मीरा भायंदर लेखी परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर, परीक्षे संदर्भात नवीन महत्वाचा अपडेट आणि माहिती – Mira Bhayandar Hall Ticket Download

Mira Bhayandar Hall Ticket Download – Mira Bhayandar Hall Ticket Download Details & Latest Update is out. Online applications under Mira Bhayandar Municipal Corporation Direct Service Recruitment 2025 were invited from 22nd August, 2025 to 12th September, 2025. The online competitive examination for the said recruitment process will be conducted from 09th October, 2025 and 10th October, 2025. Detailed information regarding the schedule of online examinations, examination center and admit card & (Hall ticket) etc. will be published soon on the website of Mira Bhayandar Municipal Corporation. In this regard, candidates are requested to visit the website of Mira Bhayandar Municipal Corporation www.mbmc.gov.in from time to time.

मिरा-भाईंदर महापालिकेने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या ३५८ पदांवरील भरतीसाठी एकूण १२ हजार ८३० उमेदवारांनी अर्ज भरल्याचे समोर आले आहे. या उमेदवारांची परीक्षा येत्या ९ व १० ऑक्टोबर रोजी प्रत्येक दिवशी तीन सत्रांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या ऑनलाईन परीक्षा परजिल्ह्यातील एकूण ८ केंद्रांमधील १२ ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत. राज्य शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून नवीन भरतीला लावलेला ब्रेक यंदा सैल करीत पदभरतीला हिरवा झेंडा दाखविला आहे. यानुसार ठाणे जिल्ह्यातील ६ महापालिकांसह राज्यातील इतर महापालिकांमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात मिरा-भाईंदर महापालिकेने देखील ऑगस्ट महिन्यात एकूण २७संवर्गातील ३५८ पदांची भरती प्रक्रिया सुरू केली. ही भरती सरळसेवा पद्धतीने केली जाणार असून त्यासाठी ऑनलाईन परीक्षा आयोजित केली जाणार आहे. यासाठी एकूण १२ हजार ८३० उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यांना सरसकट परीक्षेला बसण्याची अनुमती देण्यात आली आहे. तसे ऑनलाईनद्वारे त्यांना कळविण्यात आले आहे. ही परीक्षा येत्या ९ व १० ऑक्टोबर रोजी जिल्ह्याबाहेरील ८ केंद्रांत आयोजित करण्यात आली असून त्याचे नियोजन टीसीएसकडून करण्यात येत आहे. या परीक्षेचे सिल्याबस या लिंक वरून डाउनलोड करा. 

ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष छाननी समिती स्थापन केली जाणार असून त्यावेळी मात्र अर्ज भरतेवेळी आवश्यक कागदपत्रे जोडली नसल्यास त्या उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद केले जाणार आहे. मात्र यावेळी गैरमार्गाने आवश्यक कागदपत्रे न जोडणाऱ्या उमेदवाराला मागील दरवाजाने ती कागदपत्रे जोडण्याची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळी मात्र घोडेबाजार उसळण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी ऑनलाईन परीक्षेपूर्वी शहरात घोडेबाजाराला ऊत आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र टीसीएस व पालिकेकडून त्याला कोणताही दुजोरा देण्यात आला नसल्याने संबंधित उमेदवाराची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या अमिषाला कोणीही बळी पडू नये, त्यासाठी सर्व परीक्षार्थ्यांनी पूर्वपरीक्षेचा परिपूर्ण अभ्यास करावा, असे आवाहन आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडून करण्यात आले आहे.

ऑनलाईन परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक व पुणे येथील ८ केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून यातील नाशिक व पुण्यातील प्रत्येकी ३ केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून या परीक्षा प्रत्येक दिवशी तीन संत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सरळसेवा भरती 2025 अंतर्गत ऑनलाईन अर्ज दि.22 ऑगस्ट, 2025 ते दि. 12 सप्टेंबर, 2025 या कालावधीत मागविण्यात आले होते. सदर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्पर्धा परिक्षा दि.09 ऑक्टोबर, 2025 व दि.10 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परिक्षांचे वेळापत्रक, परिक्षाकेंद्र व प्रवेशपत्र & (Hall ticket) इत्यादीबांबत जाहीर झाली आहे. उमेदवार खालील लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. याबाबत उमेदवारांनी वेळोवेळी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या www.mbmc.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षार्थीना करण्यात येत आहे. या परीक्षेचे सिल्याबस या लिंक वरून डाउनलोड करा. 

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक 

Mira Bhayandar Hall Ticket Download

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड