MPSC Krushi Seva Bharti 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेद्वारे भरण्यात येणारी कृषी सेवेतील पदे वित्त विभागाच्या मान्यतेअभावी मागील दोन वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. कृषी विभागाने राज्यसेवा आयोगाकडे मे आणि डिसेंबर २०२५ मध्ये मागणी पत्र पाठवूनही वित्त विभागाने त्यास मान्यता दिलेली नाही. परिणामी, वयोमर्यादा ओलांडली जाण्याच्या भीतीने कृषी सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. कृषी विभागामध्ये २७५०२ पदे मंजूर आहेत. यातील १८२९८ पदे भरली असून तब्बल ९२०४ पदे रिक्त आहेत. यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, अनुरेखक, वाहन चालक, नाईक, शिपाई, रोपमळा मदतनीस आदी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. वित्त विभागाच्या निर्देशानुसार यातील वाहन चालक पदे भरण्यास मनाई करण्यात आली आहे. उर्वरित पदांचा आकृतिबंध अंतिम टप्प्यात आला आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांचा आकृतिबंध अंतिम करण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेद्वारे कृषी उपसंचालक (गट अ) मधील तंत्र अधिकारी, आणि महाराष्ट्र कृषी सेवा (गट ब) कनिष्ठ संवर्ग, जिल्हा परिषद कृषी अधिकारी (गट ब) आणि महाराष्ट्र प्रशासकीय सेवा (गट ब) सहायक प्रशासकीय अधिकारी अशी पदे भरण्यात येतात. मे २०२५ मध्ये ८७ पदांचे मागणी पत्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यासाठी वित्त विभागाच्या उपसमितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या पदांची जाहिरात २०२५ मध्ये प्रसिद्ध होऊन भरती होणे अपेक्षित होते. २०२६ मधील भरतीसाठी ४८४ पदांच्या मागणीसाठीही वित्त विभागाच्या उपसमितीकडे मागणी पत्र सादर केले गेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा ३१ मे २०२६ रोजी नियोजित आहे. त्याआधी जर या पदांना मान्यता मिळाली नाही. तर २०२६ ची कृषी सेवेच्या जागांची जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. त्यामुळे कृषी सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार मागणी करूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात मागील पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी संबंधित पदांचे मागणी पत्र वित्त विभागाला सादर केले आणि ते मान्यतेअभावी प्रलंबित असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र शासन तर्फे कृषी सेवा अधिकाऱ्यांचे सन २०२५ चे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यासाठी, महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब या १५ पदांचे व महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) या ७२ पदांचे, असे एकूण ८७ पदांचे मागणीपत्र वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. या वरून लवकरच पुढील भरती प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















