महत्वाचा अपडेट – २०२५ पासून शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल! – Major Changes in Teacher Training Courses!
Major Changes in Teacher Training Courses!
केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) नियमन २०२५ ला मान्यता दिली असून, त्यामुळे शिक्षक होण्याच्या अभ्यासक्रमात मोठे बदल होणार आहेत. जवळजवळ ११ वर्षांनंतर शालेय शिक्षण क्षेत्रात हे महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. नवीन नियमानुसार पदव्युत्तर पदवीधरांसाठी एक वर्षाचा बी.एड., पदवीधरांसाठी दोन वर्षांचा बी.एड., बारावीनंतर चार वर्षांचा बी.एड., तसेच एम.एड. अभ्यासक्रमालाही मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दहा वर्षांनंतर एक वर्षाचा बी.एड. पदवी कार्यक्रम पुन्हा सुरू होत आहे.
NCTE नियमन २०२५ हे NEP 2020 आणि विकसित भारत २०४७ या उद्दिष्टांनुसार तयार करण्यात आले आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार शालेय शिक्षण चार स्तरांमध्ये विभागले गेले असून, त्या प्रत्येक टप्प्यासाठी विशेष प्रशिक्षित शिक्षक तयार करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, शिक्षकांसाठी स्वतंत्र बी.एड. कार्यक्रम सुरू करून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नवीन नियमानुसार सर्व अभ्यासक्रम क्रेडिट फ्रेमवर्क पद्धतीने आखले गेले असून, त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), व्यावसायिक शिक्षण आणि नव्याने विकसित होत असलेल्या क्षेत्रांचा समावेश केला आहे. याशिवाय पूर्णवेळ आणि अर्धवेळ एम.एड. अभ्यासक्रमातही सुधारणा करण्यात आली आहे.
NCTE नियमन लागू होण्यापूर्वी ७५० महाविद्यालयांमध्ये दोन वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रम उपलब्ध होता. आता या महाविद्यालयांना बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियम पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांमधील बी.एड. अभ्यासक्रम बंद करण्यात येईल, त्यासाठी चार वर्षांची मुदत देण्यात आली आहे.
२०२५ पासून चार नवीन स्पेशलायझेशन!
चार वर्षांचा बी.एड. पदवी कार्यक्रम आणि पदव्युत्तर पदवीधरांसाठी एक वर्षाचा बी.एड. पुन्हा सुरू करण्यात आला आहे. तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या बी.एड. कोर्समध्ये प्रवेश घेण्याची संधी असेल. याशिवाय बीए-बी.एड., बीएस्सी-बी.एड., बीकॉम-बी.एड. या अभ्यासक्रमांमध्ये २०२५ पासून चार नवीन स्पेशलायझेशन – शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, योग शिक्षण आणि संस्कृत शिक्षण – समाविष्ट करण्यात येणार आहेत. शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्कृष्ट संधी असलेला प्रीमियम अभ्यासक्रम ठरणार आहे.