MPSC सहायक कक्ष अधिकारी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा | MPSC ASO Admit Card 2023
MPSC ASO Admit Card 2023
MPSC ASO Admit Card 2023
MPSC ASO Admit Card 2023 – The admission certificates of the candidates who have appeared for the computer system based examination of the Assistant Room Officer Limited Divisional Competitive Examination – 2023 scheduled by the Maharashtra Public Service Commission on September 24, 2023 have been made available in their account on the https://mpsconline.gov.in website of the commission’s online application system. You can download it from the link below. .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २४ सप्टेंबर, २०२३ रोजी नियोजित सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२३ संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सदर परीक्षेसाठी उमेदवारांना खालील सूचना देण्यात येत आहेत.
१) परीक्षा कालावधीत प्रत्येक उमेदवाराने स्वत:चे शासकीय ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
२) परीक्षा केंद्रातील सूचना फलकावरील दालन क्रमांक व आसन क्रमांक नुसार बैठक व्यवस्था असेल.
३) परीक्षा सुरु होण्यापूर्वी ४५ मिनिटे अगोदर उमेदवाराने परीक्षेच्या केंद्रावर हजर रहावे.
४) परीक्षा सुरु झाल्यावर कोणत्याही उमेदवारास परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. ५) परीक्षेच्या वेळापत्रकानुसार प्रत्येक पेपर सुरु होण्यापूर्वी तसेच पेपर संपण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर इशारा देणारी घंटा देण्यात येईल.
६) उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावरील आवश्यक सर्व तपशील उमेदवारांनी अचूकपणे भरणे आवश्यक आहे. मुखपृष्ठाच्या मागील बाजूस उमेदवाराने कोणतेही लिखाण करु नये. उत्तरपत्रिकेच्या आतील पानांवर तसेच पुरवणीवर उमेदवाराने स्वत:चे नाव, स्वाक्षरी, आसन क्रमांक इत्यादी कोणताही मजकूर लिहू नये. उत्तरपत्रिका/प्रश्नपत्रिकेच्या कोणत्याही भागावर उमेदवाराने स्वाक्षरी करु नये. तसेच सही करणे किंवा ओळख पटवून देण्यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा / खूणांचा निर्देश करणे ही बाब आक्षेपार्ह समजण्यात येईल व त्या प्रकरणी खालील नमूद अ.क्र.९ प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
७) उमेदवाराने उत्तरपत्रिकेचे मुखपृष्ठ व त्याची मागील बाजू वगळून इतर सर्व पृष्ठांवरील दोन्ही बाजूस उत्तरे लिहावीत.
८) परीक्षेसाठी विहित केलेली अधिकृत शासकीय पुस्तके /अधिनियम/नियम/शासन निर्णय त्या त्या पेपरच्या वेळी उमेदवारांना परीक्षा कक्षात वापरण्याची परवानगी राहील. विहित केलेली मुळ पुस्तके उपलब्ध नसल्यास, संबंधित विभागाच्या आस्थापना अधिकाऱ्यांनी प्रमाणित करुन दिलेल्या विहित पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती परीक्षेच्या वेळी वापरण्यास परवानगी राहील. मात्र परीक्षेसाठी विहित केलेल्या पुस्तकांमध्ये अथवा पुस्तकांच्या झेरॉक्स प्रतींवर अथवा अधिनियम/नियम/शासन निर्णयाच्या प्रतींवर इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केलेले नसावे.
९) उमेदवारांनी परीक्षा दालनात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वर्तन करु नये. परीक्षेच्या वेळी आक्षेपार्ह वर्तन { कॉपी करणे/ बघून लिहिणे / अन्य उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेतून अथवा त्यांच्याशी चर्चा करुन उत्तर लिहिणे, परीक्षा दालनात भ्रमणध्वनी (मोबाईल), पेजर, गणनयंत्र अथवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जवळ बाळगणे इत्यादी } करणाऱ्या उमेदवारास संबंधित प्रश्नपत्रिकेत अनुत्तीर्ण घोषित करण्यात येईल तसेच त्यावर्षीच्या उर्वरीत सर्व प्रश्नपत्रिकांना बसण्यासाठी अपात्र ठरविण्यात येईल.
१०) परीक्षा संपण्याच्या १० मिनिटे अगोदर उमेदवारांनी आपली उत्तरपत्रिका व पुरवणी एकत्र बांधून घ्यावी.