अतिरिक्त सीईटीची नोंदणी प्रक्रिया आजपासून, ३ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज निश्चिती – MahaCET Admission 2024 – 2025
MHT CET Admission Schedule
MahaCET Admission 2024 – 2025
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्ज नोंदणीची मुदत संपल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून मंगळवारी अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक), अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्ष, एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांचे पुढील वेळापत्रक जाहीर केले. त्यातील अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी १४ ऑगस्टला जाहीर होणार आहे तर अंतिम गुणवत्ता यादी ८ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक) पदवी प्रवेशासाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने मंगळवारी प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी प्रवेशासाठी यंदा १ लाख ९२ हजार ३६० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांची ८ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. यंदाही प्रवेशाच्या तीन फेऱ्या असून त्यातील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तर शेवटची फेरी संस्थास्तरावर होईल. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अंतिम गुणवत्ता यादी : ८ ऑगस्ट
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
● पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम : ९ ते ११ ऑगस्ट
● पहिली प्रवेशाची यादी : १४ ऑगस्ट
● प्रवेश निश्चित करणे : १६ ते १८ ऑगस्ट
● दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर : १९ ऑगस्ट
● दुसरी यादी पसंतीक्रम : २० ते २२ ऑगस्ट
● दुसरी गुणवत्ता यादी : २६ ऑगस्ट
● दुसरी यादी प्रवेश कालावधी : २७ ते २९ ऑगस्ट
● रिक्त जागांचा तपशील : ३० ऑगस्ट
● तिसरी यादीसाठी पसंतीक्रम : ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर
● तिसरी गुणवत्ता यादी : ५ सप्टेंबर
● तिसरी यादी प्रवेश कालावधी : ६ ते ९ सप्टेंबर
● संस्थास्तर पद्धतीने : १० ते १३ सप्टेंबर
MHT CET Admission Schedule: राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त सीईटी घेण्यात येणार आहे. या अतिरिक्त सीईटीसाठी विद्यार्थ्यांना शनिवार, २९ जून ते बुधवार, ३ जुलै या कालावधीत https:// cetcell. mahacet. org/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज नोंदणी व निश्चिती करता येणार आहे.
तसेच, या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणि माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी २९ मे रोजी परीक्षा दिली आहे. अशा विद्यार्थ्यांनाही अतिरिक्त सीईटी देण्यात येणार आहे, असे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे दोन्ही परीक्षांपैकी सर्वोत्तम असणारे पर्सेन्टाइल प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यासाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिये वेळी विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम पर्सेन्टाइलची गुणपत्रिका संगणकीय प्रणालीवर अपलोड करणे आवश्यक असेल. अतिरिक्त सीईटीची निकाल प्रक्रियासुद्धा पर्सेन्टाइल पद्धतीने करण्यात येणार आहे. अतिरिक्त सीईटी ही महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. तसेच, परीक्षेची तारीख निर्धारित वेळेत जाहीर करण्यात येईल. अतिरिक्त सीईटीची तारीख तात्काळ जाहीर करावी, अन्यथा रिक्त जागांवर विद्यापीठ व महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा करावा. याबाबत सीईटी कक्षाच्या आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली, असे मनसेचे सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.
CET Admission Process 2024
MHT CET Admission Schedule: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) च्या वतीने आतापर्यंत ९ अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे बहुतांश अभ्यासक्रमांचे प्रवेश हे जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याचे संकेत आहेत. यावर्षी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना वारंवार नोंदणी करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी एकदा नोंदणी केल्यावर त्याच लॉगिनमधून त्यांना सीईटी परीक्षांबरोबरच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करता येणार आहेत. यामुळे नोंदणीचे काम विद्यार्थ्यांचे सोपे होणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सुमारे ८ लाख विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया
प्रवेश नियामक प्राधिकरण आणि सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांच्या समन्वयातून १६हून अधिक प्रवेश परीक्षांद्वारे विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. कृषी, वैद्यकीय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण या संचालनालयांकडून प्रवेश प्रक्रियेचे नियोजन तयार करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. सुमारे ८ लाख विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबवली जाते. यावर्षी लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलला परीक्षांचे वेळापत्रक वारंवार बदलावे लागले. नियोजन केल्याप्रमाणे अगोदरच झालेल्या एमसीए, एलएलबी तीन वर्ष, एमसीटी, आर्कीटेक्चर, बीएड, एमपीएड, बीपीएड अशा ९ अभ्यासक्रमांच्या सीईटी घेवून या परीक्षांचे निकालही जाहीर केले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांचेही प्रवेश प्रक्रिया लवकर सुरु होण्याची शक्यता आहे.
पुन्हा स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागणार नाही
दरम्यान, यावर्षी सीईटी सेलने प्रवेश पूर्व नोंदणीत बदल केले आहेत. अभियांत्रिकी, कृषी, वैद्यकीय या अभ्यासक्रमांबरोबरच अन्य विधी, बीएड अशा व्यावसायिक शाखांच्या पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागते. या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सीईटीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. त्यानंतर या परीक्षांच्या निकालानंतर या गुणांवर पुढील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविली जाते. यावेळी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागत होती. विद्यार्थ्यांना आपली माहिती अनेकदा भरावी लागत होती. यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केल्यावर त्यांना प्रवेशावेळी पुन्हा नोंदणीची गरज असणार नाही. तसेच प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना यापूर्वी भरलेली माहिती पुन्हा नव्याने सादर करावी लागणार नसल्याचे यापूर्वीच सीईटी सेलने जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना सोपी असणार आहे. वारंवार नोंदणी करावी लागणार नाही. त्यामुळे प्रवेशाचा काळ कमी होवून झटपट प्रवेश प्रक्रिया सर्वच अभ्यासक्रमांची करण्याबाबत सीईटी सेलकडून हालचाली आहेत.
MAHACET Admission 2024 @ cetcell.mahacet.org
MAHA CET Admission Schedule : MahaCET Admission process for various coerces is started now. The Admission schedule is published by MahaCET Department on official website cetcell.mahacet.org. :-
महाराष्ट्र CET सेलने सामायिक प्रवेश परीक्षेचे (CET) एप्रिलमधील वेळापत्रक मेपर्यंत पुढे ढकलल्यामुळे एकाच दिवशी नीट व सीईटी परीक्षा आली होती. सीईटी सेलने ५ मे रोजी होणारी सीईटीची परीक्षा रद्द केली आहे. लोकसभा निवडणुकांमुळे सीईटीच्या एप्रिलमधील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीईटी सेलने वेळापत्रक पुढे ढकलताना ‘नीट’च्या वेळापत्रकाचा विचार केला नव्हता. नीटची परीक्षा ५ मे रोजी आहे आणि नेमकी त्याच दिवशी काही विद्यार्थ्यांची पीसीएम विषयाची सीईटी ठेवण्यात आली होती. याबाबत हजारो पालकांनी महाराष्ट्राच्या सीईटी सेलकडे मेलद्वारे तक्रारी केल्या होत्या. तारखांचा हा गोंधळ लक्षात आल्यानंतर सीईटी सेलने ५ मे रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नव्या तारखेची प्रतीक्षा (MH CET 2024 New Exam Date 2024)
सीईटी सेलने २४ मार्च रोजी सायंकाळी नीट परीक्षेदिवशी येणारी सीईटी परीक्षा रद्द केली असून, सुधारित तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नव्या तारखेची प्रतीक्षा आहे.
वेगळा पायंडा का? – दरवर्षी नीट’च्या परीक्षेनंतरच सीईटी घेतली जात होती. त्यामुळे नीटच्या तयारीला विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळत होता. नीटपूर्वी सीईटी घेण्याचा नवा पायंडा या वर्षीपासून पाडण्यात आला आहे. त्यामुळे “सीईटी-पीसीबी’ व ‘सीईटी-पीसीएम’च्या विद्यार्थ्यांना नीटच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष सीईटी सेलच्या वतीने विधि, एमबीए, बीएड, बीपीएड, एमआर्च, बी डिझाइन आदी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षा सीईटीसाठी अर्ज करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना येत्या दि. १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. ही परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षांकरिता उमेदवारांच्या नोंदणी डेटाची तपासणी केली असता अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आले, अर्ज भरण्यास विलंब झाल्यामुळे मुदतवाढ मिळावी, यासाठी अनेक उमेदवार व पालकांनी सीईटी कार्यालयास विनंती केली होती. उमेदवारांच्या हिताचा विचार करून सीईटी सेलच्या वतीने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.
प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम ांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षांकरीता उमेदवारांसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज सुरु झालेल्या व सुरु होणाऱ्या वेळापत्रकाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र या पूर्वी राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले. मात्र नियोजित वेळेत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया शनिवारी सुरू केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर अन्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर माहिती राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
Previous Details about MHT CET Admission Schedule
MHT CET Admission Schedule : The admission process for vocational degree courses under the Department of Higher Education has started and a detailed schedule has been published. Candidates seeking admission to these courses will be able to view the schedule by visiting the official website. Higher and Technical Education Minister Uday Samant tweeted about it. Further details are as follows:-
MHT CET Admission Schedule For Vocational Degree Courses Announced
उच्च शिक्षण विभागाअंतर्गत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून याचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन वेळापत्रक पाहता येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली.
आता महा सीईटीतर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता उच्च शिक्षण विभागांतर्गत बी.ए/बी एसी बी.एड इंटिग्रेटेड ४ वर्षे अभ्यासक्रम, विधी ५ वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम, बी.एड-एम.एड इंटिग्रेटेड ३ वर्षे अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. या कोर्सला प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेश परीक्षा देऊ शकतात. या तीन व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अभ्यासक्रमानिहाय वेळापत्रक सीईटीच्या संकेतस्थळावर http://mahacet.org उपलब्ध आहे. बातमीखाली अधिकृत वेबसाइटची थेट लिंक देण्यात आली आहे.
Table of Contents