महावितरण कंपनीत 25 हजाराहून अधिक जागा रिक्त
MahaVitaran Vacancies
MahaVitaran Vacancies : Inconsistent role in filling vacancies in power companies – महावितरण व इतर दोन कंपन्यातील रिक्त जागा भराव्यात याकरिता गेले १० वर्ष सतत आंदोलन सुरु असून, सध्या महावितरण कंपनीत २५ हजार वर वर्ग-३ व ४ मधील पदाच्या जागा रिक्त आहेत. शिवाय उर्वरित जागाही रिक्त आहेत. मात्र या जागा भरण्याबात ठोस निर्णय घेतला जात नाही. परिणामी ४ जानेवारी रोजी प्रकाशगड समोर राज्यातील हजारो बेरोजगार विघुत-सहाय्यक भरती तात्काळ करावी म्हणून आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून देण्यात आली.
विद्युत-सहाय्यक पदाच्या नोकरीच्या प्रतिक्षेत असलेले हजारो उमेदवार नियुक्तीची वाट पहात आहेत. महापारेषणमध्ये ८५०० नवीन व रिक्त पदे भरणारही घोषणा झाली आहे. गेले १० वर्ष आकृतिबंध आराखडा मजुंर होवुन लागु होवु शकला नाही. कधी लागु होईल हे कोणी सागु शकत नाही. मग ८५०० जागा कशा भरणार? हा प्रश्न आहे. रिक्त जागाच्या कामाचा ताण कार्यरत लाईनस्टॉप व यंत्रचालक वर्गावर येत आहे. २०१४ मध्ये २५०० उपकेंद्र-सहाय्यक पदाची जाहिरात निघाली. मात्र ती भरती पूढे रद्द झाली.
२०१९ मध्ये विघुत-सहाय्यक व उपकेंद्र-सहाय्यक ७ हजार पदाची भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. वर्ष होत आले तरी राज्य सरकार व महावितरण कंपनीचे प्रशासन विविध कारणे देत विघुत-सहाय्यक पदाची भरतीची प्रक्रिया पूर्ण करत नाही. पगारवाढ करार करताना तिन्ही कंपनीचे व्यवस्थापनाने प्रत्येक वर्षी टप्प्याने टप्प्याने रिक्त जागा भरण्याचे मान्य केले होते. तो शब्द पूर्ण होताना दिसत नाही, अशी खंत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून व्यक्त करण्यात आली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सोर्स : लोकमत