WCD Document Joining Letters 2025
परीक्षेची त्यांनी खूप तयारी केली, परीक्षाही झाली, पण एका घटनेने परीक्षेचा पेपर लीक झाल्याची शंका निर्माण होऊन परीक्षाच रद्द करण्यात आली आणि पुन्हा परीक्षा घेण्यात आली. ज्यांची निवड झाली अशा ६०१ अधिकाऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार असून, त्यांना १३ फेब्रुवारीला नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. ही कथा आहे, मृद व जलसंधारण विभागाची. राज्य सरकारी सेवेत ७५ हजार पदे भरण्याचा संकल्प महायुती सरकारने सोडलेला होता. त्याचाच एक भाग म्हणून या विभागातील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) यांची ६७० पदे भरण्यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे ठरले. त्यानुसार पदभरतीची प्रक्रिया राबविण्याचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) देण्यात आले होते. २८ जिल्ह्यांमधील ६६ केंद्रांवर २० फेब्रुवारी आणि २१ फेब्रुवारी २०२४ रोजी लेखी परीक्षा घेतली. ५२,६९० उमेदवारांनी अर्ज केले होते. अमरावती येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीच्या प्रवेशपत्राच्या झेरॉक्स प्रतिवर उत्तरेसदृश माहिती आढळून आली. त्यावर नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता. त्यात काहीही निष्पन्न झाले नाही, मात्र परीक्षा रद्द करण्यात आली.
१९ जून २०२४ रोजी मंत्रालयात बैठक झाली आणि परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी दिले. त्यानुसार मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या सात शहरांतील टीसीएस-आयओएन या ११ अधिकृत केंद्रावर १४, १५ आणि १६ जुलै रोजी फेरपरीक्षा झाली. टीसीएसकडून २५ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. निवड झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारंभपूर्वक देण्यात येणार आहेत. ६७० जणांची निवड करण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली. प्रत्यक्षात ६६६ जणांची निवड केली गेली. त्यातील ज्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा ६०१ जणांना नियुक्तीपत्रे दिली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) पदासाठी दि. 14 ते 16 जुलै, 2024 या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षा मे. टाटा कन्सलटन्सी सर्विसेस लिमीटेड कंपनीद्वारे घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल व उमेदवाराची निवड यादी मृद व जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. निवड यादीतील उमेदवारांना जल व भुमी व्यवस्थापन संस्था, वाल्मी परीसर, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 16/10/2024 ते दिनांक 19/10/2024 रोजी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत वेळापत्रकानुसार कागदपत्रे तपासणीसाठी वेळेत उपस्थित राहण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या, उपरोक्त कालावधीमध्ये सोबतच्या यादीतील उमेदवार कागदपत्रे पडताळणी / तपासणीस अनुपस्थित होते. यादीतील अनुपस्थित उमेदवारांना या जाहीर सुचनेव्दारे सुचित करण्यात येते की, आपण कागदपत्रे पडताळणी / तपासणी साठी दिनांक 25/10/2024 रोजी सकाळी 10.00 ते दुपार 2.00 वाजेपर्यंत आयुक्तालय, मृद व जलसंधारण विभाग (म.रा.), जल व भुमी व्यवस्थापन संस्था, वाल्मी परीसर, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली तपासणीसूची भरुन त्यांचे संबधित मूळ कागदपत्रांच्या सांक्षाकित दोन प्रतीसह रहावयाचे आहे. सदर पडताळणीस गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्रांची पूर्तता न केल्यास उमेदवारांस कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही, तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही व जलसंधारण अधिकारी, गट-व (अराजपत्रित) पदासाठी आपला विचार करण्यात येणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mruda Jalsandharan Vibhag Result: मृद व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या पदासाठीची ऑनलाइन परीक्षा दिनांक १४/०७/२०२४, दिनांक १५/०७/२०२४ व दिनांक १६/०७/२०२४ रोजी संपन्न झालेली आहे. उमेदवारांची Markwise Revised Merit List शासनाच्या http://swcd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २९/०९/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांची (List of Candidates of Document Verification) यादी सोबतच्या प्रपत्रामध्ये शासनाच्या http://swcd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर प्रपत्रामधील नमुद उमेदवारांना गुणवत्ता व नमुद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर केवळ कागदपत्रे तपासणी कामी बोलविण्यात येत आहे. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी / तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदांनुसार अंतीम निवडसुची तयार करण्यात येईल. याबाबत अंतीम निर्णय घेण्याचे अधिकार राज्य निवड समितीस राहतील.
उमेदवारांची नियुक्तीच्या वेळी मुळ कागदपत्रे (वय, अधिवास, शैक्षणिक पात्रता, महिला आरक्षणानुसार विहीत केलेले प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र इ.) तपासुन रुजु करुन घेण्यात येईल.
सदर प्रपत्रामधील नमुद उमेदवारांनी जल व भुमी व्यवस्थपन संस्था, वाल्मी परीसर, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक: १६/१०/२०२४, ते दिनांक : १९/१०/२०२४ रोजी खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार वेळेत उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी.

Download SWCD Document Verification Schedule 2024
मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) पदासाठी दि. 14 ते 16 जुलै, 2024 या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षा मे. टाटा कन्सलटन्सी सर्विसेस लिमीटेड कंपनीद्वारे घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल मृद व जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळावर दि. 19 सप्टेंबर, 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर परीक्षेच्या जाहिराती मध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रीकेचे मुल्यांकन करतांना (नकारात्मक गुणपध्दत) अवलंबण्यात येईल व प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता २५ टक्के किंवा ¼ एवढे गुण, एकुण गुणांमधुन वजा कमी करण्यात येतील असे नमुद आहे. प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण देण्यात आले आहेत, त्यानुसार चुकीच्या उत्तरासाठी 25 टक्के किंवा % म्हणजे 0.50 गुण कमी करणे आवश्यक होते. मात्र, चुकीच्या उत्तरा करिता 0.25 गुण कमी केल्यामुळे सदर निकालात गणकीय त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. सबब, जाहिराती प्रमाणे निकालामध्ये सुधारणा करुन प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता 25% किंवा ¼ एवढे गुण, एकुण गुणांमधुन वजा / कमी करण्यात येवून सुधारीत निकाल तयार करण्यात येत आहे. त्यानुसार, सुधारीत निकाल लवकरच संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याची सर्व संबंधित उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी. या संदर्भातील एक परिपत्रक विभागाद्वारे अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केले आहे, आपण खाली बघू शकता. तसेच नवीन सुधारीत निकाल आम्ही लवकरच महाभारतीवर प्रकाशित करू.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















