महत्वाचा अपडेट- महाराष्ट्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा रद्द! Marathi Hindi Issue in Government Offices

Marathi Hindi Issue in Government Offices – महाराष्ट्रातील सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी २८ जून रोजी होणारी हिंदी भाषेची परीक्षा प्रखर विरोधानंतर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला.  हि एक मराठी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर मराठी भाषा अभ्यास केंद्राने विरोध केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात सरकारी अधिकाऱ्यांना हिंदी परीक्षेची गरज आहे की नाही, याची पडताळणी करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. भाषा संचालनालयाने राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. ही परीक्षा २८ जून रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. या निर्णयाला शिवसेनेचा ठाकरे गट, मनसे आणि मराठी भाषा अभ्यास केंद्राने विरोध केला. यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी सरकारी अधिकाऱ्यांसाठी होणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. १९७६ च्या नियमावलीनुसार दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. आता या परीक्षेची गरज आहे का, १९७६ चे नियम काय आहेत, याची पडताळणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मित्रानो, महत्वाचे म्हणजे १९७६ चा राजभाषा नियम (The Official Languages Rules, 1976) प्रामुख्याने केंद्र सरकारी कार्यालये आणि हिंदी भाषिक राज्यांशी संबंधित आहे. या नियमांनुसार भारताची भौगोलिक विभागणी तीन क्षेत्रांत (क, ख आणि ग) करण्यात आली आहे. हा नियम हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदीला प्राधान्य देतो, तर महाराष्ट्र सारख्या ‘ख’ क्षेत्रातील राज्यांमध्ये द्विभाषिक (Hindi + English) धोरण ठेवतो. दक्षिण भारतीय राज्यांसाठी इंग्रजीचा पर्याय खुला ठेवतो, जेणेकरून प्रशासकीय कामात अडथळा येणार नाही असा या मागचा उद्देश आहे.  तसेच केंद्र सरकारच्या कार्यालयांनी महाराष्ट्र राज्याशी किंवा राज्यातील व्यक्तींशी पत्रव्यवहार करताना शक्यतो हिंदीचा वापर करावा, पण व्यवहार सुलभतेसाठी मराठीचा वापर करण्यास प्रतिबंध नाही. १९७६ च्या नियमांनुसार महाराष्ट्र ‘ख’ क्षेत्रात असल्याने, इतर दक्षिणेकडील राज्यांच्या (‘ग’ क्षेत्र) तुलनेत महाराष्ट्रात हिंदीचा वापर अधिक होतो, पण राज्याच्या धोरणामुळे प्रशासकीय कामात मराठीलाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.

Marathi Hindi Issue in Government Offices

  • ‘क’ क्षेत्र (Region A): उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली इत्यादी (येथे पूर्णपणे हिंदीचा वापर अपेक्षित आहे).
  • ‘ख’ क्षेत्र (Region B): महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि चंदीगड (येथे हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांचा वापर होतो).
  • ‘ग’ क्षेत्र (Region C): दक्षिण भारतीय राज्ये आणि पश्चिम बंगाल, ओरिसा इत्यादी (येथे प्रामुख्याने इंग्रजीचा वापर होतो).

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड