MHT CET अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी!! त्वरा करा

MHT CET Exam Details

MHT CET Registration Correction Window Open

MHT CET Exam Details : Latet update for students who register for Academic Years 2022-23 MHT CET. Students will be able to modify the application from their own login between 23rd and 30th June. Further details are as follows:-

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी एमएचटी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षांतर्गत विशेष बाब म्हणून एक संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना २३ ते ३० जूनदरम्यान आपल्या स्वत:च्या लॉगिनमधून अर्जामध्ये सुधारणा करता येणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या एमएचटी सीईटी २०२२ या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ६ लाख ६ हजार १४२ उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क भरून पूर्ण केलेली आहे. काही उमेदवारांकडून अर्ज भरताना अनवधानाने विविध प्रकारच्या चुका झाल्या आहेत. या चुका दुरुस्त करण्याबाबत विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे दूरध्वनी, ईमेलद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती केली होती. याची दखल घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून त्यांनी ऑनलाईन पद्धतीने म्हणजे (पीसीएम व पीसीबी बदल) भरलेल्या अर्जात बदल करण्यासाठी एक विशेष बाब म्हणून संधी देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, ग्रुप बदल करता येणार आहे. ही सुधारणा विद्यार्थ्यांना २३ ते ३० जूनदरम्यान स्वत:च्या लॉगिनमधून करायची असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

MHT CET Exam Details


MHT CET 2022 Delay  

MHT CET Exam Details : The CET exam has been postponed, the cell said. In fact, the NEET exam will be held on July 17, while the JEE Main exam will be held on June 20 to 29 (first session) and July 21 to 30 (second session). Further details are as follows:-

सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सेलकडून सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात नीटची परीक्षा १७ जुलैला, तर जेईई मेन परीक्षा २० ते २९ जून (प्रथम सत्र) आणि २१ ते ३० जुलै (दुसरे सत्र) होणार आहे. त्यामुळे हे दिवस वगळता ‘सीईटी सेल’ला विविध सीईटी परीक्षा घेणे शक्य होते. मात्र, ‘सीईटी सेल’ने सर्वच सीईटी परीक्षा ऑगस्ट महिन्यात ढकलल्या आहेत.

  • ‘सीईटी सेल’कडून इंजिनीअरिंग, एमबीए, फार्मसी, लॉ, आर्किटेक्चर, एमसीए अशा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी साधारण १५ सीईटी (MHT CET) परीक्षा घेण्यात येतात.
  • या परीक्षांद्वारे सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश होतात.
  • या परीक्षांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, सेलच्या पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे या परीक्षा जूनमध्ये होणार होत्या.
  • मात्र, जेईई आणि नीट परीक्षा जून-जुलै महिन्यात होत आहेत.
  • त्यामुळे एकाच दिवशी दोन परीक्षा आल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सेलकडून सांगण्यात आले आहे.
  • उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीदेखील जेईई मेन आणि नीट परीक्षांमुळे राज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले.
  • प्रत्यक्षात नीटची परीक्षा १७ जुलैला, तर जेईई मेन परीक्षा २० ते २९ जून (प्रथम सत्र) आणि २१ ते ३० जुलै (दुसरे सत्र) होणार आहे.
  • त्यामुळे हे दिवस वगळता ‘सीईटी सेल’ला विविध सीईटी परीक्षा घेणे शक्य होते.
  • मात्र, ‘सीईटी सेल’ने सर्वच सीईटी परीक्षा ऑगस्ट महिन्यात ढकलल्या आहेत.
  • अनेक खासगी विद्यापीठांनी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, प्रवेशप्रक्रियांचे नियोजन केले आहे.
  • खासगी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रिया जून-जुलै महिन्यात पूर्ण होऊन, ऑगस्ट महिन्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होईल.
  • त्यामुळे ‘सीईटी सेल’च्या लांबणाऱ्या प्रवेशप्रक्रियांची वाट न पाहता, विद्यार्थ्यांना नाइलाजाने जादा शुल्क भरून खासगी विद्यापीठांत प्रवेश घ्यावे लागणार आहेत.
  • अशा वेळी ऑगस्टमध्ये परीक्षा होऊन, त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ‘सीईटी सेल’च्या प्रवेश प्रक्रियांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणार आहे.
  • सीईटी परीक्षांसाठी विक्रमी विद्यार्थ्यांची नोंदणी होऊनसुद्धा, त्याचा फायदा सीईटी सेल, महाविद्यालये आणि राज्यातील विद्यार्थ्यांना होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बारावीचा निकाल वेळेत; प्रवेशप्रक्रियेला विलंबच 

Results of State Board XII examinations will be announced by June 10. It is then possible to implement the admission process by planning the CET exams immediately. The CET Cell had also planned for this purpose. However, due to the change in the dates of NEET and JEE Main examinations, it is being submitted that the schedule has been changed. The CET examinations for professional postgraduate courses are conducted on the merits of these degree courses. However, the postponement is surprising.

राज्यातील व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया लांबल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड विद्यार्थी आणि महाविद्यालयांना बसेल. जेईई मेन आणि नीट परीक्षांच्या तारखा वगळून राज्यातील सीईटी परीक्षा होणे शक्य आहे, असे संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या बैठकीत ठरले. त्यानुसार या परीक्षा घेण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

– प्रा. रामदास झोळ, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरिया


CET Exam Online Application Deadline Extended

MHT CET Exam Details : The process of online registration for various entrance examinations conducted by the Maharashtra State Common Entrance Examination Cell (CET Cell) under the Technical Education Department has been extended. Similarly, students who want to appear for the CET exam will be able to apply online till May 11, the CET cell said. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे ‘सीईटी’ परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ मे पर्यत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे.

  • राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी, एमबीए, एमएमएस सीईटी, एमसीए सीईटी, एम. आर्च सीईटी, एम.एचएमसीटी सीईटी या सामाईक प्रवेश परीक्षांकरिता ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून सीईटी सेलकडे वारंवार होत होती.
  • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून या सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • ही मुदतवाढ अंतिम असून या पुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवार आणि पालकांनी नोंद घ्यावी, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

MHT CET 2022 Postponed 

MHT CET Exam Details: All the common entrance exams conducted by the state’s CET cell have been postponed. This decision has been taken due to the ‘JEE’ and ‘Neat’ examinations conducted by the Central Government. According to the CET cell, the exams will be held in August. Further details are as follows:-

राज्याच्या सीईटी सेलतर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सामाइक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सीईटी सेलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता ऑगस्टमध्ये या परीक्षा होणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी ‘सीईटी’ सेलकडून (CET Cell) जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. आठवडाभरातच हा निर्णय बदलण्यात आला असून, आता ऑगस्ट महिन्यात परीक्षा होणार असल्याचे ‘सीईटी’ सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा पुढे गेल्याने प्रवेशांची प्रक्रियाही लांबणार असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप होणार आहे.

  • नव्या वेळापत्रकानुसार दोन ते २५ ऑगस्टदरम्यान पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ‘सीईटी’चे आयोजन केले जाणार आहे.
  • ‘जेईई,’ ‘नीट’परीक्षा आणि विद्यापीठांच्या सत्र परीक्षांमुळे जुलै महिन्यातील वेळापत्रक बदलून ते ऑगस्ट महिन्यात करण्यात आल्याचे ‘सीईटी’ सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
  • या परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ एप्रिल होती.
  • त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तीन महिन्यांहून अधिक वाट पहावी लागणार आहे.
  • परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालणार असल्याने त्यानंतर सप्टेंबर महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होतील.

These admissions will continue till the month of November. This makes it clear that the students’ academic year will once again start late. Due to the outbreak of Corona last year, the examinations and admission process were delayed. The students hoped that the entrance exams would be held on time this year. However, as the CET will be extended this year, students, as well as higher education institutions, will be upset.

मंत्र्यांचे आश्वासन हवेतच

यंदा ‘सीईटी’ परीक्षा कोणत्याही परिस्थितीत वेळेतच होतील आणि जुलै ते सप्टेंबर दरम्यान शैक्षणिक वर्ष सुरू होईल, अशी ग्वाही काही महिन्यांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. ही घोषणा आता हवेतच विरली असून, परीक्षांना उशीरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घोषणा करताना मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली नाही का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘जेईई’ परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षा यामुळे ‘सीईटी’ पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही. दोन्ही परीक्षा ‘सीईटी’च्या आधीच्या वेळापत्रकाच्या तारखांच्या दिवशीच येण्याची शक्यता होती. यामुळे ‘सीईटी’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया ‘सीईटी’ सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.


MHT CET 2022

MHT CET Exam Details: The state’s MHT CET 2022 exam will be held in August. Higher and Technical Education Minister Uday Samant has clarified that the CET examination will be held in the state after passing both the sessions of the JEE Main examination and the examination. Further details are as follows:-

राज्यातील MHT CET 2022 परीक्षा त्यानंतर ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहे. जेईई मेन परीक्षेची दोन्ही सत्रं आणि नीट परीक्षा पार पडल्यानंतर राज्यातील सीईटी परीक्षा होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

  • सीईटी परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही सामंत यांनी कळवले आहे.
  • अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम म्हणजेच जेईई आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट परीक्षा जून आणि जुलै महिन्यात होणार आहेत.
  • जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र २९ जून तर दुसरे सत्र ३० जुलै २०२२ रोजी संपणार आहे तर नीट परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
  • परिणामी राज्यातील MHT CET 2022 परीक्षा त्यानंतर ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहे, जेणेकरून या परीक्षा एकमेकांशी क्लॅश होणार नाहीत.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन केले जाते.


MHT CET 2022

MHT CET Exam Details : Examinations for various courses for the year 2022-23 conducted by Maharashtra State CET Cell (MHT CET 2022) will start from 3rd June. So, Maharashtra CET (MHT CET 2022) entrance exam will start from 11th June 2022. For this, registration could be done till March 31. But now the deadline has been extended to April 15. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य सीईटी सेलकडून (MHT CET 2022) घेण्यात येणाऱ्या २०२२-२३ वर्षासाठीच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना ३ जूनपासून सुरुवात होणार आहे. तर, महाराष्ट्र सीईटी (MHT CET 2022) ही प्रवेश परीक्षा ११ जून २०२२ पासून सुरू होणार आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार होती. पण आता ही मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

उमेदवारांना अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर नोंदणी करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना पुढील स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे.

How to Register MHT CET 2022

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahacet.org वर जा.
  • होमपेजवरील MHT CET 2022 नोंदणीच्या ‘न्यू रजिस्ट्रेशन’ लिंकवर क्लिक करा.
  • आता ‘नवीन नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी पूर्ण करण्यासाठी मोबाइल नंबर, ईमेल आयडी भरावा लागेल.
  • संपूर्ण तपशील भरून आपली नोंदणी करा.
  • अर्ज फी भरा आणि पुढे जा.
  • फॉर्म सेव्ह करा आणि सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

MHT CET Registration Important Dates 

  • महाराष्ट्र सीईटी परीक्षेची तारीख – १७ आणि १९ मे २०२२
  • नोंदणीची अंतिम तारीख- १५ एप्रिल २०२२

The MHT CET, which is important for courses in engineering, pharmacology, agriculture and medicine, will be held from June 11 to 23. This includes examinations for students taking Physics, Chemistry and Maths (PCM) from June 11 to 16; The exams for Physics, Chemistry and Biology (PCB) students will be held from June 17 to 23. The examination of art education department will be held on 12th June. For this, registration can be done till April 15.


MHT CET Exam Details : cet counselling round 2020 registration date extended for various ug pg courses – राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने अनेक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कॅप राउंड अंतर्गत अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. यासंदर्भात सीईटी सेलने एक परिपत्रक जारी करून अभ्यासक्रमनिहाय नव्या तारखांचे वेळापत्रक जारी केले आहे.

BE/B.Tech, B.Parmacy/Pharm. D, B.Arch, B. HMCT, DSE, DSP या यूजी कोर्सेसच्या तर MBA/MMS, ME?M.Tech, MCA, M.Pharmacy/ Pharm.D, M.Arch या पीजी कोर्सेसच्या कॅप राऊंडअंतर्गत ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.

अभ्यासक्रमनिहाय नोंदणीसाठी मुदतवाढ मिळालेल्या नव्या तारखा पुढीलप्रमाणे –

पदवीपूर्व अभ्यासक्रम – नोंदणी करण्यासाठी नवी मुदत

  • बीई, बीटेक – २२ डिसेंबर २०२०
  • बी.फार्म – २१ डिसेंबर २०२०
  • बी. आर्क. – २० डिसेंबर २०२०
  • बी. एचएमसीटी – २३ डिसेंबर २०२०
  • डीएसई – २१ डिसेंबर २०२०
  • डीएसपी – २१ डिसेंबर २०२०

पदव्युत्तर अभ्यासक्रम – नोंदणी करण्यासाठी नवी मुदत

  • एमबीए / एमएमएस – २० डिसेंबर २०२०
  • एमई / एम. टेक – २४ डिसेंबर २०२०
  • एमसीए – २३ डिसेंबर २०२०
  • एम. फार्मसी / फार्म. डी. – २३ डिसेंबर २०२०
  • एम. आर्क. – २३ डिसेंबर २०२०

नव्या राउंडचे विस्तृत वेळापत्रक येत्या दोन-तीन दिवसांत सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात येईल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.


MHT CET Exam Details : MHT CET LLB Councelling 2020: महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाने तीन वर्षे आणि पाच वर्षे कालावधीच्या विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जारी केले आहे. सीईटी कक्षाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर mahacet.org लॉ च्या कॅप राऊंडचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

या वेळापत्रकानुसार, तीन वर्षे कालावधीच्या एलएलबी प्रवेशांसाठी १८ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाइन काउन्सेलिंग आणि प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत आहे. ३ वर्षे कालावधीच्या एलएलबी प्रवेशांची पहिली अलॉटमेंट यादी ४ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ नंतर जाहीर केली जाणार आहे.




पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिली अलॉटमेंट यादी ३१ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी पाच वाजल्यानंतर जाहीर होणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत काऊन्सेलिंग आणि कागदपत्र सादर करण्याचा अवधी आहे.

तीन वर्षे एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांचे वेळापत्रक – https://bit.ly/2K2DM1j

पाच वर्षे एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांचे वेळापत्रक – https://bit.ly/2Wce9xv 



सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. योगेश माळी says

    Mhcet आता देत येईल का आता पास आऊट झालोय

  2. Komal Sopanrao Panchal says

    Ycmou la admission ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड