नवीन अपडेट – महापालिकेत 3 हजारपेक्षा जास्त पदांची भरती | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2022

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2022

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2022

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2022:  The latest update for Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2022. There are a total of 1255 posts vacant out of 2562 sanctioned posts. Recruitment will be soon. Further details are as follows. For more details about Mira Bhayandar Municipal Corporation Recruitment 2022, MBMC Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

राज्य शासनाने नुकत्याच एका परिपत्रकानुसार रिक्त पदे ही आवश्यकता तसेच आस्थापना खर्चाच्या मर्यादेत राहून भरण्याबाबत सूचित केले आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर महापालिकेत सुद्धा नोकर भरतीचे वारे वाहू लागले आहेत. पालिकेच्या संबंधित विभागांकडून तशा पद्धतीची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पालिका आस्थापनेवरील रिक्त पदांची संख्या ही १२५५ असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यातील बहुतांश पदे ही ठेक्याने भरलेली असून कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजार पेक्षा जास्त आहे. त्यामुळे किती व कोणती? रिक्त पदे भरली जाणार तसेच ठेक्यावरील कर्मचान्यांना संधी मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मिरा-भाईंदर महापालिकेतील मंजूर असलेल्या २५६२ पदांपैकी १२५५ पदे रिक्त असली तरी त्यात बहुतांश पदे ही सफाई कामगार, मजूर, शिपाई, लिपिक टंकलेखक, अग्निशमन आदींची आहेत. गेल्या आर्थिक वर्षात आस्थापनेचा खर्च तब्बल २५३ कोटी ७७ लाख इतका झालेला असल्याने पद भरती करताना आस्थापनेचा खर्च ३५ टक्के मर्यादित ठेवण्याची कसरत सुद्धा पालिकेला करावी लागणार आहे.

शासन निर्देशानुसार आस्थापनेचा खर्च हा महसुली उत्पन्नाच्या ३५ टक्के मर्यादेत असावा असे बंधनकारक आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या २०२१ – २०२२ आर्थिक वर्षांतील मिळालेल्या पालिका आकडेवारीनुसार प्रत्यक्ष महसुली उत्पन्न ७५१ कोटी २७ लाख इतके जमा झाले आहे. तर पालिकेच्या स्थायी व अस्थायी आस्थापनेच्या वेतन भत्ते आदींसह संबंधित अन्य आस्थापना खर्च मिळून तब्बल २५३ कोटी ७७ लाख ३० हजार रुपये इतका झालेला आहे. त्यामुळे आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या मर्यादित दाखवण्याची कसरत पालिकेला करावी लागणार आहे. शासन निर्देशानुसार आस्थापनेचा खर्च हा महसुली उत्पन्नाच्या ३५ टक्के मर्यादेत असावा असे बंधनकारक आहे.

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2022


Previous Update –

मिरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत 1300+ पदांची नवीन भरती लवकरच! | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2022

Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2022 अंतर्गत लवकरच वर्ग 1 च्या 29, वर्ग 2 च्या 54, वर्ग 3 च्या 451 आणि वर्ग 4 च्या 789 अश्या एकूण 1323 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. मिरा-भाईंदर महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी लेखा विभागाकडून आस्थापनावर होणाऱ्या खर्चासंदर्भात आवश्यक माहिती तपासून घेतली जाणार आहे. त्यानंतर भरती करण्यासंदर्भातील प्रस्ताव पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. त्यावर त्यांनी त दिलेल्या योग्य आदेशानुसार पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली.

 

Mira Bhaindar Mahanagarpalika Vacancy 2022 Details (रिक्त पदे)
Category (श्रेणी) Approved posts (मंजूर पदे) Vacancy (रिक्त जागा)
Group 1 (वर्ग 1) 65 29
Group 2 (वर्ग 2) 77 54
Group 3 (वर्ग 3) 873 459
Group 4 (वर्ग 4) 1547 789
Total (एकूण) 2562 1323

 

 

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2022: MBMC (Mira Bhayandar Municipal Corporation) is going to conducted recruitment for 02 vacant Posts. Eligible candidates can apply before the 21st of November 2022. The official website for Mira Bhayandar Mahanagarpalika is www.mbmc.gov.in. More details are given below:-

मिरा-भाईंदर महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत शहर समन्वयक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्व.आरोग्य विभागाकरीता शहर समन्वयक (City Co-ordinator) पदाकरीता तात्पुरत्या स्वरुपात ठोक मानधनावरील ०२ जागा थेट मुलाखतीद्वारे (Walk In Selection) भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्जासह मुलाखतीसाठी उपस्थित राहाण्याची विनंती करत आहेत. खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी, विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत टपालव्दारे अथवा स्वत: मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय, सार्व. आरोग्य विभाग, पहिला मजला येथे दि.२१/११/२०२२ पर्यंत मुदतीत पाठविण्यात यावेत. सदर पदाकरीता आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतीसह दि.२५/११/२०२२ या दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० या वेळेत मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, दुसरा मजला, भाईंदर (प) ठाणे ४०११०१ येथे स्वखर्चाने मुलाखतीकरीता उपस्थित रहावे. याबाबतची सविस्तर माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या www.mbmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

 • पदाचे नाव – शहर समन्वयक
 • पदसंख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणभाईंदर (Thane)
 • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
 • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय, सार्व. आरोग्य विभाग, पहिला मजला
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, दुसरा मजला, भाईंदर (प) ठाणे 401101
 • मुलाखतीची तारीख – 25 नोव्हेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.mbmc.gov.in  

Educational Qualification For Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शहर समन्वयक Any Graduate

 • BE/ B.Tech (Any Stream)
 • B.Arch.
 • B.Planning

Salary Details For MBMC Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
शहर समन्वयक Rs. 45,000/- pm

Important Documents 

 • अ) शाळा सोडल्याचा दाखला.
 • ब) शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे, तांत्रिक अर्हतेची प्रमाणपत्रे
 • क) अनुभवाचे प्रमाणपत्र.
 • ड) डोमिसाईल प्रमाणपत्र.

How To Apply For MBMC Recruitment 2022

 1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
 3. सदर पदांकरिता अधिक माहिती www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 4. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचूक भरावी.
 5. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
 6. दिलेल्या मुदती नंतर सादर करण्यात येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. (टपालाने / कुरीयरने सादर करण्यात आलेले अर्ज विहीत कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी.)
 7. उशीरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
 8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.
 9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Mira Bhayandar Mahanagarpalika Jobs 2022

 • सदर पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
 • मुलाखतीस येताना अर्जदाराने मूळ प्रमाणपत्रे आणावीत. तसेच अर्जासोबत खालील क्रमाने मूळ प्रमाणपत्राच्या साक्षांकित छायाप्रती जोडाव्यात.
 • सर्व पदांकरिता मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 • तोंडी मुलाखतीसाठी येण्या-जाण्याचा कोणताही खर्च दिला जाणार नाही.
 • उमेदवारांनी स्वतः निश्चित करावयाचे आहे की, ते आवेदित पदांच्या सर्व अर्हता व अटी पूर्ण करतात.
 • उमेदवार विहित अर्हता व अटी पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही टप्यावर निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
 • व इतर (मूळ जाहिरात बघावी.)

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2022

Important Dates – Mira Bhayandar Mahanagarpalika Vacancy 2022

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links| www.mbmc.gov.in Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
http://bit.ly/3O8Y5Xt
✅ अधिकृत वेबसाईट
www.mbmc.gov.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
 1. Esterkuwar says

  ???

 2. Kajal says

  Nice job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड