MPSC महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा आज! | MPSC Agriculture Service Admit Card 2025

MPSC Agriculture Service Admit Card 2025

MPSC Agriculture Service Admit Card 2025

मित्रांनो, आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन १८ मे रोजी विविध ठिकाणी महाराष्ट्रात करण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिसांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी ८.३० ते २.३० वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश जाहीर केला आहे. परिसरातील टेलिफोन बूथ आणि झेरॉक्स दुकाने या वेळेत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, सेंटर जवळ रस्त्यावर फेरीवाले, रिक्षाचालकांसह सर्व वाहने बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच परीक्षा केंद्राच्या प्रांगणात परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलिसांनी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियोजित महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. आणि हो, सर्व उमेदवारांना महाभरती तर्फे बेस्ट लक!!

तसेच या लिंक द्वारे द्या मोफत MPSC सराव पेपर्स डाउनलोड करा महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा सुधारित अभ्यासक्रम.. !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शांततेचा भंग करणाऱ्यांवर पोलिस कडक नजर ठेवतील. विद्यार्थी आणि परीक्षेसाठी अधिकृत अधिकारी आणि कर्मचारी वगळता कोणालाही महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. टेलिफोन बूथ, झेरॉक्स मशीनची दुकाने, संगणक दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि इतर दुकाने देखील परीक्षा पूर्ण होईपर्यंत बंद राहतील. हा आदेश परिसरातील रहिवाशांना लागू राहणार नाही.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  • परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
  • कोव्हिड – १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
  • आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या
    संकेतस्थळावरील ‘Guidelines for Examination’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
  • प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact-
    [email protected] व support [email protected] या ईमेल व / अथवा १८०० – १२३४ – २७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड