JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

प्रदूषण नियंत्रण मंडळांतील रिक्त पदांची भरती करा! – MPCB Bharti 2024

Pradushan Niyantran Mandal Bharti – नवीन अपडेट अंतर्गत, सध्या देशात  प्रदूषणाची समस्या कमी होण्याऐवजी वाढत असताना देशभरातच प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांमधील अनेक पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची बैठक मुंबई येथे झाली. यावेळी मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मांडले व त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची विनंती मंडळाला केली. तसेच, सर्व रिक्त पदावरील भरती तत्काळ सुरु करण्याची मागणी केली.

 

या बैठकीत गोरे यांनी वाढते प्रदूषण व बदलते वातावरणीय बदलामुळे वाढणाऱ्या कामाची व्याप्ती, तसेच सध्या उपलब्ध असलेले बोर्डातील मनुष्यबळ लक्षात घेता अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत, मंडळातील सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी बोर्डाकडून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत विचार मांडले. मंडळातील २००९ मध्ये भरती केलेल्या क्षेत्र अधिकाऱ्यांना पीएफ, सीपीएफ व सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत मागणी केली. मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा व मंडळाकडून कुंटुबाला अर्थ साहाय्याची तरतूद करण्याबाबतही विचार व्यक्त केले. राज्यातील प्रमुख नद्या स्वच्छतेसाठी मंडळाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे सांगितले.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

सध्या, प्राप्त अहवाल नुसार, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांच्या पायाभूत सुविधा, संसाधने आणि क्षमता प्रभावित कर्मचाऱ्यांची अपुरी मंजूर संख्या आणि विशेषकरून तांत्रिक पदांवर मोठ्या संख्येने रिक्त पदांसह अनेक कारणांमुळे प्रभावित होत असलेल्या प्रकरणांची सुनावणी करताना न्यायाधिकरणाने हे निर्देश दिले. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांमध्ये मंजूर कर्मचाऱ्यांपैकी कमी संख्याबळ अस्तित्वात असल्याचे आढळून आले.

तसेच या विभागात नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या नाही आणि पदे रिक्त आहेत. यामुळे पर्यावरणविषयक समस्यांवर राज्य पातळीवरील नियामक यंत्रणेवर परिणाम होत आहे, असेही न्यायमूर्ती अरुणकुमार त्यागी आणि तज्ज्ञ सदस्य ए. सेंथिल वेल यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. प्रत्येकच राज्यात ही पदे रिक्त असून बिहार, झारखंड आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशात रिक्त पदांचे प्रमाण अधिक आहे. कायद्याच्या अयोग्य अंमलबजावणीचे हे एक प्रमुख कारण आहे. समित्या आणि मंडळांमध्ये सुमारे एक हजार ९१ कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यापैकी १४६ आणि ४५० हे अनुक्रमे तांत्रिक आणि वैज्ञानिक पार्श्वभूमीचे आहेत. एवढे कर्मचारी जर कंत्राटी पद्धतीने घेतले जात आहेत, तर नियमित भरतीत अडचण काय, असा प्रश्नदेखील विचारला. प्राधिकरणाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रदूषण नियंत्रण समिती प्रयोगशाळांमध्ये योग्य तसेच पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा ठपकाही प्राधिकरणाने ठेवला. सर्व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांच्या सदस्य सचिवांना आजपासून सहा आठवड्यांच्या आत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांसमोर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले.

 

आतापर्यंत पूर्ण क्षमतेच्या नियुक्त्या का करण्यात आलेल्या नाहीत, इतकी मंजूर पदे का रिक्त आहेत याच्या स्पष्टीकरणासह रिक्त पदे भरली जातील आणि प्रयोगशाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेले वेळापत्रक तयार केले जाईल, याचाही समावेश शपथपत्रात असावा, असे न्यायाधिकरणाने म्हटले आहे.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड