महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त परीक्षा २०२४ मधील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली, अशा उमेदवारांना एक वर्ष वाढवून देण्यात आले आहे. ही माहिती मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने संधी देण्यासाठी सरकारने कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री शेलार म्हणाले, वयोमर्यादा वाढवून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारांकडून निवेदने मिळाली होती. त्यावर सकारात्मक विचार करून अराजपत्रित गट ‘ब’मधील पीएसआय व अन्य परीक्षेसाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















