MPSC कडून मोठी घोषणा; उमेदवारांना मिळणार उत्तरपत्रिका
MPCS Announced to Make Available Scanned Answer sheets in Students Profile
MPCS Announced to Make Available Scanned Answer sheets in Students Profile : एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना आता त्यांना मिळालेले गुण नेमके कळण्यास मदत होणार आहे. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेज त्यांच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत….
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांसंदर्भातील एक मोठी घोषणा केली आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली इमेज उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. परीक्षेत मिळालेले गुण आता उमेदवारांना अचूक कळणार आहेत.
यासंदर्भात राज्यसेवा आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या सर्व परीक्षांकरिता उमेदवारांना दोन भागांची उत्तरपत्रिक उपलब्ध करून देण्यात येते. त्यापैकी भाग-१ (मूळ प्रत) हा परीक्षेनंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येतो, तर भाग – २ (कार्बन प्रत) परीक्षेनंतर सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवाराने परीक्षेच्या वेळी त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनांनुसार व उत्तरपत्रिकेच्या मलपुष्ठावर सविस्तरपणे दिलेल्या सूचनांनुसार नोंदवणे गरजेचे आहे. उत्तरपत्रिकेच्या भाग २ वरून उमेदवारांना त्यांनी छायांकित केलेली उत्तरे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या उत्तरतालिकेशी पडताळून पाहता येतात. त्यामुळे उमेदवारांना गुणांचा अंदाज घेता येतो. मात्र उमेदवारांना त्यांचे गुण अचूक ज्ञात व्हावेत व उमेदवारांना परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांसंदर्भात कोणती शंका राहू नये म्हणून उमेदवारांना परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाइलमध्ये उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी दिली जाणार आहे.’
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्य लोकसेवा आयोग परीक्षेच्या निकालानंतर उमेदवारांना पुढील गोष्टी उपलब्ध करून देणार आहे –
१) मूळ उत्तरपत्रिकेचे स्कॅन इमेज
२) निकालाकरिता गृहित धरलेले एकूण गुण
३) उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरिता गुणांची किमान सीमांकन रेषा
आयोगाचा हा निर्णय १ ऑक्टोबर २०२० नंतर आयोजित होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा तसेच चाळणी परीक्षांकरिता लागू राहिल असे आयोगाने कळवले आहे.
MPCS Issue Guidelines for Exam : MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेला उपस्थित राहताना उमेदवारांनी कोणती खबरदारी घ्यायची, याबाबत सूचना जारी केली आहे.
कोविड – १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी कोणती खबरदारी घ्यायची त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना आयोगाने जारी केल्या आहेत.
या सूचना पुढीलप्रमाणे आहेत –
१) परीक्षा उपकेंद्रात प्रवेश करताना उमेदवाराने किमान तीपदरी मास्क लावणे बंधनकारक.
२) परीक्षा हॉलमध्ये हातमोजे, सॅनिटायझर, मास्क असलेले किट देण्यात येईल, त्याचा वापर उमेदवारांनी परीक्षा संपेपर्यंत करायचा आहे.
३) परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सतत सॅनिटाइज करत राहणे आवश्यक आहे.
४) कोविड-१९ सदृश लक्षणे दिसून येत असल्यास संबंधित पर्यवेक्षकांना आगाऊ कळवणे.
५) उमेदवारांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
६) उमेदवाराने स्वत:चा जेवणाचा डबा / अल्पोपहार व पाण्याची बाटली सोबत आणावी.
७) दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे.
८) परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन, लिखाण साहित्या आदी वापरण्यास उमेदवारांना सक्त मनाई आहे.
९) शारीरिक / परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तीपत्रिका आदींवरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
१०) प्रतिबंधित क्षेत्रामधील परीक्षा उपकेंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था ऐनवेळी इतर परीक्षा उपकेंद्रावर करण्यात आल्यास त्यासंबंधीची सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच संबंधित उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणी क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवण्यची व्यवस्था करण्यात येईल.
११) परीक्षा संपल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर जाताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.
१२) वापरलेले टिश्यू पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर्स आदी वस्तू परीक्षा केंद्रावरील आच्छादित कुंडीत टाकावेत.
१३) कोविड- १९ विषाणू संदर्भात केंद्र व राज्य सरकार तसेच स्थानिक प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचना / आदेशांचे पालन करावे.
कधी होणार परीक्षा?
राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Prelims Exam) ११ ऑक्टोबर २०२०, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२२ नोव्हेंबर २०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहेत.
परीक्षा — आधीची तारीख — नवी सुधारित तारीख
- राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० — २० सप्टेंबर २०२० — ११ ऑक्टोबर २०२०
- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा — ११ ऑक्टोबर २०२० — २२ नोव्हेंबर २०२०
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० — १ नोव्हेंबर २०२० — १ नोव्हेंबर २०२०
MPCS Negative Marking: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नकारात्मक गुणपद्धतीत बदल केले आहेत. प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक चतुर्थांश गुण वजा केले जाणर आहेत.
MPCS Negative Marking: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांकरिता नकारात्मक गुण देण्याच्या पद्धतीत (Negative Marking) सुधारणा केल्या आहेत. यातील महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत. म्हणजेच यापुढे निकाल अपुर्णांकात लागणार आहे.
यापूर्वी, विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता चार चुकीच्या उत्तरांबद्दल एक गुण वजा करण्याबाबतची नकारात्मक गुणांची पद्धत (निगेटिव्ह मार्किंग) २००९ मध्ये प्रथम लागू करण्यात आली होती. त्यानंतर नकारात्मक गुण वजा करण्याची कार्यपद्धती काही बदलांसह अबलंबिवण्यात आली. या कार्य पद्धतीचा आढावा घेण्यात आला आणि पुढीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला.
१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नवीन गुणपद्धतीनुसार प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी २५ टक्के किंवा एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत.,’ अशी माहिती ‘एमपीएससी’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजले जाईल आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामधून २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
३) हा नियम लागू करताना अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकांत आली, तरीही ती अपूर्णांकांतच राहील.
४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, त्यास नकारात्मक गुणपद्धत लागू होणार नाही.
नवीन गुणपद्धत सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि चाळणी परीक्षांसाठी लागू असेल, असे ‘एमपीएससी’च्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.
सोर्स : म. टा.
MPSC All exams of MPSC postponed due to COVID 19 : कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याचा फटका जे उमेदवार वयोमर्यादेच्या काठावर आहेत, त्यांना बसणार आहे. या पार्श्वभूमीवर अशा उमेदवारांना आयोगाच्या पुढच्या परीक्षेसाठी संधी देण्याची मागणी होत आहे
कोरोनाचे गहिरे संकट लक्षात घेता राज्य शासनाने एमपीएससीच्या सर्व परीक्षा लांबणीवर टाकल्या. परीक्षेची अंतिम तयारी टप्प्यात आली असताना आणि उमेदवारांनी परीक्षेची सर्व तयारी केली असतानाच अचानकपणे राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाच्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे; तर काही उमेदवारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय योग्य नाही
कोणतीच मागणी अथवा चर्चा नसताना राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय योग्य नसल्याची काही उमेदवारांचे म्हणणे आहे. जे उमेदवार पाच सहा वर्ष स्पर्धापरीक्षेची तयारी करीत आहेत. त्यांच्या पुढे मोठा प्रश्न पडला आहे. या निर्णयाने काही उमेदवार निराशेच्या गर्तेत जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
पुढच्या परीक्षेत बसता येणार नाही
एमपीएससीची २० सप्टेंबर रोजी परीक्षा होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्या सर्व उमेदवारांना परीक्षा देता येणार आहे. मात्र, परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर अन्य परीक्षाही लांबणीवर पडणार आहेत, अशा कालावधीत काही उमेदवारांची वयोमर्यादा संपणार आहे. अशांना आयोगाच्या पुढच्या परीक्षेस बसता येणार नाही. त्यामुळे ही वयोमर्यादा वाढवून मिळावी, अशी मागणी होत आहे.
वयोमर्यादेत शिथिलता आणणे आवश्यक
आता आयोगाच्या सर्व परीक्षा लांबणीवर पडणार हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत काही उमेदवारांची परीक्षेसाठी वयोमर्यादा संपेल त्या उमेदवारांना पुढची परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादेत शिथिलता आणणे आवश्यक आहे
सोर्स: सकाळ
MPSC Preliminary Exam 2020 – All exams of MPSC postponed due to COVID 19 pandemic : MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
MPSC Exam : कोविड-१९ परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याच्या मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२० ही २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा यापूर्वीही एकदा नव्हे तर दोन वेळा लांबणीवर पडली होती.
ही परीक्षा आतापर्यंत दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वात आधी ही परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार एमपीएससी पूर्व परीक्षा सर्वात आधी ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन १३ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले. तसे परिपत्रक १७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र १३ सप्टेंबरलाच नॅशनल एलिजीबीलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट आयोजित करण्यात आली. त्यामुळे एमपीएससी पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर ऐवजी रविवार २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता राज्यातील कोविड-१९ स्थितीमुळे केवळ पूर्व परीक्षाच नव्हे तर या दरम्यानच्या काळातील एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्य सेवा पूर्व परीक्षेव्यतिरिक्त महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ही ११ ऑक्टोबर रोजी होणार होती. तीही लांबणीवर पडली आहे.
सोर्स : म. टा.
Table of Contents
Part time job asel tar suchawa