नवीन अपडेट- औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया स्थगित! | MH CET Admission 2024
MH CET Admission 2024
MH CET Admission 2024 Updates
भारतीय औषधनिर्माण परिषदेच्या आदेशानुसार, पदवी व पदव्युत्तर पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये काही महाविद्यालयांचा समावेश न होताच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे या महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप घेतला. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने त्याची दखल घेत औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अचानक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाल्यानंतर दोन फेऱ्यांनंतर ही प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक व महाविद्यालये अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील प्रक्रियेबाबतची सूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याअनुषंगाने उमेदवार व संस्थांनी नियमितपणे कार्यालयीन संकेतस्थळाला भेट द्यावी, असे परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नोंदणी प्रक्रियेत राज्यातील ४९७ महाविद्यालयांमधील ४६ हजार ५१२ जागांसाठी ५० हजार ५५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत दोन फेऱ्या पार पडल्या असून, या दोन फेऱ्यांमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २१ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत, तर २४ हजार ५५१ जागा रिक्त आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न आणि उत्तर तालिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करून दिले आहेत. यावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्यास २२ मे पासून संकेतस्थळावर संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
उत्तर तालिका जाहिर
या परीक्षेत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास त्यांनी संकेतस्थळावर नोंदवावे, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा (सीईटी सेल) कडून करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा २२ ते ३० एप्रिलदरम्यान पीसीबी ग्रुप आणि २ ते १६ मे या कालावधीत पीसीएम ग्रुपची परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांची उत्तर तालिका आणि उमेदवारांनी सोडविलेले प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
CET च्या तारखा जाहीर, 31 मार्चपर्यंत मुदत!!
The registration process of various courses for the CET examination for the coming academic year has started through the CET cell. The CET Cell has announced the dates of CET for the Department of Higher Education, Department of Technical Education and Department of Arts Education for the academic year 2022-23. Further details are as follows:-
येत्या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षेसाठी विविध अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया सीईटी सेलमार्फत सुरु आहे. सीईटी सेलकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी उच्च शिक्षण विभाग, तंत्रशिक्षण विभाग आणि कलाशिक्षण विभागाच्या सीईटीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा ३ ते १० जून, तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ११ ते २८ जून, तर कलाशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा १२ जून रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
MH CET Admission 2022 – CET परीक्षांचे वेळापत्रक प्रकाशित
MH CET Admission 2022 : The CET Cell conducts approximately 16 CET examinations for admission to professional courses such as Engineering, Pharmacy, Agriculture, MBA, MCA, Law (three and five years), B.Ed, B.P.Ed, Architecture. Registration for this year’s exam has started, but the exam schedule has not been released yet. Further details are as follows:-
महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभागाकडून लॉ (Law) म्हणजेच कायदा अभ्या क्रमाच्या 3 वर्षाचा एलएलबी आणि 5 वर्षाचा एलएलबी अभ्यासक्रम यासाठी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 5 वर्षांचा आणि 3 वर्षांचा एलएलबी (LLB) अभ्यासक्रम एमएचसीईटी लॉ परीक्षेसाठीचा अर्ज 19 मार्च आणि 24 मार्चला जारी केला जाणार आहे. तर या प्रवेश परींक्षांसाठी अर्ज 19 मार्चपासून दाखल करता येतील. राज्यस्तरीय कायदा प्रवेश परीक्षा 17 आणि 18 मे रोजी आयोजित केली जाईल. या दिवशी 5 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा असेल. तर, 7 आणि 8 जूनला 3 वर्षीय अभ्यासक्रमासाठी परीक्षा आयोजित केली जाईल. एमएच सीईटी ल परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित केली जाईल. यासंदर्भात अधिक माहिती राज्य सीईटी सेलच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
महाराष्ट्र एलएलबी एंट्रा्स एक्झाम पात्रता
तीन वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 45 टक्केगुणांसह पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तर, राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 40 ते 42 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे.
पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी 45 टक्के गुण मिळवून राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं मान्यता दिलेल्या बोर्डातून बारावी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 40 ते 42 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे.
Post Graduate Courses
मागील अपडेट – ‘सीईटी सेल’कडून इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर, एमबीए, एमसीए, लॉ (तीन आणि पाच वर्षे), बीएड, बीपीएड, आर्किटेक्चर अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी साधारण १६ सीईटी परीक्षा होतात. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी या पात्रता परीक्षेत गुण मिळवणे अनिवार्य असते. त्यामुळे परीक्षांची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहतात. त्यामुळे ‘सीईटी सेल’ने या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार ‘सीईटी सेल’ने इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेसाठीची ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. मात्र, उर्वरित अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया; तसेच संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केलेले नाही. करोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळित झाले आहे. सीईटी परीक्षा उशिराने होत असून, त्याचा निकालही उशिराने जाहीर होत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया रेंगाळत असल्याचे चित्र आहे. शैक्षणिक वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी सीईटी परीक्षा वेळेत होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करून, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी देता येईल. नोंदणी वेळेत पूर्ण झाल्यास, परीक्षा, निकाल, प्रवेश फेऱ्या असे टप्पे वेळेत पूर्ण होतील. विद्यार्थ्यांचे प्रवेश वेळेत झाल्यास, विद्यापीठे-कॉलेज वेळेत सुरू होऊन शैक्षणिक वर्ष सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
‘१४ मार्चनंतर अर्ज नोंदणी प्रक्रिया’
Due to Corona, the CET exams were delayed this year, so the entrance exams started late. The admission process for admission to certain courses for the current academic year from CET Cell is still going on. Therefore, work is underway to plan the CET exams for the coming academic year 2022-23. Everyone should keep in mind that while planning for exams, one has to consider national level exams, recruitment exams, public holidays etc. The registration process for all the CET exams for the coming academic year will start after March 14. Exams will also be held sooner than last year. Appropriate instructions in this regard will be published on the website of CET Cell, said Ravindra Jagtap, Commissioner, CET Cell.
‘सीईटी सेल’कडून एमएचटी-सीईटी परीक्षा यंदा जून महिन्यात घेण्याचे नियोजन सुरू आहे. इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा लवकर होतील.
– रवींद्र जगताप, आयुक्त, सीईटी सेल
MHT CET Exam 2022 Syllabus And Marking Scheme Released
MHT CET Exam : State Common Entrance Examination Cell has announced the syllabus and grading scheme for Maharashtra CET Exam. Students preparing for the MHT CET 2022 exam can check the syllabus and marking scheme by visiting the official website mhtcet2022.mahacet.org. Further details are as follows:-
State Common Entrance Test Cell, MHT CET 2022
महाराष्ट्र सीईटीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना ३१ मार्चपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान सीईटी सेलतर्फे अभ्यासक्रम आणि मार्किंग स्कीम देखील जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन हा तपशील पाहता येणार आहे.
एमएचटी सीईटी २०२२ परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mhtcet2022.mahacet.org वर जाऊन अभ्यासक्रम आणि मार्किंग स्कीम तपासू शकतात. या परीक्षेची तयारी करणारे सर्व उमेदवार जाहीर केलेला अभ्यासक्रम आणि मार्किंग योजनेनुसार स्वत:ची तयारी करू शकतात. एमएचटी सीईटी २०२२ च्या अभ्यासक्रमामध्ये सीईटी प्रश्नपत्रिका तयार केल्या जाणाऱ्या विषयांची यादी देण्यात आली आहे.
MHT CET Marking Scheme
- सीईटी सेल महाराष्ट्राने एमएचटी सीईटी २०२२ मार्किंग स्कीम देखील जारी केली आहे.
- एमएचटी सीईटी परीक्षा २०२२ ही कॉम्प्युटर माध्यमातून होणार असून यामध्ये निगेटीव्ह मार्कींग असणार आहे.
- एमएचटी सीईटी २०२२ प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासाठी जेईई मेन्स (JEE Mains) च्या बरोबरीची असेल आणि जीवशास्त्राची काठीण्य पातळी नीट (NEET) च्या बरोबरीची असेल.
एमएचटी सीईटी २०२२ च्या नोटीफिकेशननुसार, एमएचटी सीईटी प्रश्नपत्रिका तयार करताना इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमाला २० टक्के वेटेज आणि बारावीच्या अभ्यासक्रमाला ८० टक्के वेटेज दिले जाईल. करोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (Maharashtra State Council for Educational Revision and Training) इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमातून भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), जीवशास्त्र (biology)आणि गणित विषयांचा काही भाग वगळण्यात आला आहे. इयत्ता अकरावी (२०२०-२१) चे विषय देखील एमएचटी २०२२ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत.
अभ्यासक्रम आणि मार्कींग स्कीम – https://bit.ly/3rIz1Nw
MHT CET Exam 2022 Application
MHT CET Exam : Application process for Maharashtra Common Entrance Exam has started. Candidates who want to sit for this exam can apply till March 31, 2022. Candidates can apply by going to the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-
महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स एक्झामसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (MHT CET Cell) विविध उच्च शिक्षणातील इंजिनीअरिं, फार्मसी, कृषी इत्यादी विषयातील अंडर-ग्रॅज्युएट (UG) आणि पोस्ट-ग्रॅज्युएट (PG) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2022 (MHT CET 2022) साठी नोंदणीची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ३१ मार्च ही एमएचटी सीईटी २०२२ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
How to Register MHT CET 2022
- महाराष्ट्र सीईटी २०२२ साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा.
- एमएचटी सीईटी २०२२ ऑनलाइन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- नवीन पेजवर ‘New Registration’ वर क्लिक करा.
- मागितलेले तपशील भरून नोंदणी करा आणि अर्ज सबमिट करा.
- महाराष्ट्र CET २०२२ नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कात सवलत दिली जाईल.
- शुल्क भरल्यानंतर उमेदवारांनी सबमिट केलेल्या अर्जाची सॉफ्ट कॉपी सेव्ह करा.
MHT CET २०२२ साठी महत्वाचे निर्देश
- उमेदवार बारावी (बारावी/समकक्ष परीक्षा) उत्तीर्ण किंवा परीक्षा देत असावा.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडे संबंधित वैध प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.
- MHT CET २०२२ च्या नोंदणीसाठी उमेदवारांनी त्यांचा सक्रिय ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरावा.
- सीईटी आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवाराकडे त्याचा/तिचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक सक्रिय असणे गरजेचे आहे.
- उमेदवाराने अंतिम सबमिशन आणि पेमेंट करण्यापूर्वी अर्ज पडताळून पाहणे आवश्यक आहे.
- सबमिट केलेला अर्ज आणि भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. त्यामुळे पैसे भरण्यापूर्वी तपशील पडताळून पाहा.
- प्रमाणपत्रासाठी फोटो, सही यांची चांगली क्वालिटी अपलोड करा.
अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org
MHT CET 2022 Registration
MHT CET Exam : Candidates are required to submit an online registration form for MHT-CET-2022 Entrance Examination as per the mentioned schedule. The start date for online registration application is 10 February 2022 and note that the last date to apply is 31 March 2022.
शैक्षणिक वर्ष २०२२-23 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी – २०२२ प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज नमूद वेळापत्रकानुसार सादर करावयाचे आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
ऑनलाईन नोंदणी अर्ज सुरु होण्याची तारीख १० फेब्रुवारी २०२२ आहे आणि लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ आहे. दिनांक १० फेब्रुवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत प्रवेश निश्चिती आणि परीक्षा शुल्क भरलेले असतील त्यांना कोणतेही विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
PDF जाहिरात – https://bit.ly/34kMeDz
अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org
MHT CET 2021 Admission Process
MHT CET 2021 Exam : The admission process for vocational courses has started from the CET cell. Candidates seeking admission to vocational degree courses can do so by visiting the official website. A notification in this regard has been issued by the State CET Cell. Further details are as follows:-
सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेश घेता येणार आहे. राज्य सीईटी कक्षाकडून यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता राज्य सीईटी कक्षाकडून तंत्रशिक्षण विभागांतर्गत बीई, बीटेक, बीएचएमसीटी, आणि डिएसई (Direct Second Year Engineering) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तसेच डिएसपी(Direct Second Year Pharmacy), B.Arch. या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी दिनांक ३ नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे.
The State Common Entrance Examination Cell (CET Cell) has announced the results of the CET examinations conducted for the first year admission of various professional degree, postgraduate courses. However, the online admission process had not started yet, so the parents-students were demanding that the admission process should start immediately before the 2021-22 academic year is disrupted.
सीईटी सेलकडून इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेटमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, लॉ, बीएड-एमएड अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाल्यावरही सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या नव्हत्या. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याने शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरु होईल. बीए, बी-कॉम, बीएसस्सी अशा पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया कॉलेजस्तरावर पूर्ण होऊन, कॉलेज सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे वर्गांमध्ये नियमितपणे तासिका होत आहे. दरम्यान व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना देखील सुरुवात झाली आहे.
इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अशा पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थी-पालकांनी सीईटी सेलच्या वेबसाइटला भेट द्यावी असे आवाहन सीईटी सेलतर्फे करण्यात आले आहे.
अधिकृत वेबसाईट – www.mahacet.orgwww.mahacet.org
वेळापत्रक जाहीर – https://bit.ly/3bvITRS
MHT-CET 2021 Re-Exam
MHT CET 2021 Exam : In view of the situation created due to torrential rains in the state, the CET examinations of MHCET and other courses will be re-taken for the students who could not appear for the examinations. Further details are as follows:-
राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत.
मराठवाड्यात पुरामुळे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा देता आली नाही त्यांनी प्रवेश परीक्षा कक्षाशी ई-मेलने संपर्क साधावा त्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल असे प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील परीक्षा केंद्रांवर MHT-CET परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना पोहोचता आले नाही.
पावसामुळे ज्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा हुकली आहे, त्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे
MHT CET 2021 Postponed
MHT CET 2021 Exam : This is important news for students preparing for the MHT CET 2021 entrance exam. Changes have been made in the dates of 5 exams to be held on 3rd October. A total of 8 lakh 55 thousand 869 students have applied for MHT CET 2021 this year. Further details are as follows:-
MHT CET 2021 च्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ५ परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यावर्षी MHT CET 2021 साठी एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ५ परीक्षांच्या तारखा JEE Advanced २०२१ या परीक्षेच्या दिवशी येत होत्या. परीक्षा केंद्रांच्या अभावामुळे परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, ३ ऑक्टोबर रोजी होणारी एमएचटी सीईटी २०२१ परीक्षा आता ८ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. या संदर्भात ताज्या अपडेटसाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर महाराष्ट्र चाचणी सेलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या
एमएचटी सीईटी २०२१ च्या ५ परीक्षांमध्ये बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी/बी प्लॅनिंग, मास्टर्स ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन आणि मास्टर्स ऑफ एज्युकेशन (तीन वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स), बॅचलर ऑफ लॉ (पाच वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) आणि बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षा ८ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
या व्यतिरिक्त, MHT CET 2021 च्या उर्वरित परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. यासाठी, राज्य कक्षाने विद्यापीठे आणि संस्थांना परीक्षांच्या अद्ययावत तारखांनुसार त्यांचे वेळापत्रक आखण्याचे आवाहन केले आहे.
MHT CET Admit Cards 2021
MHT CET 2021 Exam : Candidates applying for BTech and BE programs can download the admit card through the official website. MHT CET Admission for BTech, BE Paper will be issued soon. Further details are as follows:-
बीटेक आणि बीई प्रोगामसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. बीटेक, बीई पेपरसाठी एमएचटी सीईटी प्रवेशपत्र लवकरच जारी केलं जाणार आहे. अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (Maharashtra Common Entrance Test Cell) हॉलतिकिट अधिकृत वेबसाइट mhtcet2021.mahacet.org वर जारी करेल.
How to Download MHT CET Admit Card 2021
- B.Tech आणि BE परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी प्रथम Mhtcet2021.mahacet.org ला भेट द्या.
- त्यानंतर ‘Download’ विभागाच्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा इतर तपशीलांसह लॉगिन करा.
- प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
Table of Contents
Talati post eligibility ?
.