MIDC परीक्षा अखेर सरळसेवा पद्धतीनेच

MIDC Recruitment 2019 Hall Ticket

MIDC Recruitment 2019 Hall Ticket

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) दोन वर्षे प्रलंबित असलेली परीक्षा अखेर २० ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परंतु, ८६५ पदांसाठी होणारी ही परीक्षा सरळसेवा ऐवजी ‘आयबीपीएस’कडून (इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) घेण्यात येणार होती. ऐन वेळेवर परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आल्याने परीक्षार्थीचा विरोध होत होता. ही बाब लक्षात घेऊन आता ही परीक्षा सरळसेवा पद्धतीनेच होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

एमआयडीसीने २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागवले होते. मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे परीक्षा कधी होणार, असा प्रश्न उमेदवारांकडून सातत्याने विचारण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून परिपत्रक प्रसिद्ध करून परीक्षेबाबत माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी महापरीक्षा संकेतस्थळावर अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया सरळसेवा परीक्षा पद्धतीने होईल, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. मात्र, आता ही परीक्षा आयबीपीएस घेणार असल्याचे सांगण्यात आले. मार्च २०२१ मध्ये झालेल्या एका परीक्षेतही आयबीपीएसने ही परीक्षा घेतली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. हीच पद्धती आता ८६५ पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्येही अवलंबिली जाणार होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

▶️MIDC भरती २०१९ करीता अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप येथे डाउनलोड करा !

सरळसेवा भरती आणि आयबीपीएस परीक्षा पद्धतीत टोकाचे अंतर आहे. त्यामुळे परीक्षा देणे अडचणीचे होणार असल्याने विद्यार्थ्यांनी याला प्रचंड विरोध केला. हा विरोध बघता आता एमआयडीसीने ही परीक्षा सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारेच घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आयबीपीएसला विरोध का?

परीक्षांच्या तारखा जाहीर होताना परीक्षा पद्धतीही जाहीर केली जाते. बँकिंग क्षेत्रातील परीक्षा आयबीपीएसकडून घेतल्या जातात तर अन्य परीक्षा सरळसेवा पद्धतीने होतात. ज्यामध्ये सामान्य ज्ञान विषय असतो. ऋणात्मक गुण नसतात. आयबीपीएसकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीत मात्र गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी असते. शिवाय यामध्ये ऋणात्मक गुण असतात. त्यामुळे आयबीपीएसकडून होणाऱ्या परीक्षेला विरोध होता.

MIDC Recruitment 2019 Hall Ticket : MIDC Recruitment 2019 Exam Admit card will be announced tomorrow. An advertisement was published on 15th July 2019 to fill 865 vacancies in the category “C” and Class “D” of direct service under Maharashtra Industrial Development Corporation (MIDC). Further details are as follows:-

MIDC भरती 2019 परीक्षा प्रवेशपत्र उद्या जाहीर होणार. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत सरळसेवेची वर्ग “क” आणि वर्ग “ड” मधील संवर्गातील 865 रिक्त पदे भरण्यास 15 जुलै 2019 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती. या संदर्भातील अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात बघावी.

?MIDC भरती २०१९ करीता अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप येथे डाउनलोड करा !
https://mahabharti.co.in/midc-recruitment-2019-syllabus/

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उक्त पदांच्या भरतीकरिता ऑनलाईन/ ऑफलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन 20 ऑगस्ट 2021 ते 10 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये करण्यात आले असून तत्पूर्वी उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेशपत्र 12 ऑगस्ट 2021 पासून सदर पदांची परीक्षा होईपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील.

  • पदाचे नाव
  • पद संख्या – 865 जागा
  • परीक्षेची तारीख – 20 ऑगस्ट 2021 ते 10 सप्टेंबर 20
  • प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख – 12 ऑगस्ट 2021

MIDC Recruitment 2019 Hall Ticket

MIDC Recruitment 2019 Vacancy Details 

MIDC Recruitment 2019 Hall Ticket

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून (ESBC)अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना

MIDC Recruitment 2019 Hall Ticket

 

Department NameMaharashtra Industrial Development Corporation
RecruitmentMIDC Bharti 2019
LocationMaharashtra
Name of Postsclass C and class D
No. Of Posts865
Notification Published Date15 July 2019
Last Date of Application7 August 2019
Exam date20th Aug To 10 Sep 2021
Admit card12 Aug 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MIDC Recruitment 2019

? PDF जाहिरात
https://bit.ly/3s6KaGx
✅ अधिकृत वेबसाईट
www.midcindia.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड