नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘MPSC’ परीक्षा पुढे ढकलल्या

MPSC Revised Dates of Exams


MPSC Revised Dates of Exams : महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भातील पुढील नवीन तारखांचा अपडेट आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच.

As Per latest New MPSC Duyyam Seva & Engineering Services Examination are now Postponed. This Examinations was Schedules in November 2020 but now it is Postponed.

परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे.

MPSC Exam Postponed

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) ११ ऑक्टोबर रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन तात्पुरता प्रश्न सोडवला. त्यानंंतर आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आणखी दोन परीक्षा रद्द केल्याचे एमपीएससीने मंगळवारी जाहीर केले. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवेची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलली होती. त्यानंतर मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यापासून ११ ऑक्टोबरची राज्य सेवा परीक्षेचे काय होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात असताना ही परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता १ नोव्हेंबरची अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरची दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षाही एमपीएससीने पुढे ढकलली. तब्बल ४ लाख ४० हजार विद्यार्थी या दोन्ही परीक्षा देणार आहेत. वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पाडण्यासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहचली असताना एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावात असून परीक्षा होणार तरी कधी, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांकडून उपस्थित केला जात आहे.


10 October News : मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून एमपीएससी परीक्षा अखेर पुढे ढकलली आहे. राज्यात 200 पेक्षी अधिक ठिकाणी परीक्षा होणार होत्या. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सरासर विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रचं राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातचं राज्यात रविवारी एमपीएससी परीक्षा होणार होत्या.

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले असून MPSC पुढे ढकलण्यात आली आहे.


मागील अपडेट : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आलेल्या. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC Revised Dates of Exams

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MPSC Revised Dates of Exams
जाहिरात : https://bit.ly/2F5oTJd

मागील अपडेट – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा – २०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केलेल्या आहेत. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.

Exams Dates 

MPSC Revised Exam Dates

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MPSC Revised Dates
जाहिरात : https://bit.ly/2UNmdoc

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

1 Comment
  1. Laxmi kashte says

    Vanvibhag bharti

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड