मृद व जलसंधारण विभाग निकाल जाहीर, सुधारित निकालाबद्दल नवीन परिपत्रक जाहीर! – Mruda Jalsandharan Vibhag Result

mruda jalsandharan vibhag result

मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) पदासाठी दि. 14 ते 16 जुलै, 2024 या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षा मे. टाटा कन्सलटन्सी सर्विसेस लिमीटेड कंपनीद्वारे घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल मृद व जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळावर दि. 19 सप्टेंबर, 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर परीक्षेच्या जाहिराती मध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रीकेचे मुल्यांकन करतांना (नकारात्मक गुणपध्दत) अवलंबण्यात येईल व प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता २५ टक्के किंवा ¼ एवढे गुण, एकुण गुणांमधुन वजा कमी करण्यात येतील असे नमुद आहे. प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण देण्यात आले आहेत, त्यानुसार चुकीच्या उत्तरासाठी 25 टक्के किंवा % म्हणजे 0.50 गुण कमी करणे आवश्यक होते. मात्र, चुकीच्या उत्तरा करिता 0.25 गुण कमी केल्यामुळे सदर निकालात गणकीय त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. सबब, जाहिराती प्रमाणे निकालामध्ये सुधारणा करुन प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता 25% किंवा ¼ एवढे गुण, एकुण गुणांमधुन वजा / कमी करण्यात येवून सुधारीत निकाल तयार करण्यात येत आहे. त्यानुसार, सुधारीत निकाल लवकरच संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याची सर्व संबंधित उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी. या संदर्भातील एक परिपत्रक विभागाद्वारे अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केले आहे, आपण खाली बघू शकता. तसेच नवीन सुधारीत निकाल आम्ही लवकरच महाभारतीवर प्रकाशित करू.

 

Screenshot

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड