एमपीएससी वेळापत्रकात बदल !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या मुलाखतीचे वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. त्याबाबतचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर आयोगाने प्रसिद्ध केले आहे.

आयोगातर्फे 25 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल 22 मार्च 2019 रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 15 ते 17 ऑक्‍टोबर रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात आता बदल करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार 6 ते 19 ऑक्‍टोबर या कालावधीत होणार आहे.

दरम्यान, 15 ऑक्‍टोबर रोजी होणारी मुलाखती दि. 18 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. तर दि. 16 ऑक्‍टोबर रोजी होणारी मुलाखती दि. 19 ऑक्‍टोबरला होईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्‍त अन्य उमेदवारांच्या मुलाखती यापूर्वी निर्धारित केलेल्या तारखेस होणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

MPSC लिपिक टंकलेखक प्रवेशपत्र

खासगी शाळांतील शिक्षकभरती निवडणुकीनंतर


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !