महिला बालविकास विभागात तब्बल 18 हजार 882 पदांची भरती, अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या जाहिराती आल्या!
Mahila Bal Vikas recruitment Process 2025
महिला व बालविकास विभागानं (Women and Child Development Department) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या विभागात 18 हजार 882 पदांची भरती होणार आहे. या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री अदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका व 13243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18882 पदांची भरती करण्यात येणार आहे.14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीनं राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली.महाराष्ट्र शासनाने ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८८८२ पदांची भरती करण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. कारण 18882 पदांची भरती या महिला आणि बालविकास विभागात होणार आहे. अद्याप विभागानं याबाबतच्या कोणत्याही तारखा निश्चित केल्या नाहीत. यासंदर्रभातील भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याचे सागंण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळं महिला उमेदवारांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.