२०२५ अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा (बी.एड./ डी.एल.एड.) उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते. वरील व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने शासन शुध्दीपत्रक दिनांक ०२/०५/२०२५ च्या अनुषंगाने TAIT – २०२५ परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे. तसेच दि. ०५/०८/२०२५ रोजी डी.एल.एड. निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे. वरील परीक्षेत पात्र उमेद्वारांच्या निकालाच्या अनुषंगाने “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५” च्या निकालाची कार्यवाही सुरु आहे व हा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी/परीक्षार्थ्यांनी युट्युब चॅनेल्स व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म द्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या/अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार / विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी.
‘टेट २०२५’ च्या (शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी) परीक्षेला दोन महिने उलटले असून, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही महिना झाला आहे. पण अद्याप निकाल लागलेला नाही. परिणामी, हजारो परीक्षार्थी संभ्रमात आणि संतप्त अवस्थेत आहेत. नवीन शिक्षक मिळणार कधी? शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार तरी केव्हा? असे प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. राज्यात २०१७, २०२२-२३ नंतर २०२५ मध्ये मे ते जून महिन्यामध्ये तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा महाराष्ट्र परीक्षा परिषदेने घेतली. परीक्षा घाईघाईने घेतली, त्यात आता परीक्षेचा निकाल लावण्यास विलंब होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २४ मे ते ६ जून दरम्यान टेट-३ परीक्षा आयोजित केली. परीक्षा घेताना घाई, निकाल लावताना दिरंगाई – ही दुटप्पी भूमिका भावी शिक्षकांच्या माथी मारली जात आहे. निकालात विलंब का? पेपरफुटीचा संशय? निकालाला होत असलेला विलंब म्हणजे गैरप्रकार झाकण्याचा प्रयत्न आहे का? असा संशय परीक्षार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे. शाळा सुरू होऊन एक महिना झाला असूनही हजारो विद्यार्थ्यांना शिक्षकच नाहीत. टेट निकालाशिवाय शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार नाही. या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता-बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या निकालासंदर्भातील प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरून सुरू आहे. येत्या आठवडाभरात निकाल जाहीर होईल अशी माहिती अनुराधा ओक, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दिली. तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता-बुद्धिमत्ता चाचणी (टेट- टीचर अॅप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट) परीक्षेला दोन महिने उलटूनही अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. ४५ दिवसांत निकाल लागणे अपेक्षित असते. परीक्षा केवळ २० दिवसांत जाहीर करून घेण्यात आली. मात्र, निकाल एवढा का लांबला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यात शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २४ मे ते ६ जून २०२५ या दरम्यान तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. राज्यात या परीक्षेसाठी दोन लाख ३६ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
साधारणपणे दहा दिवस ही परीक्षा चालली. त्यानुसार राज्यभर विविध जिल्हास्तरावर केंद्रे निश्चित करण्यात आली होती. निकालाकडे उमेदवार डोळे लावून असून, त्याअभावी भविष्यातील दिशा, मार्गही त्यांना ठरवता येत नाही. या संदर्भाने राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडे निवेदनही पाठवण्यात आले आहे. उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे युवा विद्यार्थी असोसिएशनचे तुषार देशमुख यांनी सांगितले.
या भरतीसाठी लागलेला १० वर्षांचा विलंब, डीएलएडची पदवी प्राप्त केल्यावरही पुन्हा पात्रतेसाठी महाराष्ट्रात केवळ २ परीक्षा होतात. या परिस्थितीतही नोकरीच्या आशेवर असणाऱ्या लाखो उमेदवारांनी ३ वर्षांनंतर झालेली ‘टीएआयटी’ दिली. याला २ महिने उलटले आहेत. तरीही निकाल जाहीर झालेला नाही. यामुळे पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासह भरती होईपर्यंत शाळा उघडल्यावर मिळणाऱ्या खासगी नोकरीतील संधीवर परिणाम होत असल्याने उमेदवारांमध्ये चिंता आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून डीएलएड, बीएड झालेल्या उमेदवारांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) घेण्यात येते. शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणीकरिता ही चाचणी पात्र होणे आवश्यक आहे. गेल्या ३ वर्षांत ही चाचणी झाली नव्हती. ती यंदा २४ मे ते ५ जून यादरम्यान घेण्यात आली. पारदर्शकतसाठी यंदा ही चाचणी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. राज्यातून ३ लाख ६८ हजार आणि छत्रपती संभाजीनगरमधून १७ हजार उमेदवारांनी ही चाचणी दिली आहे. दरम्यान, परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडे निकालासंदर्भात विचारणा केली असता, काही तांत्रिक अडचणी होत्या, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार आहे, अशी माहिती त्यांनी दिल्याचे उमेदवारांनी सांगितले.
शिक्षक भरतीची आशा
पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या शिक्षक पदाच्या पात्रतेसाठी या चाचणीतूनच निवड केली जाते. शिक्षक भरती प्रक्रिया गेली काही वर्षे बंद होती. परंतु, यंदा शालेय शिक्षणमंत्र्यांनी भरती होणार असल्याचे जाहीर केले. पहिल्या टप्यात ५ हजार जागा भरण्यात आल्या. त्यानंतर उर्वरित रिक्त जागांची माहिती घेऊन भरती होणार असल्याने पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी टीएआयटी पात्र होणे उमेदवारांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या चाचणीकडे होते.
तात्पुरत्या नोकरीवरही परिणाम
यंदा ३ वर्षांनंतर टीएआयटी झाली. मे महिन्यात परीक्षा झाल्यावर जूनपर्यंत निकालाची अपेक्षा अनेकांना होती. कारण यात पात्र ठरलेल्यांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करता आली असती. शिवाय शाळा सुरू होत असल्याने भरती प्रक्रिया होईपर्यंत एखाद्या शाळेत तात्पुरती नोकरी करता आली असती. परंतु तसे झाले नाही. निकाल अजूनहीन लागल्याने त्यांच्या नोकरीवर याचा परिणाम झाला आहे. – डॉ. संदीप धिरडे, प्राचार्य, छत्रपती शाहू महाविद्यालय भरतीसाठी लागली १० वर्षे एनईपीनुसार नवीन बदल डीएलएड अभ्यासक्रमात केले आहे. त्यामुळे गुणवत्ताधारक शिक्षक मिळतील. मात्र, डीएलएड करण्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही. कारण भरतीसाठी १० वर्षे लागली. बरीच महाविद्यालये बंद झाली आहेत. भरतीची प्रक्रिया अधिक किचकट झाल्याने प्रतिसाद नाही. त्यात ३ वर्षांनंतर झालेल्या चाचणी झाली. त्याला २ महिने उलटूनही तरी निकाल लागलेला नाही. प्रशांत शिंदे, राज्य सचिव, डीएलएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशन
The Teacher Aptitude and Intelligence Test (MAHA TAIT 2025 Exam Result Date) examination conducted by the Maharashtra State Examination Council was recently held. Out of the 2 lakh 28 thousand 880 candidates who registered for this examination, 2 lakh 11 thousand 308 candidates appeared for the examination as per the scheduled schedule. Now there is curiosity about when the results of this examination will be declared. According to sources in the examination council, the results of the TET examination are planned to be declared their Result by the last week of June or the first week of July. Very Soon you will able to Download the Score Card / Result of TAIT Exam 2025 from given link.
पुणे : महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ परीक्षेचा निकाल तयार असूनही, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निकाल राखून ठेवला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन होते. मात्र, शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मध्ये डीएड, बीएड उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी अंतिम वर्षाचे गुणपत्रक संबंधित संकेतस्थळावर अपलोड करणे बाकी आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अंतिम वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे. बीएड आणि डीएडच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली होती. त्यांचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक संकेतस्थळावर अपलोड केल्याशिवाय निकाल जाहीर करण्यात येणार नाही, असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे बीएड आणि डीएड उत्तीर्ण उमेदवारांनाwww.mscepune.in/dte dola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकवर आपले गुणपत्रक विहित नमुन्यात प्रसिद्ध करावे लागणार आहे.
मित्रांनो, प्राप्त माहिती नुसार, महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ परीक्षेचा निकाल तयार असूनही, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे समजते. परंतु, जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन असेलला हा निकाल सध्या अडकला आहे . तसेच, शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मध्ये डीएड, बीएड उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी अंतिम वर्षाचे गुणपत्रक संबंधित संकेतस्थळावर अपलोड करणे बाकी आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अंतिम वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बीएड आणि डीएडच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली होती. त्यांचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक संकेतस्थळावर अपलोड केल्याशिवाय निकाल जाहीर करण्यात येणार नाही, असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे बीएड आणि डीएड उत्तीर्ण उमेदवारांनाwww.mscepune.in/dte dola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकवर आपले गुणपत्रक विहित नमुन्यात प्रसिद्ध करावे लागणार आहे.
How to check Maha TAIT Result 2025?
- Step 1: Go to the official website of the Maharashtra State Council of Examination at www.mscepune.in
- Step 2: Look for the link to the TAIT Result 2025 on the homepage and click on it.
- Step 3: Enter your roll number and other required details in the given fields.
- Step 4: Verify the details entered and click on the submit button.
- Step 5: The TAIT Result 2025 will be displayed on the screen, and you can download it for future reference
Maharashtra TAIT Result Date
Organization Name | Maharashtra State Council Of Examination |
Exam Name | Teacher Aptitutde & Intelligence Test-2025 |
Exam Date | |
Result Date | |
Result Link | Available Here MAHA TAIT Result Date in Last Week of June 2025 |
Table of Contents