महत्वाचे! – महावितरण भरती प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर होणार!! – MahaVitaran Bharti Result 2025

MahaVitaran JA Bharti Result www.mahadiscom.in

MahaVitaran Junior Assistant Bharti Result 

मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, २७ महावितरण कंपनीतर्फे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे सहायक अभियंता (वितरण/स्थापत्य) पदासाठी ३४२ अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. या निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी दरम्यान काही उमेदवार अपात्र ठरले, तर काही उमेदवार नियुक्ती पत्र मिळूनही विहित मुदतीत रुजू झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर, महावितरण कंपनीच्या नियमानुसार प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ही प्रतीक्षा यादी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर www. mahadiscom.in प्रसिद्ध केली जाईल. महावितरणने जाहिरात क्र. ०७/२०२३ अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधारकांसाठी (वितरण ३०२ पदे, स्थापत्य ४० पदे) एकूण ३४२ सहायक अभियंता पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली होती. यानुसार १४ जानेवारी २०२५ रोजी निवड यादी जाहीर करण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

९१ उमेदवारांची निवड – महावितरणकडून कनिष्ठ अभियंता पदासाठी अभियांत्रिकी पदविकाधारक एकूण ९१ उमेदवारांची (वितरण-६०, स्थापत्य-३१) निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये सरळ सेवा भरतीतून ७२ तर अनुकंपा तत्त्वावरून १९ उमेदवारांची निवड करण्यात आली. संबंधित उमेदवारांच्या अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून परिमंडल स्तरावर त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून, तेथेच त्यांची रिक्त पदांवर पदस्थापना केली जात आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महावितरणमधील सहायक व कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रियेला गती मिळाली असून, प्रतीक्षा यादी जाहीर झाल्यानंतर अनेक नव्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी महाभरतीला नियमित भेट द्यावी.


महावितरण द्वारे कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर केले आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामधील नोंदी/अर्हता संबंधितांच्या कागदपत्रांची/ प्रमाणपत्रांची छाननी पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडळ कार्यालयामार्फत दि. ३०/०१/२०२५ ते दि. ३१/०१/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरु करण्यात येईल. सबब, सोबत जोडण्यात आलेल्या यादीमधील उमेदवारांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये उपरोक्त कालावधीमध्ये सकाळी १०.०० वाजता उमेदवारांनी कागदपत्र / प्रमाणपत्रांसह स्वतः हजर राहणे अनिवार्य राहील. अधिक माहित आणि यादी खालील लिंक वर उपलब्ध आहे.

 

👉महावितरण कागद्पत्र पडताळणी यादी पाहा👈 

 


 

MahaVitaran Bharti Result: Mahavitaran had taken written exam on 16,17, 18 October 2024. Those candidates who have appeared for this exam can check Mahavitaran Bharti Result from give Pdf fil.

महावितरणने पदविका JA पदांसाठी परीक्षा  16,17, 18 October 2024 रोजी घेतली होती. ज्या उमेदवारांनी हि परीक्षा दिली ते,खालील लिंकवरून महावितरण भरतीचा निकाल खालील PDF फाईल मध्ये बघू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

👉महावितरण निकाल पाहा👈 

 

 


Previous update – मागील अपडेट्स

Mahavitaran Bharti Document Verification Schedule 2023

SCHEDULED 13.12.2023

between 11.00 to 16.00

VENUE

Technical Establishment Section,  4th  floor   MSEDCL,   Corporate  Office, VENUE                  Prakashgad. Aanant Kanekar Road, Bandra (East) Mumbai- 400051

 

Download Mahavitaran Documet Verification List and Schedule

MahaVitaran Bharti Result

जाहिरात क्र. ०४/२०१९ : आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातून “विद्युत सहाय्यक पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळनिहाय प्रतिक्षा यादी

१महावितरण कंपनीमध्ये “विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता तीन वर्षाच्या निश्चित कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्याकरिता जाहिरात क्र. ०४/२०१९ ही माहे जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती.

मा. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात सिव्हिल अपील क्र. ३१२३/२०२० प्रकरणी दि. ०५/०५/२०२१ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दि. ०५/०७/२०२१ अन्वये भरती प्रक्रिया राबविण्या संदर्भात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने ई.डब्ल्यू.एस. प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गाचा निकाल दि. ०१/१०/२०२१ रोजी प्रसिद करण्यात आला होता, निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळामध्ये दि. २१-२२/१०/२०२१ रोजी पूर्ण करण्यात येऊन नियुक्तीची कार्यवाही करण्यात आली .

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र. २६६३/२०२१ संदर्भात मा. न्यायालयाने दि. २२/०७/२०२२ रोजी दिलेल्या निर्णयानुसार व मा. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका क्र. २००५/२०२२ यामध्ये दिलेल्या आदेशानुसार “विद्युत सहाय्यक पदांची सुधारीत निवड यादी तसेच मा. महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार “विद्युत सहाय्यक पदाची समांतर आरक्षणासहीत सुधारीत प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. नव्याने निवड झालेल्या उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येऊन सदर यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आली आहे.

सोबत जोडण्यात आलेल्या परिमंडळनिहाय प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमुद केलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये दि. २२/२०/२०२३ ते २३/२०/२०२३ या कालावधीत कागदपत्रे पडताळणीकरिता स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य राहील. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरीता हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल व त्यांच्याशी भविष्यात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही अथवा त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यादी पहा


जाहिरात क्र. ०४/२०१९ : आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातून “विद्युत सहाय्यक” पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळनिहाय प्रतिक्षा यादी. 

मा. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात सिव्हिल अपील क्र. ३१२३ / २०२० प्रकरणी दि. ०५/०५/२०२१ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दि. ०५/०७/२०२१ अन्वये भरती प्रक्रिया राबविण्या संदर्भात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने ई.डब्ल्यू. एस. प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गाचा निकाल दि. ०१/१०/२०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळामध्ये दि. २१-२२/१०/२०२१ रोजी पूर्ण करण्यात येऊन नियुक्तीची कार्यवाही करण्यात आली.

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र. २६६३ / २०२१ संदर्भात मा. न्यायालयाने दि. २९/०७/२०२२ रोजी दिलेल्या निर्णयानुसार व मा. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका क्र. २००५/२०२२ यामध्ये दिलेल्या आदेशानुसार “विद्युत सहाय्यक पदाची सुधारीत निवड यादी तसेच मा. महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार “विद्युत सहाय्यक’ पदाची समांतर आरक्षणासहीत सुधारीत प्रतिक्षा यादी ई.डब्ल्यु. एस. प्रवर्ग वगळता प्रसिध्द करण्यात आली आहे. नव्याने निवड झालेल्या उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी प्रसिध्द करण्यात येऊन सदर यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी माहे ऑक्टोंबर २०२२ मध्ये करण्यात आली आहे.

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. २६६३ / २०२१ संदर्भात दि. २९.०७.२०२२ रोजी दिलेल्या अंतिम न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयात एस. एल. पी. क्र.२१२३८ – २१२४५ / २०२२ दाखल केली होती. मा. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दि. २४.०१.२०२३ रोजी दिलेल्या अंतिम न्यायनिर्णयान्वये आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळनिहाय निवड यादी प्रसिध्द करण्यात येऊन दि. ११-१२/०५/२०२३ या कालावधीत उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात आलेली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

यादी पहा

 


MahaVitaran Bharti Result : MahaVitaran have announced circular-wise list of two advertisements viz., Electrical Assistant Advertisement No. 05/2014 and Sub-Centre Assistant Advertisement No. 05/2019 through Mahavitaran for appointment to the post of surplus. In this SEBC According to the district-wise list for sub-center assistant post from the category, the document verification of the candidates will be conducted between 20th to 22nd of February.

महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक ०५/२०१४ तसेच उपकेंद्र सहाय्यक जाहिरात क्रमांक ०५/२०१९ या दोन जाहिरातीची त्यांनी अधिसंख्य पदावर नियुक्ती करीता परिमंडळ निहाय यादी जाहीर करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नवीन प्रकाशित झालेले संपूर्ण निकाल

यामध्ये एस.ई.बी.सी. प्रवर्गातून उपकेंद्र सहाय्यक पदावर परिमंडळ निहाय यादी त्यांनी दिली आहे त्यानुसार उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. अशाच प्रकारे ई.एस.बी.सी प्रवर्गातून विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती करिता परिमंडळ निहाय यादी त्यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे

List Of Documents Reuired For Document Verification

निवड झालेल्या उमेदवारांनी खाली दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकीत केलेले छायांकीत प्रतींसहीत कागदपत्रे तपासणीसाठी हजर रहावे :-
i) ऑनलाईन फॉर्म (ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन फॉर्मची प्रत उपलब्ध करुन देण्यात येईल.)
ii) एस. एस. सी. गुणपत्रक व प्रमाणपत्र.
आय. टी. आय. प्रमाणपत्र (Electrician / Wireman)/ सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector) प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी.
iv) शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अन्वये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर वीजतंत्री/ तारतंत्री व्यवसायातील अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector) मधील राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्लीकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र.
v) राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर संबंधित वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायातील अथवा इलेक्ट्रीकल सेक्टरमधील विद्युत क्षेत्रातील दोन वर्षाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र.
vi) समांतर आरक्षणाच्या पृष्टयर्थ सक्षम प्राधिकाऱ्याकडून विहित केलेले प्रमाणपत्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंदी केली असल्यास त्या सर्व प्रकारच्या समांतर आरक्षणाचे विहित केलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
vii) अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडुंनी ऑनलाईन अर्जामध्ये एकापेक्षा जास्त खेळाच्या प्राविण्य प्रमाणपत्राबाबत नमूद केले असल्यास उमेदवाराने सर्व खेळांचे प्राविण्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

viii) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
ix) सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र

ADVT. NO. 05/2019 –  ZONE- WISE ALLOCATION OF SEBC CATEGORY CANDIDATE FOR APPOINTMENT ON SUPERNUMERARY BASIS FOR THE POST OF UPKENDRA SAHAYAK – Click Here 

ADVT. NO. 05/2014 –  ZONE WISE ALLOCATION OF  ESBC CATEGORY CANDIDATES FOR APPOINTMENT ON SUPERNUMERARY BASIS FOR THE POST OF VIDYUT SAHAYAK – Click Here 


MahaVitaran Bharti Result | MAHADISCOM Result

MahaVitaran Bharti Result: Maharashtra State Electricity Distribution Company Limited has been declared the waiting list for “Sub Center Assistant” posts. Click on the link below to download the list.

Mahavitaran Upkendra Sahayak Bharti Revised Wait List Declared

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ने उपकेंद्र सहाय्यक पदाची सुधारित प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. प्रतीक्षा यादी  डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. सदर भरती अंतर्गत 2000 पदे भरण्यात येणार आहेत. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MAHADISCOM Upkendra Sahayak Result 2022 

सुधारीत प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी सोबत जोडलेली आहे. सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमुद नोंदी / अर्हता संबधीतांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी दि. २९/११/२०२२ ते दि.३०/११/२०२२ रोजी करण्यात येणार आहे.

सोबत जोडण्यात आलेल्या परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर रकाना क्र. ८ मध्ये नमूद केलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये उमेदवारांनी उपरोक्त नमूद कालावधीत कागदपत्र पडताळणीकरिता स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य राहील. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरीता हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल व त्यांच्याशी भविष्यात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही अथवा त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

MAHADISCOM Upkendra Sahayak Recruitment Result 

Article Category Result
Exam Conducting Board Maharashtra State Electricity Distribution Company Ltd
Exam Conducted for Upkendra Sahyak
Total Number of Vacant Posts 2000
Exam Conducted on 25th August 2019
Result Status Active
Result Releasing mode Online
Website to check result www.mahadiscom.in

MahaDiscom Upkendra Sahayak Bharti Result Bharti 2022 – Important Documents 

निवड झालेल्या उमेदवारांनी खाली दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकीत केलेले छायांकीत प्रतींसहीत कागदपत्रे तपासणीसाठी हजर रहावे :-

  1. ऑनलाईन फॉर्म (ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन फॉर्मची प्रत उपलब्ध करुन देण्यात येईल.)
  2. एस. एस. सी. गुणपत्रक व प्रमाणपत्र.
  3. आय. टी. आय. प्रमाणपत्र (Electrician / Wireman) / सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector ) प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी.
  4. शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अन्वये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर वीजतंत्री/ तारतंत्री व्यवसायातील अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector) मधील राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्लीकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र.
  5. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर संबंधित वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील अथवा इलेक्ट्रीकल सेक्टरमधील विद्युत क्षेत्रातील दोन वर्षाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र. (If applicable)
  6. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडुंनी ऑनलाईन अर्जामध्ये एकापेक्षा जास्त खेळाच्या प्राविण्य प्रमाणपत्राबाबत नमूद केले असल्यास उमेदवाराने सर्व खेळांचे प्राविण्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  7. प्राविण्यप्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निर्णय दि. १८/०८/२०१६ अन्वये क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणी दिवशी सादर करणे अनिवार्य आहे अथवा क्रीडा अर्हतेनुसार सदर पदासाठी अर्ज करताना खेळाडूने उप संचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे प्रमाणपत्र पडताळणी करुन मिळणेबाबत केलेल्या अर्जाची पोच पावती सादर करावी. अन्यथा सदर उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  8. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate )
  9. सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. (If applicable) X) जाहिरात क्र. ०५/२०१९ च्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे.

MAHADISCOM Upkendra Sahayak Result 2019

यादी डाउनलोड करा – https://cutt.ly/i1sVpFB

MSEDCL BhartiResult 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. गणेश काळूराम मोरे says

    गणेश काळूराम मोरे मु.पो.केम ता.करमाळा जि सोलापूर मी बारावी झाली आहे जाब मिळेल

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड