महाराष्ट्र राज्य पात्रता (MH SET) ‘सेट’चा निकाल जाहीर; ७,२७३ विद्यार्थी उत्तीर्ण। MH SET Exam Result 2024

MH SET Exam Result 2024

Maha SET Result 2024 Out

MH SET Exam Result 2024: The 39th (SET) State Eligibility Examination was organized by the SET Department of Savitribai Phule Pune University on April 7 in various colleges in 17 cities. 1 lakh 9 thousand 250 students from Maharashtra and Goa participated in this exam. Out of which 7 thousand 273 students have qualified and 6.66 percent result has been obtained.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेतलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला आहे. सोमवार, ५ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता हा निकाल विद्यापीठाच्या https://setexam.unipune. ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेचच त्यांचे सेट प्रमाणपत्र वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने ३९ व्या (सेट) राज्य पात्रता परीक्षेचे ७ एप्रिल रोजी १७ शहरांमधील विविध महाविद्यालयांत आयोजन केले होते. या परीक्षेत महाराष्ट्र आणि गोव्यातील १ लाख ९ हजार २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील ७ हजार २७३ विद्यार्थी पात्र ठरले असून ६.६६ टक्के निकाल लागला आहे.

Result of M-SET held on 7th April 2024

सेट विभागाकडून 5 ऑगस्ट म्हणजे आज सायंकाळी 5 वाजता निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत 7273 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 6.66 टक्के इतका निकाल सेट परीक्षेचा लागला आहे.  सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सेट परीक्षेच्या वेबसाईटवरुन ई-प्रमाणपत्र डाऊनलोड करुन घ्यावं लागेल. याशिवाय सेट विभागानं अंतिम उत्तर तालिका देखील जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांच्या अर्ज दाखल करताना अर्जात काही त्रुटी असतील तर त्या 500 रुपये शुल्क आणि योग्य पुरावे सादर केल्यानंतर दुरुस्त केल्या जातील.

निकाल कुठं पाहणार? 

सेट परीक्षा एकूण 32 विषयांमध्ये आयोजित करण्यात आली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र आणि गोवा राज्याची कार्यकक्षा असणाऱ्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.सेट विभागाची वेबसाईट https://setexam.unipune.ac.in/Result.aspx इथं निकाल पाहता येईल.

ऑफलाईन पद्धतीनं शेवटची परीक्षा 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून आतापर्यंत 39 सेट परीक्षांचं आयोजन कण्यात आलं आहे. यापूर्वी 38 परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं झाल्या होत्या. यूजीसीच्या आदेशाप्रमाणं शेवटची ऑफलाईन परीक्षा 7 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती.  या परीक्षेत 7273 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पुढील परीक्षा 2025 मध्ये होणार आहे. ती परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. यासंदर्भात सेट विभागानं यापूर्वीच पत्रक काढून विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे.

सेट परीक्षेचा निकाल कसा पाहणार? 

स्टेप 1 : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी https://setexam.unipune.ac.in/Result.aspx या वेबसाईटला भेट द्या

स्टेप  2: परीक्षेची तारीख आणि वर्ष निवडा

स्टेप 3 : परीक्षा क्रमांक, नाव, जन्म दिनांक आणि मोबाईल क्रमांक नोंदवा

स्टेप 4:  यानंतर सबमिट करा, तुम्हाला निकाल उपलब्ध होईल.


Maha SET [email protected]

MH SET Exam Result 2024: सहाय्यक प्राध्यापक पदाच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा अर्थात सेटचा निकाल तीन महिन्यांपासून रखडला होता. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास संवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण लागू करण्याच्या मागणीमुळे विलंब झाल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले होते. अखेर आरक्षण लागू झाले असून, निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल.

महाराष्ट्र व गोवा राज्यातील (Maharashtra and Goa) वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) सेट विभागातर्फे (Set department)घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेसाठी (सेट- SET) ‘सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास संवर्गाकरिता अधिनियम 2024’ मधील तरतुदीनुसार एसईबीसी आरक्षण (SEBC reservation)लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सेट परीक्षेचा रखडलेला निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे, या वृत्तास विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विद्याथ्यर्थ्यांसह पालकांना दिलासा सेट परीक्षेला एसईबीसी आरक्षण लागू | Pune University SET Exam 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे 7 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेसाठी मराठा आरक्षण लागू करावे, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली होती. त्यावर विद्यापीठाने राज्य शासनाकडे अभिप्राय मागवला होता. गेल्या काही महिन्यांपासून राज्य शासनाकडून त्यावर उत्तर प्राप्त होत नव्हते, अखेर राज्य शासनाने यावर निर्णय दिला आहे. त्यामुळे सेट परीक्षेचा निकाल जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सेटच्या निकालासाठी 66 एसईबीसी आरक्षण लागू करण्यासंदर्भात स्पष्टीकरण आले आहे. उमेदवारांकडून एसईबीसी संवर्गाचा अर्ज भरून घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ती मुदत आणखी दोन दिवस वाढविली आहे. उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल. – डॉ. विजय खरे, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


MH SET Exam Result 2024

MH SET Exam Result 2024: प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’चा निकाल रखडल्याने उमेदवार संभ्रमात आहेत. ‘यूजीसी नेट’, ‘सीएसआयआर-नेट’ आणि वैद्यकीय प्रवेशाची ‘नीट’ परीक्षा वादात सापडल्याने ‘सेट’चे उमेदवारही हवालदिल झाले आहेत. तसेच अनेक महाविद्यालयांत सध्या तासिका तत्त्वावर प्राध्यापक भरती सुरू असून, निकालाला उशीर झाल्यास संधीला मुकण्याची शक्यता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने ७ एप्रिल २०२४ रोजी ३९वी सेट परीक्षा घेतली होती. महाराष्ट्रासह गोवा राज्यातील एक लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. जवळपास अडीच महिन्यांनंतरही सेटचा निकाल प्रलंबित आहे. या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सेटचा परीक्षार्थी असलेला आकाश वाघ म्हणाला, “जून महिन्यात अनेक महाविद्यालयांत सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती होते. मात्र सेटचा निकाल प्रलंबित असल्याने कोणत्याही पदासाठी आम्ही अर्ज करू शकत नाही. सेट विभागाने याचा विचार करून निकाल घोषित करावा, जेणेकरून सर्वांना दिलासा मिळेल.” दुसरीकडे केंद्रीय स्तरावरील परीक्षांची अनिश्चितता आणि पेपरफुटी प्रकरण बघता राज्यातही सेट बद्दल असे काही घडेल का? अशी भीती उमेदवारांमध्ये आहे. त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी तातडीने याबद्दल सेट भवनाकडून स्पष्टता करणे गरजेचे आहे

आरक्षणाच्या स्पष्टतेमुळे निकाल प्रलंबित

सेटचा निकाल तयार झाला आहे. मात्र, आरक्षणासंदर्भातील स्पष्टतेसाठी सेट विभागाने राज्य शासनाला विचारले आहे. त्याचे उत्तर आल्यानंतरच सेटचा निकाल घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात सेटचा निकाल घोषित होण्याची शक्यता आहे


MH SET April Exam Result 2024

MH SET Exam Result 2024: मित्रांनो सेट परीक्षा ७ एप्रिल रोजी संपूर्ण झाली त्याकरिता उत्तरतालिका देखील प्रकाशित करण्यात आली. परंतु अद्याप निकाल लागलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 7 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करताना त्यात मराठा आरक्षणाचा अंतर्भाव करावा ,अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली आहे.त्यावर विद्यापीठ प्रशासनाकडून यावर राज्य शासनाचा अभिप्राय घेतला जाणार आहे.त्यानंतरच सेट परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.त्यामुळे सेट परीक्षेचा निकाल मराठा आरक्षण अंमलबजावणीत अडकला असल्याचे बोलले जात आहे. या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सेट ऑफलाईन की ऑनलाईन होणार? जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेबाबत अनेकांना निर्णयाची प्रतीक्षा | Pune University SET Exam 2024

सेट परीक्षेसाठी 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांनी नोंदणी

महाराष्ट्र व गोवा राज्यात विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या सेट परीक्षेसाठी 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 1 लाख 9 हजार 154 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली.आता निकाल केव्हा जाहीर होणार ? या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत.विद्यापीठाची निकालाची तयार अंतिम टप्प्यात आहे.मात्र, विद्यापीठाच्या सेट विभागाकडे विद्यार्थ्यांनी लेखी पत्रव्यवहार केला आहे.त्यात सेट परीक्षेचा निकाल मराठा आरक्षण अंतर्भूत करून जाहीर करावा,अशी मागणी केली आहे.

निकाल कधी होणार जाहीर ?

विद्यापीठातर्फे सेट परीक्षेची जाहिरात प्रसिध्द करताना लागू असलेल्या आरक्षणानुसार दरवेळी निकाल जाहीर केला जातो.विद्यापीठाने येत्या 31 मे पर्यंत निकाल जाहीर करण्याची तयारी केली आहे.मात्र,विद्यार्थ्यांकडून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करून निकाल जाहीर करावा,अशी मागणी झाल्याने विद्यापीठापुढे पेच निर्माण झाला आहे.त्यामुळेच विद्यापीठाने शासनाकडून अभिप्राप्य घेण्याचा निर्णय घेतला आहे.


MH SET Exam [email protected]

MH SET Exam Result: The examination was conducted on 26th of March at various centers across the state. Almost one lakh 19 thousand students have given this exam and after the final answer sheet came out, all the students were waiting for the final result. The result of the Maharashtra and Goa State Teacher Eligibility Test i.e. SET has been announced on June 28. The Maharashtra Set Professor Eligibility Examination was conducted by Savitribai Phule Pune University. The result of this examination conducted for the recruitment of Assistant Professors in the state of Maharashtra and Goa has been announced. Only 6.59 percent students have qualified.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र सेट ही प्राध्यापक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती.महाराष्ट्र व गोवा राज्यात सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केवळ ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहे.

एकूण १ लाख १९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ५१ हजार ५१२ मुलं तर ६८ हजार २७६ मुलींनी नोंदणी केली. त्यापैकी अनुक्रमे ४३ हजार ५१७ व ५७ हजार ७२३ मुलामुलींनी परीक्षा दिली. मुलांचे पात्र ठरण्याचे प्रमाण ८. २० टक्के तर मुलींचे प्रमाण ५. ३८ टक्के आहे. सेटमध्ये मुली मागे पाडल्याचे चित्र आहे.

या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Result of M-SET held on 26 March 2023

तसेच १७ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यात दोन पात्र ठरले. तर ३७२ दिव्यांग व ६८ अनाथ विद्यार्थ्यांपैकी अनुक्रमे ३३७ व ६० विद्यार्थ्यांना यश आले. एकूण ७१ विषयांसाठी ही परीक्षा झाली. सेटच्या लिंकवर सविस्तर निकाल उपलब्ध आहे.

Maharashtra SET Exam Pattern And Syllabus PDF -Updated Syllabus PDF 

Maharashtra SET Exam Previous Year Paper With Answer PDF @ setexam.unipune.ac.in

महाराष्ट्र SET परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर ! MH SET Exam Answer Key

मार्च महिन्यातील २६ तारखेला राज्यभरातील विविध केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. जवळपास एक लाख १९ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, अंतिम उत्तरतालीका आल्यानंतर सर्वच विद्यार्थी अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत होते.

 

काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने लवकरच निकाल घोषीत करू असे सांगितले होते. पण त्यासंबंधीचे नोटीफिकेशन संकेतस्थळाहून हटवल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत होते. अखेरीस विद्यापीठाने सेटच्या निकालाची अधिकृत घोषण केल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. अधिक माहितीसाठी https://setexam.unipune.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.


MH SET Result 2021

MH SET Exam Result : Results of State Level Eligibility Test (MH SET Result 2021) for the post of Assistant Professor in Senior Colleges in Maharashtra and Goa were announced. Further details are as follows:-

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (MH SET Result 2021) निकाल जाहीर करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यात घेण्यात आली होती. या परीक्षेला ७९ हजार ७७४ उमदेवार बसले होते. त्यापैकी पाच हजार २९७ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

निकाल विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उत्तीर्ण उमेदवारांना सेटचे प्रमाणपत्र चार फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होतील. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रमाणपत्र यंदाही ऑनलाइन प्राप्त होतील, अशी माहिती सेट विभागाकडून देण्यात आली आहे. MH-SET परीक्षा एकूण ३२ विषयांसाठी आयोजित केली जाते. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

How to Check MH SET Exam Result

  • – पुणे विद्यापीठाची सेट परीक्षेची अधिकृत वेबसाइट setexam.unipune.ac.in येथे जा.
  • – होमपेजवरील निकालाच्या टॅबवर क्लिक करा.
  • – आता परीक्षेची तारीख आणि विचारलेली माहिती भरा.
  • – आता स्क्रीनवर तुमचा निकाल दिसू लागेल.
  • – निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट घेऊन ठेवा.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/33TQY2M


महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षाचा निकाल उपलब्ध केलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

निकाल


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड