MPSC Rajya Seva Bharti 2026
MPSC Rajya Seva Bharti 2026: Maharashtra Public Service Commission has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacant posts of “Maharashtra Gazetted Civil Services Combined Main Examination 2025”. There are 139 vacant post available. Eligible candidates apply online through the given mentioned link below before the last date. The last date for online application is the 14th March 2026. For more details about MPSC Rajya Seva Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत “महाराष्ट्र राज्य सेवा” पदांच्या एकूण 139 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.एमपीएससी राज्य सेवा भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०२६आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एमपीएससी राज्य सेवा भरती २०२६
- पदाचे नाव –महाराष्ट्र राज्य सेवा
- पदसंख्या – 139 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला वर्ग – रु. 544/-
- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 344/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ मार्च २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
MPSC Rajya Seva Vacancy 2026
| पदाचे नाव | पदसंख्या |
| महाराष्ट्र राज्य सेवा | 139 |
Educational Qualification For MPSC Rajya Seva Recruitment 2026
खाली नमूद संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली विहित अहेताः-
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| महाराष्ट्र राज्य सेवा | (१) यांत्रिकी किवा स्वयंचलित्र (ऑटोमोबाईल) अभियांत्रिकीमधील किमान ४ वर्षांची पदवी (२) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला, गिअर्स, हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने (अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने) यांसह मोटार सायकल चालविण्यासाठी प्राधिकृत करणा-या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वैध लायसन आवश्यक. (३) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला, अवजड मालवाहू वाहने किंवा यथास्थिती, अवजड प्रवासी वाहने, अथवा अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालविण्याचे वैध लायसन धारण करीत नसेल तर, परिवीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालविण्याचे लायसन प्राप्त करणे अनिवार्य. अन्यथा सेवा समाप्त करण्यास पात्र असेल. (४) कोणताही खंड न पडता वाहन चालविण्याच्या लायसनचे वेळोवेळी नुतनीकरण करणे आवश्यक राहील. |
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
- अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती/अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यत पूर्ण केली असली पाहिजे.
Salry For MPSC Rajya Seva Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| महाराष्ट्र राज्य सेवा | गट-अ व गट-ब – ७व्या वेतन आर्यागाच्या सुधारित वेतन मंट्रीक्समधील वेतन स्तरानुसार. |
Important Documents – महत्त्वाची कागदपत्रे

Important Date – महत्वाची तारीख
- अर्ज सादर करण्याचा कालावधी – दिनांक २८ फेब्रुवारी, २०२६ रोजी १४.०० ते दिनांक १४ मार्च, २०२६ रोजी २३:५९
- ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – दिनांक १४ मार्च, २०२६ रोजी २३:५९
- भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक – दिनांक १६ मार्च, २०२६ रोजी २३:५९
- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – दिनांक १७ मार्च, २०२६ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये
Selection Process – निवडप्रकिया
१. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता/पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
२. सेवा भरती बाबतची संपूर्ण प्रक्रिया संबंधित संवर्ग/पदाच्या सेवाप्रवेश नियम आणि या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, आरक्षण संदर्भातील शासनाचे प्रचलित धोरण तसेच आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
Physical Measurements/Qualifications – शारीरिक मोजमापे/अर्हता


Examination Stages – परीक्षेचे टप्पे
(१) लेखी परीक्षा गुण –
(i) भाषा पेपर-१, भाषा पेपर-२, प्रत्येकी ३०० गुण, २५ % गुणांसह अर्हताकारी
(ii) गुणवत्तेसाठी गणना करावयाच्या प्रश्नपत्रिका (पेपर क्रमांक ३ ते पेपर क्रमांक ९) गुण १७५०
(२) मुलाखत गुण – २७५ गुण
How To Apply For Maharashtra Rajya Seva Notification 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
- उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०२६ आहे.
- उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpsc.gov.in Rajya Seva Bharti 2026 | |
| 📲PDF जाहिरात | https://shorturl.at/zKffm |
| 👉ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/qIVOt |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















