WCD Result – Mahila Bal Vikas Vibhag Result
महिला व बालविकास विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेला वेग देण्यात यावा. विशेषतः वर्ग ३ व ४ च्या सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भात परीक्षांचे निकाल तातडीने जाहीर करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या. विभागातील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा निकाल अंतिम टप्प्यात असून, निकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदे भरून सेवा वितरण अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक, वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देत, निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाला अधिक बळकटी मिळणार असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही गुणवत्ता वाढणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

महिला व बाल विकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची संगणकाधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील ऑनलाईन परीक्षा दि. १० फेब्रुवारी २०२५ ते दि. १३ फेब्रुवारी २०२५ तसेच दि. १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा पदनिहाय आणि संवर्गनिहाय निकाल www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर दि. २ जून २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासोबतच परिविक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) आणि कनिष्ठ काळजीवाहक या संवर्गांच्या तात्पुरत्या प्रतीक्षा याद्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या या तात्पुरत्या प्रतीक्षा यादीबाबत आक्षेप असल्यास, संबंधित उमेदवारांनी ते प्रसिद्धीपत्रकाच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे-२८, राणीचा बाग, व्हीआयपी सर्किट हाऊस शेजारी (बार्टी कार्यालय परिसर), पुणे-४११००१ या पत्त्यावर लेखी स्वरूपात सादर करावेत. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तात्पुरत्या प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांची कागदपत्र पडताळणी वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे.
WCD Result – Mahila Bal Vikas Vibhag Result
महिला व बाल विकास विभागाकडील सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने १. संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित) २. संरक्षण अधिकारी कनिष्ठ ३. वरिष्ठ लिपीक ४. कनिष्ठ काळजी वाहक ५. वरिष्ठ लिपीक काळजी वाहक या संवर्गाकरीता तात्पुरत्या निवड/ प्रतिक्षा यादीमध्ये नमुद उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दि. १६-९-२०२५ ते दि.१८-९-२०२५ या कालावधीत आयोजीत करण्यात आलेली होती. उक्त नमुद ५ संवर्गाच्या कागदपत्र पडताळणी करीता जे उमेदवार अनुपस्थित होते, अशा उमेदवारांना नैसर्गिक न्याय तत्वानुसार कागदपत्र पडताळणी साठी उपस्थित राहण्यास अंतिम संधी देण्यात येत आहे. उक्त नमुद कालावधीत कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थितीत राहिलेल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक ०८-१०-२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता नमुद ठिकाणी उपस्थित रहावे.
कागदपत्र पडताळणीसाठी संबधीत उमेदवार पुनश्चः अनुपस्थित राहिल्यास त्यांना त्यांना भरती प्रक्रियेसाठी अपात्र ठरविण्यात येईल व भविष्यात त्यांचा संबधीत पदावर नियुक्तीकरीता कोणताही हक्क राहणार नाही. संबधीत उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या अनुषंगाने www.wcdcommpune.com या संकेतस्थळावरील दिनांक ०२-०९-२०२५ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकात दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

WCD Result – Mahila Bal Vikas Vibhag Result -In accordance with the direct service recruitment process of the Women and Child Development Department, the provisional selection and waiting list for the post of 1. Protection Officer Group B (Non-Gazetted) 2. Senior Caregiver Group-D has been published on 15-7-2025. The provisional selection list for the cadre of 1. Probation Officer 2. Senior Clerk/Statistical Assistant 3. Protection Officer (Junior) 4. Junior Caregiver was published on 7-8-2025. Accordingly, the document verification of the candidates mentioned in the provisional selection and waiting list for the cadre of Probation Officer, Group C is being done as per the following schedule. The schedule for document verification of the remaining cadres will be published as and when available.
महिला व बाल विकास विभागाकडील सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने १. संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) २. वरिष्ठ काळजी वाहक गट-ड या पदाची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी दिनांक १५-७-२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. १. परिविक्षा अधिकारी २. वरिष्ठ लिपीक/सांख्यिकी सहायक ३. संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) ४. कनिष्ठ काळजी वाहक या संवर्गाची तात्पुरती निवड यादी दिनांक ७-८-२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आली. त्यानुसार परिवीक्षा अधिकारी, गट क या संवर्गाकरीता तात्पुरत्या निवड व प्रतिक्षा यादीमध्ये नमुद उमेदवारांची कागदपत्र पडताळणी खालील वेळापत्रकानुसार करण्यात येत आहे. उर्वरीत संवर्गाच्या कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक यथावकाश प्रसिध्द करण्यात येणार आहे.

कागदपत्र पडताळणीचे स्थळ –
म. गांधी प्रशासन व प्रशिक्षण संस्था, पुणे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य (समाजकल्याण) आयुक्तालय आवार, ३ चर्च रोड, आगरकर नगर (लँड मार्क-पोलीस आयुक्त कार्यालया शेजारी)
पुणे ४११००१ (प्रवासाचे जवळचे ठिकाण -पुणे रेल्वे स्टेशन – अंदाजे ८०० मीटर.)
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















