MPSC Interview Marks Update – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा परीक्षेच्या रचनेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२७ पासून लागू होणाऱ्या या नव्या बदलांनुसार राज्य सेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय (Optional Subjects) पूर्णपणे वगळण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुलाखतीचे गुणही सुधारित करून १७५ निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील अधिकृत शुद्धिपत्रक आयोगाने २२ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केले आहे. आयोगाने २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिध्दीपत्रकाचा संदर्भ देत सुधारित रचनेची माहिती दिली आहे. मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय वगळल्यामुळे लेखी परीक्षेचे एकूण गुण १२५० झाले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्या गुणांचे गुणोत्तर संतुलित ठेवणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२७ आणि त्यापुढील सर्व परीक्षांसाठी मुलाखतीचे गुण १७५ निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२७ आणि त्यानंतरच्या परीक्षांसाठी आता मुलाखतीचे १७५ गुण निश्चित केले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयाचे पेपर रद्द करूनही मुलाखतीचे २७५ गुण कायम ठेवल्याने अंतिम गुणवत्ता यादीत मुलाखतीचा प्रभाव वाढणार असल्याची चर्चा परीक्षा तज्ज्ञांमध्ये सुरू होती. याबाबत प्रकाशित केल्यानंतर आयोगाने आपल्या निर्णयात बदल करत अखेर मुलाखतीचे गुण कमी करण्याचा निर्णय घेतला. आयोगाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२७ पासून वैकल्पिक विषयाच्या दोन्ही परीक्षा वगळण्यात आल्या आहेत. त्याऐवजी मराठी व इंग्रजी हे दोन अर्हताकारी भाषा विषय, निबंधाचा एक आणि सामान्य अध्ययनाचे चार, असे एकूण सात पेपर अनिवार्य असतील. भाषा विषयांचे गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. परीक्षेतील निबंधाचा एक आणि सामान्य अध्ययनाचे चार अशा एकूण पाच पेपरांचे १,२५० गुण अंतिम निकालासाठी विचारात घेतले जातील. दरम्यान, लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांचे गुणोत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संतुलित राहावे, या उद्देशाने मुलाखतीचे गुण १७५ निश्चित करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी आयोगाने वैकल्पिक विषय रद्द करण्याचा निर्णय इतर राज्यांच्या धर्तीवर घेतल्याचा दावा केला होता. मात्र, तेथील मुलाखतीचे गुण तुलनेने कमी असल्याचे स्पष्ट झाले होते.
नव्या परीक्षा पद्धतीनुसार, राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२७ पासून आता एकूण सात अनिवार्य पेपर असणार आहेत:
- भाषा विषय (मराठी व इंग्रजी): दोन अर्हताकारी (Qualifying) पेपर असतील. यामध्ये उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान २५% गुण मिळवणे आवश्यक आहे. या पेपर्सचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जाणार नाहीत.
- निबंधाचा पेपर: एक अनिवार्य पेपर.
- सामान्य अध्ययन (General Studies): चार अनिवार्य पेपर.
या रचनेमुळे मुख्य परीक्षेच्या अंतिम निकालासाठी आता केवळ निबंधाचा एक पेपर आणि सामान्य अध्ययनाचे चार पेपर मिळून एकूण १२५० गुण विचारात घेतले जातील.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















