खुशखबर! वैद्यकीय शिक्षकांची ८१६ पदे त्वरित भरण्याचे आदेश: हायकोर्टाचा आदेश!! -Medical Professor Bharti 2025
Take a Decision on Filling 816 Medical Teaching Posts: High Court Orders!!
मित्रांनो, आतच प्राप्त माहिती नुसार, वैद्यकीय शिक्षकांची ८१६ पदे लवकरच भरण्यात येणार आहे (Medical Professor Bharti 2025). निश्चितच या भरती मुळे नवीन उमेदवारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहे यात शंकाच नाही. कालच, राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील ८१६ रिक्त शिक्षक पदे भरावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सामान्य प्रशासन विभागाला दिला आहे. याबाबतचा निर्णय ११ मार्चपर्यंत घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तेव्हा लवकरच आपण नवीन भरती जाहिरातीची प्रतीक्षा करू!
गेल्या शैक्षणिक वर्षात राज्यात वैद्यकीय शिक्षकांची ९५४ नवीन पदे रिक्त झाली होती. त्यापैकी १३८ पदे भरण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली. त्यामुळे उर्वरित ८१६ रिक्त पदे भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या विकासासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर झाली. न्यायालय मित्र म्हणून अॅड. अनुप गिल्डा यांनी तर, राज्य सरकारतर्फे वरिष्ठ अॅड. फिरदौस मिर्झा आणि अॅड. दीपक ठाकरे यांनी कामकाज पाहिले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्य सरकारने ३० जानेवारी आणि ४ फेब्रुवारी रोजी विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील ३८ सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापक पदावर बढती दिली आहे. तसेच, रिक्त पदे भरण्यासाठी दोन विशेष मंडळांची स्थापना करण्यात आली आहे.
● महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक प्राध्यापकांच्या ४७९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, २९७ उमेदवारांची नावे सरकारकडे सुपूर्त केली आहेत.
● तीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी सरकारने ७ कोटी ६१ लाख रुपये मंजूर केले आहेत.