धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी विविध खासगी कंपन्या, उद्योग आणि आस्थापनांमध्ये १३०५ जागांसाठी विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शनिवार, 22 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता राजे लॉन्स, साक्री (जि.धुळे) येथे पार पडणार आहे.

हजारो रिक्त पदांसाठी संधी
या मेळाव्यात 1,305 रिक्त पदांसाठी 25 नामांकित कंपन्या आणि आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दहावी पास, नापास, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत. तसेच स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि शासकीय अर्थसहाय्य योजनांची माहितीही दिली जाणार आहे.
सहभागी होणाऱ्या प्रमुख कंपन्या
या रोजगार मेळाव्यात डिस्टिल एज्युकेशन, युवाशक्ती फाउंडेशन, बॉश लिमिटेड, एल अँड टी इंडिया, जैन इरिगेशन, शिवशक्ती अॅग्रोटेक, गोविंद एचआर सर्व्हिसेस, यशस्वी अकॅडमी फॉर स्कील आदी 25 नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
नोंदणी आणि अधिक माहिती
उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in किंवा www.ncs.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा, छायाचित्रे आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रतींसह रोजगार मेळाव्यात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क आणि हेल्पलाइन
अधिक माहितीसाठी 02562-295341 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा महास्वयम पोर्टलच्या टोल-फ्री क्रमांक 18001208040 वर कॉल करून मार्गदर्शन मिळवावे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















