महिला मेळाव्याची तयारी पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ५० हजार महिला राहणार उपस्थित
Mahila Melava Female Fair
कोरोचीत महिला मेळाव्याची तयारी पूर्ण – हातकणंगले येथील कोरोची माळ येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या महिला मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. महिला दिनानिमित्त शुक्रवारी (दि.८) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. मेळाव्यासाठी जवळपास ५० हजारांहून अधिक महिला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व बचत गटांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यांना आणण्यासाठी विशेष सोय केली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत विविध योजनांचा प्रारंभ आणि महिला मेळावा होत आहे. मुख्यमंत्री या मेळाव्यातून महिलांशी संवाद साधणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
मेळावा झाल्यानंतर माणगाव (ता. हातकणंगले) येथील लंडन हाऊसचे लोकार्पण आदींसह विविध कार्यक्रमही होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह महिला व बालकल्याण मंत्री, जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत चव्हाणवाडी माळावर हा मेळावा होणार आहे. कोरोची माळावर मेळाव्यासाठी भव्य तीन मंडप उभारले आहेत. महिलांना खुच्र्यांवर बैठक व्यवस्था केली आहे. अल्पोपहाराचीही सोय आहे. प्रशासनाने काटेकोरपणे नियोजन केले आहे. वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली आहे. वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी अनेक मार्ग बदलण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ज्या मार्गे येणार आहेत त्या मार्गावर कार्यकर्त्यांनी मोठे शुभेच्छापर होर्डिंग्ज लावले आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.