नविन अपडेट -MHTCET चा सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर; ३७ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल !! – | MHT CET Exam Result 2024

MHT CET Exam Result, MHT CET Result 2024 date and time announced

MHT CET Exam Result 2024 Out

MHT CET Exam Result: The Maharashtra State Common Entrance Test (MHT-CET) result for admission to Agriculture, Pharmaceutics, Science and Technology courses was declared online yesterday evening. A total of 37 students from PCM and PCB groups have secured hundred percentile marks in the state. Saloni Karale, a student from Kolhapur, topped the nomadic tribe (B) category. The PCB group exam was conducted in two sessions from 22nd to 30th April and PCM group from 2nd to 16th May at different six centers in Kolhapur. In total around 25 thousand students appeared for the exam. It included 11 thousand students of PCB group and 14 thousand students of PCM group.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) इंजिनिअरिंग, कृषी, फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’त पीसीबी आणि पीसीएम विषयगटात मिळून ३७ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे. रविवारी एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला. मृदुल समीर जोशी, सन्मय विक्रम शाह, अभिषेक विरेंद्र झा, आद्या दुर्गाप्रसाद हरिचंदन, मोहम्मद इस्माईल नाईक या मुंबई-ठाण्यातील विद्यार्थ्यांनी पीसीबी विषयगटात १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत. तर पुष्कर विनय ब्याडगी, मैत्रेय वाळिंबे, मोक्ष निमेश पटेल, वंशिका शहा, प्रणव अरोरा या मुंबईतील विद्यार्थ्यांनी पीसीएम गटात अव्वल यश मिळविले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मृदुल समीर जोशी, सन्मय विक्रम शाह, अभिषेक विरेंद्र झा, आद्या दुर्गाप्रसाद हरिचंदन, मोहम्मद इस्माईल नाईक या मुंबई-ठाण्यातील विद्यार्थ्यांनी पीसीबी विषयगटात १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत. तर पुष्कर विनय ब्याडगी, मैत्रेय वाळिंबे, मोक्ष निमेश पटेल, वंशिका शहा, प्रणव अरोरा या मुंबईतील विद्यार्थ्यांनी पीसीएम गटात अव्वल यश मिळविले आहे.

अनुसूचित जाती (एससी)प्रवर्गातून पीसीबी गटात मुंबईच्या परेश किशोर क्षेत्री याने ९९.९९ पर्सेंटाईल मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर पीसीएममध्ये नागपूरच्या साना उदय वानखेडे हिने ९९.९७ पर्सेंटाईल मिळविले आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून पीसीबी गटात अकोल्याच्या सृजन गजानन अत्राम याने ९९.९७ पर्सेंटाईल मिळवून प्रथम येण्याची कामगिरी केली. तर पीसीएममध्ये रांचीचा सुयंश अरविंद चौहान याने ९९.९९ पर्सेंटाईल मिळविले आहेत. एमएचटी-सीईटीत १०० पर्सेंटाइल मिळविणाऱ्या पीसीएमच्या २० विद्यार्थ्यांमध्ये १३ मुले आहेत, तर सात मुली आहेत, तर पीसीबीत ११ मुले आणि सहा मुली आहेत. पीसीएमकरिता एकूण १.४ लाख मुलींना सीईटी दिली, तर मुले होते २.४ लाख, तर पीसीबीकरिता १.७ लाख मुलींनी, तर १.३ लाख मुलांनी सीईटी दिली. ओबीसी प्रवर्गातील टॉपर्स (सर्वांना १०० पर्सेंटाईल) पीसीबी ग्रुप – श्रावणी कैलाश चोटे (अहमदनगर) – श्रेया विलास भोळे (अकोला) – आदेश निचट (अमरावती) – फहाद मोहम्मद कलिम अन्सारी (धुळे) – सोहम भीमराव लगड (पुणे) पीसीएम ग्रुप – पार्थ पद्मभूषण असाती (नागपूर) – आर्यन भुरे (रांची)

प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार
९० हून अधिक पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांवर कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘सीईटी’चा निकाल जाहीर झाल्याने फार्मसी, कृषी आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.


MHT CET Exam Result 2024

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षणासह इतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी- सीईटी) निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे. या निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. परीक्षेची उत्तर तालिका (अन्सर की) व सोडविलेली प्रश्नपत्रिका लॉगिन आयडीवर प्रसिद्ध केली आहे…

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ करिता अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा २२ ते ३० एप्रिल, तर पीसीएम ग्रुपची परीक्षा २ ते १६ मे या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी ७ लाख २५ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ७५ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. या विद्यार्थ्यांमध्ये ३ लाख ७९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी पीसीएम या गटातून, तर पीसीबी या गटातून ३ लाख १४ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याची माहिती आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली. या परीक्षेची उत्तर तालिका आणि उमेदवारांनी सोडलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडीवर प्रसिद्ध केली आहे. पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांना २४ मेपर्यंत आक्षेप नोंदवता येईल. तर, पीसीएम ग्रुपच्या विद्यार्थ्यांना २६ मे पर्यंत आक्षेप नोंदवता येईल.


MHT CET Exam Result 2024

MHT CET Exam Result:  MHTCET (PCM & PCB Group) 2023 result will be announced on 12-06-2023 on www.mahacet.org and www.mahacet.in websites at 11.00 am. The result of the MHT CET (MHT CET 2023) exam conducted by the education department after the 12th board exam is scheduled to be declared on June 12. Although the result is likely to be out on June 12, before that, students have to register online for this admission process in the first week of June and the process of online registration will be started from the CET cell in the first week of June.


राज्यातील अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी २०२३) निकाल १२ जूनला सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने जूनपासून राबवण्यात येणार असून, प्रथमच मोबाइल ॲपद्वारे उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत विविध टप्प्यांची माहिती, सूचना आणि जागा वाटपाबाबतची माहिती मिळेल.

 

सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी ही माहिती दिली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या १९ प्रवेश परीक्षांपैकी १७ परीक्षा घेण्यात आल्या असून त्यापैकी १६ परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या परीक्षांना एकूण ९ लाख १३ हजार १६ विद्यार्थी उपस्थित होते. उर्वरित दोन परीक्षा  जून आणि जुलैमध्ये घेण्यात येतील. बी. एस्सी नर्सिंग-सीईटी २०२३ ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच सीईटी कक्षामार्फत दिनांक १९ जूनला  घेण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ हजार ३८० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. राज्यातील एकूण ७५ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे.

 

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविताना अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे बारावी गुण, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक सात-बारा उतारा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र, दाखल्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून देण्यात येणारे मान्यतेबाबत संस्था, महाविद्यालये, तसेच विद्यार्थीच्या लॉगीन आयडीमध्ये कळविण्यात येईल, असे वारभूवन यांनी सांगितले.

 


 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलमार्फत घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परंतु अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘एमएचटी- सीईटी’चा निकाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे एमएचटी सीईटीच्या निकालाकडे आता विद्यार्थी-पालकांचे डोळे लागले आहेत. सीईटीसेलकडून सीईटींच्या निकालाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये १४ सीईटींचा निकाल जाहीर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये विधी तीन, पाच वर्षे, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, एमसीए, बीएड, एमएड, आर्किटेक्चर, डिझाईन आदी अभ्यासक्रमांच्या सीईटींचा समावेश आहे. तर ९ ते २१ मे कालावधीत पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपची एमएचटी सीईटी झाली. या सीईटीसाठी यंदा ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख ३३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख १३ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १९ हजार ३०२ विद्यार्थी अनुपस्थित होते. पीसीबी ग्रुपसाठी ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ७७ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २५ हजार ६४५ विद्यार्थी अनुपस्थित होते. पीसीएम ग्रुपपेक्षा पीसीबी ग्रुपच्या परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थ्यांची गैरहजेरी होती. एकूण ४४ हजार ९५४ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, १२ जूनच्या आसपास एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maharashtra CET PCM, PCB Result 2023 Date and Time

Maharashtra State Common Entrance Test Cell today announced the Maharashtra Health and Technical Common Entrance Test (MHT CET) results date and time. The MHT CET results will be released on June 12 at 11 am. Candidates can check the results on the official website – cetcell.mahacet.org.

या परीक्षेसाठी यंदा ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख ३३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख १३ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १९ हजार ३०२ विद्यार्थी अनुपस्थित होते. पीसीबी ग्रुपसाठी ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ७७ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २५ हजार ६४५ विद्यार्थी अनुपस्थित होते.

सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच कॅप राऊंड सुरु होतील,असं सीईटी सेलकडून सांगण्यात आला आहे. आगामी शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु व्हावं त्या दृष्टिकोनातून सीईटी सेलकडून नियोजन केले जात आहे. यासाठी लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत.

एमएचटी सीईटी परीक्षा दोन सत्रात

फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 मे ते 13 मे दरम्यान तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15 मे ते 20 मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रात घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.

MHT CET 2023 : परीक्षा कशासाठी घेतली जाते?

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल मुंबई मार्फत ही परीक्षा घेतली जाते. अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी, महाराष्ट्र राज्य सेल लॉ आणि कृषी शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा आयोजित केली जाते. एमएचटी सीईटी कट-ऑफ हे संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याने मिळवलेले किमान गुण असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमातील उत्तरं द्यावी लागतात. अधिक माहितीसाठी विद्यार्थी  स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्रच्या अधिकृत साईटला भेट देऊ शकतात.

The MHT CET was conducted for the PCM group from May 9 to May 14 and for the PCB group from May 15 to May 20. On May 26, the question paper, response sheet, and answer key were released.  candidates were given a chance to raise their objections till May 28.


MHT CET Result 2022

MHT CET Exam Result: State Common Entrance Test Cell has been declared the temporary merit list of MHT CET LLB. visit llb3cap22.mahacet.org to download the merit list. Further details are as follows:-

या परीक्षेसाठी (MHT CET LLB 2022 परीक्षा) बसलेले उमेदवार llb3cap22.mahacet.org वर MHT CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तात्पुरती गुणवत्ता यादी (MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022) तपासू शकतात.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र (MHT CET) ने MHT CET LLB साठी वर्णक्रमानुसार गुणवत्ता यादी (MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022) फेरी 1 प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेसाठी (MHT CET LLB 2022 परीक्षा) बसलेले उमेदवार llb3cap22.mahacet.org वर MHT CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तात्पुरती गुणवत्ता यादी (MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022) तपासू शकतात.

  • MHT CET LLB 2022 अंतिम गुणवत्ता यादी (MHT CET LLB गुणवत्ता यादी 2022) 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली आणि वाटप फेरी I 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होईल.
  • उमेदवारांना वाटप केलेल्या महाविद्यालयात अहवाल द्यावा लागेल आणि फेरी I साठी प्रवेश प्रक्रिया 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत सुरू होईल.

MHT CET LLB Merit List 2022

  • MHT CET समुपदेशन llb3cap22.mahacet.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावरील यादीवर क्लिक करा.
  • एक PDF फाईल उघडेल.
  • MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022 तपासा.
  • भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
अधिकृत वेबसाईट – llb3cap22.mahacet.org

Previous Update –

MHT CET 2022 चा निकाल जाहीर!! येथे बघा सविस्तर तपशील

MHT CET Exam Result: MHT CET 2022 Exam result has been announced. Candidates can check their results on cetcell.mahacet.org. The exam was held on the 5th to 11th of August 2022 for PCM Group & exam was held on the 12th to 20th of August 2022 for PCB Group. Click on the below link to download the result. Further details are as follows:-

एमएचटी सीईटी २०२२ (MHT CET 2022) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. पीसीएम ग्रुपसाठी ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट आणि पीसीबी ग्रुपसाठी १२ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान घेण्यात आली.

  • महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने नुकताच महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET) चा निकाल जाहीर केला आहे.
  • फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुपचे निकाल ( MHT CET Result 2022) अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर पाहता येणार आहे.
  • उमेदवाांना वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतील.
  • सीईटी निकाल २०२२ (MHT CET Result 2022) सोबत, अंतिम उत्तरतालिका देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • एमएचटी सीईटी २०२२ (MHT CET 2022) परीक्षा पीसीएम ग्रुपसाठी ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट आणि पीसीबी ग्रुपसाठी १२ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान घेण्यात आली.
  • राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्राने २८ ऑगस्ट रोजी पीसीएम आणि पीसीबी गटासाठी पुनर्परीक्षा घेतली होती.

How to Check MHT CET Result 2022 

  • सर्वप्रथम cetcell.mahacet.org च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता विनंती केलेली माहिती सबमिट करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्रने एमएचटी सीईटी २०२२ साठी नॉर्मलायझेशन प्रक्रिया तयार केली आहे. सीईटी स्कोअर ० ते १०० पर्यंत पर्सेंटाइल म्हणून घोषित केले आहे. सीईटी २०२२ पात्र उमेदवार समुपदेशन प्रक्रियेस उपस्थित राहतील. समुपदेशनात शासकीय महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय अनुदानित खासगी महाविद्यालये, खासगी विनाअनुदानित महाविद्यालये यांचा समावेश असेल.

अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org


MAH LLB CET 2022 Result

MHT CET Exam Result: State Common Entrance Test Cell has been declared the MAH LLB CET 2022 result. visit cetcell.mahacet.org to download the result. Further details are as follows:-

एमएएच सीईटी एलएलबी ५ वर्षे, एमएएच एमसीए सीईटी आणि एमएएच एमबीए सीईटीच्या निकालांसोबतच उमेदवारांसाठी स्कोअरकार्डही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवार वर अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकतात. 

  • राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलकडून अधिकृत वेबसाइट – cetcell.mahacet.org वर महाराष्ट्र सीईटी एलएलबी ५-वार्षिक निकाल २०२२ जाहीर केला आहे.
  • उमेदवार आता त्यांचा महाराष्ट्र सीईटी एलएलबी ५ (MHT CET LLB 5) वर्षाचा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. महाराष्ट्र एलएलबी सीईटी २०२२ (MAH LLB CET 2022) परीक्षा २ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
  • काही परीक्षा केंद्रांवर, तांत्रिक समस्यांमुळे २७ ऑगस्ट २०२२ रोजी परीक्षा पुन्हा घेण्यात आली.

How to Download MHT CET 2022 Result 

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला cetcell.mahacet.org वर जा.
  • तुमच्या ३ वर्षांच्या एलएलबी किंवा ५ वर्षाच्या LLB कोर्ससाठी स्कोअरकार्ड नोटिफिकेशनवर क्लिक करा.
  • अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • MH CET लॉ २०२२ चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी तुमचा निकाल डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

MHT CET निकाल 2022 चे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने १० सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानुसार आज एमएएच सीईटी एलएलबी ५ वर्षे, एमएएच एमसीए सीईटी आणि एमएएच एमबीए सीईटीच्या निकालांसोबतच उमेदवारांसाठी स्कोअरकार्डही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवार वर अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकतात. सीईटी सेल महाराष्ट्राने २ आणि २७ ऑगस्ट 2022 रोजी एमएएच सीईटी एलएलबी ५ वर्षांची परीक्षा आयोजित केली होती. MAH MCA CET परीक्षा ४,५ आणि २९ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आली. तर महाराष्ट्र एमबीए, एमएमएस सीईटी परीक्षा २३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घेण्यात आली.

अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org


MHT CET Result 2022 Dates 

MHT CET Exam Result: The latest update for MHT CET Result Dates. As per the latest news, CET Exam result dates has been declared through the State Common Entrance Test Chamber. The result will be declared on 15th of September 2022. Further details are as follows:-

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. त्यानुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेचा निकाल १५ सप्टेंबर रोजी किंवा त्याआधी जाहीर होणार आहे.

MHT CET Result Dates

MHT CET Exam Result

तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि फाइन आर्ट यामधील पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या जवळपास १६ सीईटी परीक्षांसाठी सुमारे ११ लाख ६३ हजार २७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या प्रवेश परीक्षा होत असतानाच सर्व्हर व नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींमुळे काही विद्यार्थी परीक्षा पूर्ण करू शकले नाहीत. तसेच राज्यात उद्‌भवलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. अशाप्रकारे सीईटी परीक्षा घेण्यात आली. आता या परीक्षेच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

MHT CET Exam Result


MHT CET Result 2022 

MHT CET Exam Result: Maharashtra State Common Entrance Test Cell has declared the MHT CET Result 2022. Visit mahacet.org to download the result. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) सेलने मार्च, एमएचएमसीटी २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहेएमएचटी सीईटी परीक्षा ही महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे दरवर्षी घेतली जाणारी राज्यस्तरीय परीक्षा आहे. महाराष्ट्रात बीई, बीटेक आणि बीफार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) सेलने मार्च, एमएचएमसीटी २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
  • या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- mahacet.org वरून स्कोअरकार्ड पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे.
  • मार्च, MHMCT स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी लॉगिन क्रेडेन्शियल्स- यूझर आयडी आणि पासवर्ड भरणे आवश्यक आहे.

How to Download MHT CET Result 2022

  • अधिकृत वेबसाइट- mahacet.org वर जा.
  • MAH मार्च २०२२, MHMCT निकाल लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन क्रेडेन्शियल्स, यूजर आयडी आणि पासवर्ड टाका.
  • मार्च, MHMCT स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • डाउनलोड करा आणि पुढील उपयोगासाठी प्रिंट आउट घ्या.

एमएचटी सीईटी परीक्षा ही महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे दरवर्षी घेतली जाणारी राज्यस्तरीय परीक्षा आहे. महाराष्ट्रात बीई, बीटेक आणि बीफार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.

अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org


MHT CET Result 2021

MHT CET Exam Result : The result of Maharashtra State Common Entrance Examination has been declared. Candidates appearing for this exam will be able to view the results by following the steps given in the news. Detailed information will be available on the official website. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर माहिती मिळणार आहे. MHT CET ला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन आपला निकाल तपासू शकतात.

How to Check MHT CET Result 2021

  • MHT CET निकाल तपासण्यासाठी अधिकृत साइट cetcell.mahacet.org वर जा
  • होमपेजवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल तपासा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा

एमएचटी सीईटी २०२१ (PCM) टेक्निकल एज्युकेशनचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

एमएचटी सीईटी २०२१ (PCB) टेक्निकल एज्युकेशनचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड