नागपूर ला मिहान येथे मोठे प्रोजेक्ट्स सुरु होण्याच्या प्रतीक्षा आता संपल्या असून , येथे ९ मार्च पासून मिहान नागपूर येथे पतंजली पार्क सुरु होणार आहे. या पुणे हजारो रोजगाराच्या संधी उमेदवारांना मिळणार आहे. हा एक मोठा प्रक्ल नागपूर येथे सुरु होणार असून याचा तरुणाईला रोजगाराच्या रूपाने नक्कीच फायदा होईल. मिहानमध्ये या गटाला २६५ एकर जमीन सवलतीच्या दरात देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील Mihan Patanjali Job Recruitment.

मिहानमधील बहुप्रतिक्षित पतंजली फूड व हर्बल पार्क अखेर सुरू होत असून, येत्या ९ मार्चपासून उत्पादन सुरू होणार आहे. संत्री, मोसंबी, कोरफड, कडुलिंब, लिंबू, आवळा आणि इतर औषधी वनस्पतींची खरेदी या प्रकल्पातून स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे थेट आणि अप्रत्यक्षपणे विदर्भातील ५० हजारांहून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. कच्च्या आणि तयार मालाच्या वाहतूक व पॅकेजिंग प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० सप्टेंबर २०१६ रोजी या फूड प्रोसेसिंग प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. मात्र, तब्बल आठ वर्षांनंतर प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकरी व युवकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. कंपनी या प्रकल्पात अंदाजे १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दररोज ८०० ते ९०० टन संत्र्याची आवक अपेक्षित आहे.
पतंजली फूड व हर्बल पार्क मिहानमध्ये सुरू होणे, हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील संत्री, मोसंबी व कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल. विशेषतः या उपक्रमामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये घट होण्यास मदत होईल.
या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. भाजपाचे सावनेर-कळमेश्वर मतदारसंघाचे आमदार आशीष देशमुख यांनी या प्रकल्पाचे स्वागत करत रोजगार निर्मितीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















