सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा !
Marathi Subject Compulsory
राज्यातील सर्व शाळांत मराठी विषय सक्तीचा करण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२१)करण्यात येणार आहे.याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज येथे दिली. याची अंमलबजावणी टप्याटप्याने होणार आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला असून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हा अधिनियम यापुर्वीच पारित करण्यात आला होता.त्याची अंमलबजावणी यंदापासून करण्यात येणार आहे.याची अंमलबजावणी टप्याटप्याने करण्यात येणार आहे.
अंमलबजावणी अशी होणार
वर्ष……………..वर्ग
२०२०-२१ : पहिली आणि सहावी
२०२१-२२ : दुसरी आणि सातवी
२०२०-२३ : तिसरी आणि आठवी
२०२३-२४ : चौथी आणि नववी
२०२४-२५ :पाचवी आणि दहावी a