Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 – प्रवेशपत्र डाउनलोड करा; महत्त्वाच्या सूचना जाहीर | MPSC Technical Services Admit Card 2022

MPSC Technical Services Admit Card

MPSC Technical Services Admit Card 2022

MPSC Technical Services Admit Card : Maharashtra Gazetted Technical Services Combined Preliminary Examination 2022 – Instructions to Candidates. Maharashtra Gazetted Technical Services Combined Preliminary Examination 2022 – List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time.

आयोगामार्फत दिनांक 17 डिसेंबर, 2022 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करिता लेखनिक आणि अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

(२) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.

(३) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे.

(४) परीक्षा कक्षात मोबाईल दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही. (५) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही.

(६) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थांचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल.

(७) पडताळणी/ तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी / तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांका व्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून उमेदवारी रद्द करण्यासह आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार उचित कारवाई करण्यात येईल.

(८) परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.

(९) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

(१०) कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये उमेदवाराने स्वतःचा मुखपट (Mask) परिधान करणे तसेच स्वच्छता (Cleanliness) व आरोग्यास हितावह ( Hygienic) वातावरण राखण्यासाठी उमेदवारांनी स्वतः चे सॅनिटायझर वापरणे हिताचे राहील.

(११) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नांव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक, इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद
करावा.

(१२) परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधनाची कारवाई केली जाईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

Important Instructions
List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time

MPSC Technical Services Admit Card 2022

MPSC Technical Services Admit Card : Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Maharashtra Gazetted Technical Services Joint Prelims Exam 2022 hall ticket. The exam will be held on 17th December 2022. Click on the below link to download the admit card.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 17 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC Technical Services Hall Ticket 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक १७ डिसेंबर, २०२२ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

MPSC Technical Services Hall Ticket 2022

Category Admit Card
Exam Organization Maharashtra Public Service Commission (MPSC)
Exam Name Maharashtra Gazette Technical Service Exam 2022
Article Name MPSC Technical Services Hall Ticket 2022
Exam Date 17 December 2022
Hall Ticket Link Active
Official Website of MPSC www.mpsc.gov.in
  • परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  • परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
  • कोव्हिड – १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
  • आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व / अथवा १८०० -१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

How to download MPSC Technical Services Admit Card 2022?

  • प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी वर नमूद केलेल्या थेट Link वर क्लिक करा.
  • स्वतःचा ई-मेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक व Password प्रविष्ठ करा.
  • त्यात तुम्हाला My Account वर क्लिक करा.
  • MPSC Technical Services 2022 वर क्लिक करा. तिथे MPSC Technical Services Admit Card 2022 चा Option ओपन होईल
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा.
प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3B1ulnh

MPSC Technical Services Hall Ticket 2022: Important Dates

Events Dates
MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 अधिसूचनेची तारीख 30 September 2022
MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु होण्याची तारीख 03 October 2022
MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 October 2022
MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022 प्रवेशपत्राची तारीख 09 December 2022
MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 परीक्षेची तारीख 17 December 2022
MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022 निकालाची तारीख

January 2022

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा अधिसूचना

January 2022

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा तारीख 18 March 2023
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा तारीख 25 March 2023
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा तारीख 02 April 2023
महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा तारीख 09 April 2023
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा तारीख 16 April 2023
महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा तारीख 23 April 2023

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड