मुंबई महापालिकेच्या कार्यकारी सहायक पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परीक्षेच्या निकालानंतर प्रश्नपत्रिकेतील ८ प्रश्न गाळल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे सुमारे ४५०० उमेदवारांचे गुण घटल्याचा फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाबाबत उमेदवारांनी लोकमतकडे निवेदन सादर करत हा मुद्दा उजेडात आणण्याची विनंती केली आहे.

मुंबई महापालिकेच्या १८४६ कार्यकारी सहायक पदांसाठी परीक्षा २ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा टीसीएस या एजन्सीमार्फत तीन शिफ्टमध्ये पार पडली. परीक्षेच्या १५ ते २० दिवसांनी उमेदवारांना अॅन्सर की मिळाली आणि ती अचूक असल्याचे दिसून आले. काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर सुधारित अॅन्सर की जाहीर करण्यात आली, पण त्यामध्ये मोठा घोळ झाल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणले.
सुधारित अॅन्सर की मध्ये ८ प्रश्न गायब!
उमेदवारांच्या मते, दुसऱ्यांदा मिळालेल्या अॅन्सर कीमध्ये ८ प्रश्नच गायब होते. चौकशीअंती या ८ प्रश्नांना रद्द करण्यात आले असल्याचे समोर आले. मात्र, याचा फटका केवळ काही उमेदवारांना बसला, तर काहींना फायदा झाला.
४५०० उमेदवारांना नुकसान, मेरिट चुकले!
सायंकाळी ४:३० ते ६:३० या शिफ्टमध्ये परीक्षा दिलेल्या ४५०० उमेदवारांना १०० ऐवजी ९२ प्रश्नांच्या आधारे गुण देण्यात आले, त्यामुळे त्यांच्या गुणांमध्ये मोठी घट झाली. याउलट, इतर शिफ्टमधील उमेदवारांना पूर्ण १०० गुणांवर गणना करण्यात आल्यामुळे त्यांचे मेरिट वाढले आणि त्यांना फायदा झाला. या गोंधळामुळे अनेक पात्र उमेदवारांचे नुकसान झाले असून, आता परीक्षार्थी फेरतपासणीची मागणी करत आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















