नवीन अपडेट – MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 623 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा | MPSC Rajya Seva Bharti 2022

MPSC Rajya Seva Bharti 2022

MPSC Rajya Seva Bharti 2022 – Latest Update 

MPSC Rajya Seva Bharti 2022: MPSC (Maharashtra Public Service Commission) has beedn declared a new recruitment notification to fill 623 posts. Eligible candidates can apply online before the 28th of November 2022. The official website for MPSC State Service is mpsc.gov.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मधून भरण्यात येणाऱ्या उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी,  कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी पदांच्या एकूण 623 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. या भरतीच्या परीक्षा आणि सिल्याबसच्या माहितीसाठी येथे क्लिक करा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग Free Mock Test साठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • परीक्षेचे नाव – राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022
 • पदाचे नाव – उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी,  कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी
 • पद संख्या – 623 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अमागास  – रु. 544/-
  • मागासवर्गीय – रु. 344/-
 • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 नोव्हेंबर 2022
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022 
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC Rajya Seva Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 उपलब्ध पदसंख्येतील, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट – अ तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या संवर्गातील पदे
वगळून इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता.सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट – अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :

 1. सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा
 2. इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकांऊटस आफॅ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
 3. इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
 4. सांविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवा
 5. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या पदाकरीता भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यन्त पूर्ण केली असली पाहिजे.

सर्व संवर्गासाठी मराठीचे ज्ञान आवश्यक राहील.

Salary Details For MPSC Rajya Seva Mains 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 गट-अ व गट-ब – सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार.

आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी, गट-ब संवर्गाकरीता वेतनश्रेणी] ,एस-15, रुपये 41800-132300

Important Instruction For MPSC State Service Recruitment 2022

 1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
 2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
 3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Documents : MPSC Rajyaseva Application Form 2022 

 • प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा
  करणाऱ्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
 • खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे :-

MPSC Rajya Seva Bharti 2022

 • उपरोक्त प्रमाणपत्र/कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरील “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना” प्रकरण क्रमांक चार तसेच प्रस्तुत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.
 • संबंधित जाहिरातीस अनुसरुन विहित निकष/पात्रता तसेच प्रोफाईलमधील दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड करावी लागतील. प्रोफाईलमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करावयाची संबधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील.
 • पात्रतेसंदर्भातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.

MPSC Rajya Seva (State Service Main Exam) Bharti 2022

MPSC Rajya Seva Bharti 2022

How to Apply For MPSC State Service Main Examination 2022 Notification  

 1. आयोगाच्या mpsconline.gov.in  या वेबसाईट वरुण ऑनलाईन नोंदणी करावी.
 2. अर्ज सुरू होण्याची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.
 3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
 4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC Rajyaseva 2022 Notification – Important Dates 

MPSC Rajya Seva Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC State Service Main Exam Notification 2022

🔔 सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न डाउनलोड सिल्याबस 
📑 PDF जाहिरात
http://bit.ly/3TsfdIQ
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mXrwAb

Previous Update –

MPSC Rajya Seva Bharti 2022: The latest update for MPSC Rajya Seva Pre Examination 2022. As per the latest news, The number of posts has increased for the State Services Pre Examination 2022. A total of 462 posts have been increased. Further details are as follows:-

जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येतील वाढीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 623 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०४५/२०२२) करीता दिनांक ११ मे, २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शासनाच्या मागणीनुसार भरावयाच्या एकूण १६१ पदांचा समावेश करण्यात आला होता. जाहिरातीमध्ये अंतर्भूत पदांव्यतिरिक्त काही नवीन संवर्गातील पदांकरीता शासनाकडून सुधारित/अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल, असे जाहिरातीद्वारे स्पष्ट करण्यात आले होते.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करीता दिनांक ११ मे, २०२२ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर प्रस्तुत परीक्षेकरीता काही नवीन संवर्गातील ४६२ पदांचे अतिरिक्त मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करीता विज्ञापित १६१ पदे तसेच अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त ४६२ पदे विचारात घेऊन विषयांकित परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ६२३ पदांच्या तपशीलाकरिता खालील PDF जाहिरात वाचावी.

 • खालील प्रमाणे विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२२ मधून एकूण ६२३ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
 • उपजिल्हाधिकारी संवर्गाकरीता वयोमर्यादा दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी गणण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर सर्व पदांकरीता वयोमर्यादा जाहिरातीमध्ये नमूद दिनांकास म्हणेजच दिनांक ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी गणण्यात येईल.
 • शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:- क्रमांक:एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.६१/कार्या-१२, दिनांक १७ डिसेंबर, २०२१ अनुसार दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
 • पदसंख्या व आरक्षणामध्ये कोणताही बदल झाल्यास याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
 • जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
सविस्तर माहिती – https://bit.ly/3FuuPbo

Previous Update –

महत्त्वाचे – MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 करिता 340 पदांची भर | MPSC Rajya Seva Bharti 2022

MPSC Rajya Seva Bharti 2022: The latest update for MPSC Rajya Seva Examination 2022. As per the latest news, The number of posts has increased for the State Services Examination 2022. A total of 340 posts have been increased. MPSC State Services Exam 2022 will be held on the 21st of August 2022. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा २०२२ मध्ये ३४० पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक अशा पदांचा त्यात समावेश असून, २१ ऑगस्टला राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ राज्यभरातील केंद्रांवर होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर

MPSC Rajya Seva Recruitment 2022

एमपीएससीतर्फे ११ मे रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२२ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात १६१ पदांचा समावेश होता. मात्र, शासनाकडून आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा २०२२ च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. राज्यसेवा २०२२ च्या जाहिरातीमध्ये केवळ १६१ पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.मात्र आता गट अ आणि गट ब संवर्गाची मिळून ३४० पदे वाढल्याने एकूण ५०१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल त्यामुळे उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

MPSC Rajya Seva Vacancy 2022

 • (1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33
 • (2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
 • (3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
 • (4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
 • (5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
 • (6) शिक्षणाधिकारी, गट अ-20
 • (7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
 • (8) तहसीलदार, गट अ-25
 • (9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
 • (10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
 • (11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
 • (12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
 • (13) सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब-42

MPSC State Sevices Bharti 2022

वाढलेल्या पदांमध्ये उपजिल्हाधिकारी गट अ संवर्गाची ३३, पोलीस उपअधीक्षक गट अ संवर्गाची ४१, सहायक राज्यकर आयुक्त गट अ संवर्गाची ४७, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट अ संवर्गाची १४, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ संवर्गाची दोन शिक्षणाधिकारीगट असंवर्गाची २० प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) गट असंवर्गाची सहा, तहसीलदार गट असंवर्गाची २५. सहायक गव विकास अधिकारी गट ब संवर्गाची ८०, उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब संवर्गाची तीन, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब संवर्गाची दोन, उपशिक्षणाधिकारी गट ब संवर्गाची २५, सहायक प्रकल्प अधिकारी गट ब संवर्गाची ४२ पदांचा समावेश असल्याचे एमपीएससीने नमूद केले.

MPSC State Sevices Recruitment 2022

MPSC Rajya Seva Bharti 2022


State Services Main Examination 2021 – Final Answer Key

MPSC Rajya Seva Bharti 2022/: Maharashtra Public Service Commission has been declared State Services Main Examination 2021 – Final Answer Key. Click on the below link to download the list.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 भाषा पेपर II, सामान्य अध्ययन पेपर I, II, III, IV ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१” या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण/संदर्भ देऊन पाठविलेली ऑनलाईन निवेदने, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यापुढे यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत. तसेच त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

उत्तरतालिका डाउनलोड करा – https://bit.ly/3zDz6oF


मुदतवाढ – MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; 161 रिक्त पदांची होणार भरती 

MPSC Rajya Seva Bharti 2022Maharashtra Public Service Commission has been declared State Service Pre-Examination 2022 recruitment notification for the 161 vacancies. Eligible candidates apply online before the last date.  Further details are as follows:-

MPSC राज्यसेवा परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर!! मुख्य परीक्षा असणार वर्णनात्मक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधी मर्यादित करण्याचा निर्णय आयोगाकडून रद्द करण्यात आला असून आयोगाच्या प्रस्तुत निर्णयास अनुसरुन राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ करीता दिनांक ११ मे २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीमधील परिच्छेद क्रमांक ७.८ रद्द करण्यात येत आहे.

२. प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीमधील परीक्षेच्या संधीसंदर्भातील तरतुदीमुळे बऱ्याचशा उमेदवारांनी प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर केला नसल्याची शक्यता असल्यामुळे तसेच परीक्षेच्या संधी मर्यादित करण्याचा निर्णय रद्द झाल्याने अर्ज सादर करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस अर्ज करण्याची न्याय्य संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विषयांकित परीक्षेस अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे:

(१) ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा व अंतिम दिनांक:-दिनांक २४ जून २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत

(२) ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:- दिनांक २४ जून २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत

(३) भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याचा अंतिम दिनांक: दिनांक २५ जून २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत

(४) भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्याचा अंतिम दिनांक:- दिनांक २७ जून २०२२ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत

शुद्धीपत्रक – https://bit.ly/3aYxP2A


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड