MPSC चा महत्वपूर्ण निर्णय – गट-अ ते गट-क संवार्गांची भरती आता दोनच संयुक्त परीक्षांद्वारे!! MPSC Recruitment 2022

MPSC Recruitment 2022

MPSC Recruitment 2022 – New Update

MPSC Recruitment 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) राबवल्या जाणाऱ्या पदभरती परीक्षांमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात राजपत्रित आणि अराजपत्रित पदांसाठीच्या परीक्षा कमी करून दोनच संयुक्त पूर्व परीक्षा घेतल्या जाणार असून, या निर्णयाची अंमलबजावणी २०२३ पासून करण्यात येणार आहे. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे सोमवारी ही माहिती दिली. आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत परीक्षांची संख्या वाढलेली आहे.त्याचा परिणाम प्रशासकीय यंत्रणेवर पडत असल्याने भरती प्रक्रियेस विलंब होत आहे. तसेच गुणवत्ता राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागत आहे. त्या संदर्भात उपाययोजना करण्याच्या उद्देशाने आणि भविष्यातील भरती प्रक्रियेच्या नियोजनाचा विचार करून विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

‘पीएसआय’साठी ७० गुण

अर्हताकारी पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीसाठी शारीरिक चाचणी ७० गुणांची अर्हताकारी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या पूर्वी ही चाचणी साठ गुणांसाठी अर्हताकारी होती. अतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदंडाधिकारी प्रथम संवर्गाच्या भरती प्रक्रियेमध्ये कोणताही बदल नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

प्रस्तावित परीक्षा पद्धतीमुळे उमेदवारांना योग्य दिशा मिळून आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच वर्णनात्मक पद्धतीच्या अवलंबामुळे केंद्रीय स्तरावरील परीक्षांच्या तयारीसाठीही उमेदवारांना फायदा होईल. या पूर्वीही आयोगाने देशात पहिल्यांदाच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याच धर्तीवर विद्यमान आयोगानेही अराजपत्रित आणि राजपत्रित पदांच्या परीक्षांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे परीक्षांची गुणवत्ता राखली जाण्यास मदत होईल.

-सुनील अवताडे, सहसचिव, एमपीएससी

राजपत्रित गट अ आणि गट ब या संवर्गासाठी आणि अराजपत्रित गटब, गट क या संवर्गासाठी दोन स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्यासह परीक्षा योजनेमध्येही बदल करण्यात आला. त्यात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या सर्व राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गांच्या निवड प्रक्रियेत आता वर्णनात्मक स्वरुपाची मुख्य परीक्षा असेल, असे नमूद करण्यात आले. राजपत्रित संयुक्त परीक्षा आणि अराजपत्रित संयुक्त परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठी उमेदवारांकडून अर्ज घेताना जाहिरातीतील सर्व संवर्गासाठी पात्रतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेतला जाईल. संबंधित संवर्गासाठी उमेदवाराने दिलेला विकल्प संबंधित संवर्गातील पदभरतीसाठीचा अर्ज समजला जाईल. तसेच भरल्या जाणाऱ्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेतून भरल्या जाणाऱ्या विविध संवर्गाची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, वेतनश्रेणी, दर्जा आदी बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गटब मुख्य परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा या नावाने स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातील.या दोन्ही परीक्षांसाठी मराठी आणि इंग्रजी,सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी या दोन पेपरच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. मुख्य परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या विविध संवर्गासाठी उमेदवारांकडून मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच पात्रतेवर आधारित पसंतीक्रम घेतला जाईल.
MPSC Recruitment 2022


MPSC अंतर्गत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारणा!! MPSC Recruitment 2022

MPSC Recruitment 2022 : The latest update for MPSC Examination 2022. For all gazetted Group-A and Group-B cadres to be filled through the competitive examination, the selection process will henceforth be conducted on the basis of the main examination of traditional/descriptive format. Check here more details about MPSC Exam 2022. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरतीप्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुषंगिक बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पध्दतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याचा आयोगाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

MPSC Examination 2022

(१) स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गाकरीता यापुढे पारंपारिक/वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.

(२) राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील पदभरतीकरीता ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयक्त पूर्व परीक्षा’ (Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.

(३) स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गाकरीता यापुढे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल..

(४) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरीता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरीता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित संवर्गातील पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल/येतील व त्याच्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन प्रत्येक संवर्गाकरीता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.

(५) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी (उदा. राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषि सेवा मुख्य परीक्षा इत्यादी) निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

(६) सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (Maharashtra Non-Gazetted Services Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तसेच, सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

(७) महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरीता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरीता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित संवर्गातील पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल/येतील व त्याच्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन प्रत्येक संवर्गाकरीता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.

(८) महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या/वेतनश्रेणी, दर्जा, इत्यादी बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा’ तसेच ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा’ या नावाने स्वतंत्र परीक्षा आयोजित करण्यात येतील.

(९) महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा’ या मुख्य परीक्षांच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येतील.

(१०) महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा करीता ‘मराठी व इंग्रजी’ तसेच ‘सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी अशा दोन पेपर्सच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.

(११) महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गाकरीता उमेदवारांकडून मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच अर्हतेवर आधारित पसंतीक्रम घेण्यात येईल.

(१२) मुख्य परीक्षेकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराकडून भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) घेण्यात येईल व त्याच्या आधारे संबंधित संवर्गाकरीता निवडप्रक्रिया राबविण्यात येईल.

(१३) पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीकरीता शारीरिक चाचणी ७० गुणांची अर्हताकारी असेल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येईल.

(१४) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गाच्या विद्यमान भरतीप्रक्रियेमध्ये कोणताही बदल नाही. २. उपरोक्त बदल सन २०२३ करीता आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येतील. ३. प्रस्तुत बदलांच्या अनुषंगाने संबंधित परीक्षांची परीक्षा योजना, अर्ज स्वीकारण्याची पध्दत, अर्हता, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, अभ्यासक्रम इत्यादीबाबतचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.

PDF जाहिराती – https://bit.ly/3cWpOfs


MPSC Exam – राज्यसेवा आयोग परीक्षा नवीन अपडेट!!

MPSC Recruitment 2022: As per the latest news, Maharashtra Public Service Commission has decided to install CCTV in the examination center. MPSC exam will help to avoid these malpractices. For more details about MPSC Exam 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

परीक्षेत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आयोगाकडून ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. यामूळे एमपीएससी परीक्षा या गैरप्रकार विरहीत होण्यास मदत होणार आहे.

विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा    

MPSC नवीन टेस्ट सिरीज 

मेगा भरती आणि MPSC 2022-23 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच 

 • आयोगाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत सांगण्यात आले आहे की, पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 मध्ये उमेदवारांकडून होऊ शकणारे संभाव्य गैरप्रकार विचारात घेऊन आयोगाकडून सीसीटिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे.
 • याव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेनंतर परीक्षेदरम्यानच्या चित्रीकरणाआधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या तसेच परीक्षेकरीता नियुक्त कर्मचारी व आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.
 • प्रस्तुत परीक्षेनंतर परीक्षेदरम्यानच्या चित्रीकरणाआधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या तसेच परीक्षेकरीता नियुक्त कर्मचारी व आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे देखील आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे आता एमपीएससी परीक्षेत होणाऱ्या कोणत्याही गैरप्रकारास आळा बसणार आहे.

Other Related Links:

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 भरती जाहिरात प्रकाशित; 228 पदे

MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-2021 प्रथम उत्तरतालिका जाहीर

MPSC तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा भरती जाहिरत प्रकाशित; 588 रिक्त पदे


MPSC Recruitment 2022 – Latest Update

MPSC Recruitment 2022 : As per the latest news, yet not any decision taken MPSC for the changes in syllabus. These are just a rumors. So candidates should ignore such a messages on Social Media. Further details are as follows:-

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा करिता नवीन परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्याचा विचार नाही. काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून सदर प्रकरणी करण्यात येणारी अवास्तव मागणी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल. तरी उमेदवारांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी, हि माहिती mpsc च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर प्रकाशित करण्यात आली आहे. 

 


MPSC Recruitment 2022

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या (एमसीक्यू) परीक्षांच्या प्रथम उत्तरतालिकांसाठी ऑनलाइन पद्धतीने हरकती नोंदवण्याची सोय एमपीएससीने करून दिली आहे. त्यानुसार उमेदवारांकडून हरकती सूचना नोंदवल्या जातात. मात्र या प्रक्रियेसाठी आता शुल्क लागू करण्यात आले आहे. हरकती नोंदवताना उमेदवारांकडून सामुदायिक पद्धतीने हरकती नोंदवण्यात आल्याचे वारंवार निर्देशनास आले.

MPSC Recruitment 2022


MPSC Recruitment 2022 – Changes Examination System

MPSC Recruitment 2022: Changes will be made in the examination system of the Maharashtra Public Service Commission (MPSC). According to the circular issued on May 2 to qualify for Paper No. 2 (CSAT) in the pre-examination, the condition of at least 33% marks has been fixed. Check here about MPSC new exam plan. Further details are as follows:-

महत्वाचे ~ राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत बदल!! जाणून घ्या

समितीच्या शिफारशींनुसार राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबतचे प्रसिद्धपत्रक शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले. यानुसार पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ (सीसॅट) आर्हताकारी करण्यासाठी २ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार किमान ३३ टक्के गुणांची अट निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या पत्रकानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमात 3 बदल करण्यात आले आहेत.

1. आता राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल आणि एकूण 9 पेपर असतील. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय प्रत्येकी 25 टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील. मुलाखतीसाठी 275गुण असतील. त्यामुळे एकूण गुण 2 हजार 25 असतील.

2. सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.

3. तसेच एकूण 24 विषयांतून उमेदवारांना 1 वैकल्पिक विषय निवडता येईल.

राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता ही सुधारित परीक्षा योजना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून लागू करण्यात येईल. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

 • राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने परीक्षा पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल करत परीक्षेचा दर्जा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेशी समकक्ष केला आहे.
 • यानुसार आता मुख्य परीक्षा १७५० गुणांची होणार आहे.
 • राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोनबाबत अनेक उमदेवारांनी नाराजी व्यक्त केली होती.
 • यानुसार यावर अभ्यास करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, धनंजय कमलाकर आणि माजी कुलगुरू एस. एफ. पाटील यांची समिती नेमण्यात आली होती.
 • या समितीच्या शिफारशींनुसार राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
 • याबाबतचे प्रसिद्धपत्रक शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले.
 • यानुसार पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ (सीसॅट) आर्हताकारी करण्यासाठी २ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार किमान ३३ टक्के गुणांची अट निश्चित करण्यात आली आहे.

MPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2022 जाहिरात प्रकाशित; 800 रिक्त पदे

MPSC नवीन टेस्ट सिरीज 

मेगा भरती आणि MPSC 2022-23 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच  

पूर्व परीक्षेतील बदल

राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील पेपर क्रमांक 2 सी-सॅट अर्हताकारी करण्यात आला आहे. नवीन बदलाची अंमलबजावणी 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेपासून केली जाणार आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन अर्थात सी-सॅट हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती.

या अनुषंगाने एमपीएससीने माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सी-सॅट विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय एमपीएससीने काही दिवसांपूर्वी जाहीर केला.

या समितीच्या कार्यकक्षेमध्ये राज्यसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सुधारित करण्याचाही समावेश होता. या संदर्भातील समितीच्या शिफारसीही एमपीएससीने स्वीकारल्या आहेत.

हा निर्णय येत्या २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेपासून लागू करण्यात येणार आहे. याचबरोबर सर्वात महत्त्वाचा बदल मुख्य परीक्षेत करण्यात आला आहे. हा बदल करताना ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाशी समकक्ष करण्यात आली आहे. सध्या मुख्य परीक्षा ७०० गुणांची होते आणि १०० गुणांची मुलाखत घेण्यात येते. मात्र आता ही मुख्य परीक्षा १७५० गुणांची होणार आहे. तर २७५ गुणांची मुलाखत घेण्यात येणार आहे. अशाप्रकारे एकूण २०२५ पैकी गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण नऊ पेपर होणार आहेत. ही संपूर्ण परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची असणार आहे.

 • यामध्ये भाषा पेपर १ मराठी आणि भाषा पेपर २ इंग्रजीचा प्रत्येकी ३०० गुणांचा होणार असून यामध्ये प्रत्येकी २५ टक्के गुणांची आर्हता निश्चित करण्यात आली आहे.
 • याशिवाय अन्य सात पेपर असतील यामध्ये दोन्ही माध्यमाच्या निबंधासाठी २५० गुणांचा पेपर, सामान्य अध्ययनाचे चार पेपर आणि दोन वैकल्पिक विषयांच्या पेपरचा समावेश असणार आहे.
 • सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २ व सामान्य अध्ययन ३ या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व महाराष्ट्राशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमांचा समावेश राहील.
 • तर सामान्य अध्ययन-४ हा पेपर उमेदवारांसाठी नैतिकता, चारित्र्य व योग्यता या विषयावर राहील असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

वैकल्पिक विषयांसाठी २६ विषयांचे पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेकरीता हे बदल मुख्य परीक्षा २०२३पासून लागू करण्यात येईल असे आयोगाच्या सचिवांनी स्पष्ट केले.

MPSC New Exam Plan

अशी आहे नवी परीक्षा योजना

परीक्षेचे स्वरुप : वर्णनात्मक

 • एकूण पेपर – नऊ

अर्हताकारी पेपर

 • १. भाषा पेपर १ – मराठी – ३०० गुण
 • २. भाषा पेपर २ – इंग्रजी – ३०० गुण

गुणवत्ता यादीकरीता विचारात घ्यावयाचे पेपर

 • १. निबंध (मराठी किंवा इंग्रजी माध्यम) – २५० गुण
 • २. सामान्य अध्ययन – १ – २५० गुण
 • ३. सामान्य अध्ययन – २ – २५० गुण
 • ४. सामान्य अध्ययन – ३ – २५० गुण
 • ५. सामान्य अध्ययन – ४ – २५० गुण
 • ६. वैकल्पिक विषय पेपर क्रमांक १ – २५० गुण
 • ७. वैकल्पिक विषय पेपर क्रमांक २ – २५० गुण

एकूण गुण – १७५०, मुलाखत – २७५ गुण, एकूण गुण – २०२५

PDF जाहिरात – https://bit.ly/3yjZKTW


MPSC Recruitment 2022 Notification

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पदभरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल संधींबाबत फेरबदल केला आहे. उमेदवारांच्या कमाल संधींची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून, आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

एमपीएससीमार्फत विविध शासकीय पदांच्या भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस एमपीएससीकडून शासनाला केली जाते.

एमपीएससीने निश्चित केलेल्या वयोमर्यादेत उमेदवाराला कितीही वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होती. मात्र निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून एमपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर खुल्या गटातील (अराखीव) उमेदवारांना कमाल सहा संधी, उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल नऊ संधी २०२० मध्ये निश्चित केल्या, तर अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले होते.

या निर्णयाच्या अनुषंगाने संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. मात्र आता एमपीएससीकडून या निर्णयात फेरबदल करण्यात आला आहे.


MPSC Recruitment 2022: The way is cleared for recruitment of Tax Assistant, Clerk posts. This recruitment was stopped due to many reasons. However, The State Tax Department has cleared the way for 30 candidates’ selection. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०१९ मध्ये महाराष्ट्र गट ‘क’च्या कर सहायक, लिपिक टंकलेखक व दुय्यम निरीक्षक या तीन पदांसाठी परीक्षा घेतली होती. यामध्ये १२६ कर सहायक पदे भरली; पण तब्बल अडीच वर्ष विविध कारणांमुळे संबंधितांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत राहावे लागले. मात्र राज्य कर विभागाने ३० उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला आहे.

MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2021- 1083 पदांची नवीन जाहिरात

MPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु

MPSC पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2019 – सुधारित गुणवत्ता यादी जाहीर

MPSC सहाय्यक विभाग अधिकारी GR-B पूर्व परीक्षा – 2021 – पात्र उमेदवारांची यादी जाहीर

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 गुणवत्ता यादी जाहीर!!

 • या पदांची भरती प्रक्रिया न्यायालयीन आणि कोरोनामुळे तीन वर्षांपासून प्रलंबित होती. या भरती प्रक्रियेत एसईबीसी उमेदवारांना (सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास) आरक्षणावरील स्थगितीमुळे नियुक्ती दिलेली नव्हती.
 • सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’चे आरक्षण रद्द केल्यामुळे, राज्य सरकारने विद्यार्थ्यांना ‘ईडब्ल्यूएस’चे १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन या रखडलेल्या भरती प्रक्रियेला गती दिली होती.
 • त्यानुसार ”एमपीएससी”ने प्रक्रिया सुरू करून पुन्हा एकदा या पदांचा निकाल लावला होता.
 • मात्र, उच्च न्यायालयाने या नवीन निकालानुसार ”एसईबीसी”च्या उमेदवारांना ”ईडब्ल्यूएस”चा (आर्थिक मागास वर्ग) लाभ देण्याच्या मुद्द्यावरून स्थगिती दिली होती.
 • त्यामुळे फक्त १० टक्के ईडब्ल्यूएस उमेदवारांचा प्रश्न उच्च न्यायालयामध्ये उद्भवल्याने उर्वरित ९० टक्के उमेदवारांना नियुक्तीसाठी वेठीस धरले होते.

आता १२६ उमेदवारांपैकी ३० जणांना प्रशासनाने नियुक्ती दिली आहे. मात्र राहिलेल्या ९६ जणांची कागदपडताळणी सुरू असल्याने हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल प्रशासनाने लवकरात लवकर कागदपडताळणी करून आम्हाला नियुक्ती द्यावी, अशी मागणी उमेदवार मोहन पाटील यांनी केली आहे.

इतर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी

महसूल प्रशासनामार्फत होत असल्याने नियुक्तीस उशीर होत आहे. उर्वरित उमेदवारांचे पडताळणी अहवाल महसूल प्रशासनाने राज्य कर विभागास द्यावेत, जेणेकरून लवकरात लवकर नियुक्ती मिळेल.


MPSC Recruitment 2022 Latest Update –

MPSC Recruitment 2022 : The Joint Main Examination 2020 has been stalled for the last four months due to entanglement in the judicial process. The MPSC students demanded at a press conference on Wednesday that the judicial process should be expedited and the issue of the exam should be resolved immediately. Further details are as follows:-

MPSC Exam

न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने गेल्या चार महिन्यांपासून संयुक्त मुख्य परीक्षा २०२० रखडलेली आहे. ही न्यायालयीन प्रक्रीया जलद गतीने पूर्ण करावी आणि या परीक्षेचा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) संयुक्त परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या पूर्व परीक्षेतील काही प्रश्न रद्द आणि बदलल्याने काही विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना मुख्य परीक्षेत पात्र होता आले नाही.
 • प्रश्न रद्द केले नसते तर मुख्य परीक्षा देता आली असती.
 • असे त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
 • त्यामुळे त्यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली.
 • मात्र न्यायालयात यावर अद्याप कोणतीही सुनावणी झालेली नाही.
 • त्यात केवळ वेळ जात आहे.
 • या परीक्षेची मुख्य परीक्षा गेल्या चार महिन्यांपासून रखडल्याने पात्र विद्यार्थी त्रासले असून तणावात आले आहेत.
 • ही न्यायालयीन प्रक्रीया जलद गतीने पूर्ण करावी या मागणीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
 • यावेळी मुख्य परीक्षेला पात्र ठरलेले मनोज पिंगळे, मीरा मोरे, सुवर्णा गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

तीव्र आंदोलनाचा इशारा

Coordinate with the State Government and MPSC Commission and also through Advocate General the question of future of 13 thousand 909 students of the High Court should be pointed out and the date of main examination should be announced immediately. Otherwise, we will carry out intense agitation in the near future, warned student Amit Kuchekar.

राज्य सरकार व एमपीएससी आयोगाशी समन्वय साधावा तसेच महाधिवक्ता यांच्याद्वारे उच्च न्यायालयाच्या १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निदर्शनास आणून द्यावा व मुख्य परीक्षेची तारीख तत्काळ जाहीर करावी. अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करू, असा इशारा विद्यर्थी अमित कुचेकर यांनी दिला.

विद्यार्थ्यांनी या पूर्वी या परीक्षेसाठी आंदोलन ही केले आहे. परीक्षा लांबल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. न्यायालयीन प्रक्रीया जर जलद पार पाडण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

– मनोज पिंगळे

गेल्या अडीच वर्षांपासून या परीक्षेची भरती प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थी न्यायालयात गेल्यामुळे २२ व २९ जानेवारी २०२२ रोजी नियोजित असलेली मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याला कमीत कमी १० हजार रुपये खर्च येतो. हा खर्च करताना घरून ही चिडचिड होते. मुलींना अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्वरित निर्णय घ्यावा.

-सुवर्णा गायकवाड

चार महिने होऊन देखील अद्याप यावर एकही सुनावणी झाली नाही. त्यामुळे सर्व उमेदवार प्रचंड मानसिक व आर्थिक तणावात आहेत.

– मीरा मोरे


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Neha Saratape says

  10th pass sathi job Recument karatey……

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड