मास्टरकार्ड पुणे मध्ये तब्बल सहा हजार पदांची नोकरी, जगातील सर्वांत मोठे तंत्रज्ञान केंद्र- Mastercard Pune Bharti 2024
Mastercard Pune Bharti 2024
मास्टरकार्ड कंपनीने पुण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र (Mastercard Pune Bharti 2024) सुरू केले आहे. कंपनीच्या वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासात हे केंद्र महत्वाची भूमिका बजाविणार आहे. या ठिकाणी सुमारे सहा हजार तंत्रज्ञ आणि अभियंते कार्यरत असल्याने हे मास्टरकार्डचे हे जगातील सर्वांत मोठे तंत्रज्ञान केंद्र ठरले आहे. पुणे तंत्रज्ञान केंद्रात मास्टरकार्डचे कर्मचारी जगासमोरील गुंतागुंतीच्या तांत्रिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार्य करतात. यामुळे सुरक्षित, अखंड, आणि कार्यक्षम व्यवहारांसाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची विश्वसनीयता निश्चित होते. नवीन सुविधेचे उद्दिष्ट मास्टरकार्डचा जागतिक चमू आणि भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील परिसंस्था यांच्यातील सहकार्य वाढविण्याचे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मास्टरकार्डचे अध्यक्ष व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी एड मॅकलॉघ्लिन यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्धाटन मंगळवारी झाले. यावेळी बोलताना एड मॅकलॉघ्लिन म्हणाले की, मास्टरकार्डच्या जागतिक तंत्रज्ञान धोरणात पुण्यातील केंद्र अतिशय महत्वाची भूमिका बजावेल. आमच्या जगभरातील तंत्रज्ञान विभागांमध्ये हा महत्वाचा दुवा असेल. हे केंद्र इतर तंत्रज्ञान केंद्रासोबत जगाला आकार देणाऱ्या आणि अर्थव्यवस्थांना भक्कम करणाऱ्या क्रांतिकारी तंत्रज्ञानाची उभारणी करेल. या केंद्रात सॉफ्टवेअर विकासापासून, वित्त, विदा, विदा संरचना आणि सायबरसुरक्षा क्षेत्रातील तंत्रज्ञ कार्यरत असतील. सध्या मास्टरकार्डची पुण्यासह अर्लिंग्टन, डब्लिन, न्यूयॉर्क, सेंट लुईस, सिडनी आणि व्हँक्यूव्हर येथे तंत्रज्ञान केंद्र आहेत. पेमेंट सुरक्षा, सायबर सुरक्षा, फसवणुकीचा शोध आणि डिजिटल ओळख या माध्यमातून मास्टरकार्डच्या जागतिक सेवेत योगदान देईल. याचबरोबर भारतात वित्तीय समावेशनासाठीचा कम्युनिटी पास मंच आणि पेमेंट पासकी सेवेची सुरूवात करण्यात हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यावेळी बोलताना मास्टरकार्डचे दक्षिण आशिया अध्यक्ष गौतम अग्रवाल म्हणाले की, भारत मास्टरकार्डसाठी अतिशय महत्वाचा आहे. आम्ही डिजिटल अर्थव्यवस्थेला संपूर्ण खंडात कार्यान्वित करण्यास मदत करणाऱ्या तंत्रज्ञानासाठी भारतात गुंतवणूक केली आहे. पुण्यातील आमचे नवीन तंत्रज्ञान केंद्र हे एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतातील आमचे कर्मचारी जागतिक तांत्रिक प्रगतीला पाठबळ देत आहेत. याचबरोबर भारत सरकारची महत्त्वाकांक्षी डिजिटायझेशन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आम्ही आमच्या भागीदारांसह काम करण्यास उत्सुक आहोत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी