JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

शिक्षक पात्रता परीक्षा 2025 उत्तीर्णांसाठी मोठी अपडेट; प्रमाणपत्र वाटप 18 मेपासून – MAHATET Result mahatet.in

MAHATET Result 2026 Update

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्र वितरणास 18 मे 2026 पासून सुरुवात होणार आहे. MAHATET 2025 चा अंतिम निकाल 3 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आला होता. पात्रता प्रमाणपत्रांचे वितरण 18 मे ते 8 जून 2026 या कालावधीत संबंधित जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किंवा मुंबई शिक्षण निरीक्षक कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. उमेदवारांनी www.mscepune.in या संकेतस्थळावरील सूचना वाचून आवश्यक मूळ कागदपत्रांसह संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी


MAHATET Final Result 2025 @ mahatet.in

उद्याच्या पिढीला घडवणाऱ्या शिक्षकांची पात्रता ठरवणाऱ्या महा-टीईटी परीक्षेचा २०२५चा निकाल जाहीर झाला असून, या निकालाने संपूर्ण शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे. राज्यातील लाखो उमेदवारांनी अपेक्षेने दिलेल्या या परीक्षेत केवळ ११.२८ टक्के उमेदवारच उत्तीर्ण झाले आहेत. तर तब्बल ३ लाख ९६ हजारांहून अधिक उमेदवार नापास ठरल्याने ‘गुरुजीच नापास?’ असा सवाल उपस्थित होत आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी महा-टीईटीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले, तर सुमारे २८ हजार ९३९ उमेदवार गैरहजर राहिले. अंतिम निकालात फक्त ५० हजार ३६९ उमेदवार पात्र ठरले असून, उर्वरित ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहेत.

 

पेपर १ आणि पेपर २ या दोन्ही स्तरांवर नापासांचे प्रमाण चिंताजनक आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी असलेल्या पेपर १ मध्ये २ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये उपस्थित उमेदवारांपैकी केवळ सुमारे ११.४७ टक्केच यशस्वी झाले. पेपर २ म्हणजे इयत्ता सहावी ते आठवीसाठीच्या परीक्षेतही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. या पेपरचा निकाल ११.१३ टक्क्यांवरच मर्यादित राहिला. माध्यमनिहाय आणि विषयनिहाय निकाल पाहिल्यासही मोठी तफावत दिसून येते. कन्नड माध्यमाचा निकाल तुलनेने चांगला असून, तो १५ टक्क्यांच्या पुढे आहे. मराठी, हिंदी आणि तेलुगू माध्यमाचा निकाल सरासरीच्या आसपास आहे. मात्र उर्दू, इंग्रजी आणि विशेषतः गुजराती माध्यमाचा निकाल अत्यंत कमी टक्केवारीत आहे. गणित-विज्ञान आणि सामाजिक विज्ञान या विषयांमध्येही अपेक्षेपेक्षा कमी निकाल लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)-2025, दि.23/11/2025 रोजी पार पडलेली असून, सदरील परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि.19/12/2025 रोजी प्रसिध्द केली होती. प्राप्त हरकतीच्या अनुसार अंतिम उत्तरसूची दि. 12/01/2026 रोजी च तनुषंगिक शुध्दीपत्रक दि.02/02/2026 रोजी जाहिर करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2025 चा अंतिम निकाल दि. 03/02/2026 रोजी परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Click Here To Download MAHATET Final Result 2025

 

TET Result

Steps to Download MAHA TET Final Result 2025:

  1. Visit the Official Website: Go to mahatet.in.
  2. Locate the Link: Click on the link for “MAHA TET Result 2025“.
  3. Log In: Enter your Application Number/User ID and Password on the login page.
  4. View and Download: Your scorecard or result PDF will appear. Download the result and print it for future reference.

MAHATET Final Result 2025 @ mahatet.in

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचा अंतरिम निकाल उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु, अंतिम निकाल केव्हा लागणार? याबाबत उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता हा निकाल मंगळवारी ३ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदा निकालाचा टक्का देखील वाढणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील सूत्रांनी दिली आहे.

सर्वोच्च निर्णयानंतर सर्वच शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या टीईटीला प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची संख्या चांगलीच वाढली. या परीक्षेसाठी राज्यभरातील ४ लाख ७५ हजार ६६८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. राज्यातील १४२० परीक्षा केंद्रांवर या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर परीक्षेची उत्तरसूची जाहीर केली, नंतर उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये अंतरिम निकाल पाहण्यास उपलब्ध करून दिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेच्या निकालात सुमारे दहा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, सीटीईटी परीक्षा जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रशिक्षणाच्या दिवशी येत असल्याने सीटीईटी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केली जात आहे. तर, सीटीईटीपूर्वी टीईटीचा निकाल जाहीर करावा, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार परीक्षा परिषदेने टीईटीच्या अंतिम निकालाची तयारी पूर्ण केली आहे. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकल्यामुळे संबंधित प्रश्नांचा गुण वजा करून उमेदवारांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या गुणोत्तरात बदल होणार आहे.

नोकरी टिकविण्यासाठी टीईटी उत्तीर्ण आवश्यक:

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकांना नोकरी टिकविण्यासाठी तसेच पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे टीईटीत उत्तीर्ण होण्यासाठी सेवेत कार्यरत असणारे सर्वच शिक्षक प्रयत्न करीत आहेत. परीक्षा परिषदेकडून टीईटीचा अंतिम निकाल केव्हा लागणार, याची वाट सर्व उमेदवार पाहत आहेत. मंगळवारी निकाल जाहीर होणार असल्याने आपण उत्तीर्ण झालो किंवा नाही, हे सर्व उमेदवारांना समजणार आहे.


MAHATET Final Result 2025 @ mahatet.in

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसह आक्षेपासाठी २१ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
टीईटी २३ नोव्हेंबर २०२५ ला झाली होती. या परीक्षेसाठी पेपर १ व २ साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवार / परीक्षार्थीचा अंतरिम निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षार्थीना हा निकाल त्यांच्या लॉगइनद्वारे ऑनलाइन पाहता येईल. अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी अथवा त्रुटी / आक्षेप असल्या संबंधित उमेदवारांनी लॉगइनद्वारे २१ जानेवारी २०२६ पर्यंत सायंकाळी ६ पर्यंत नोंदवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.

 

 


 

MAHATET Final Result 2025 @ mahatet.in

 

शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शुक्रवारी जाहीर केला. त्यावरून पात्र होणाऱ्या उमेदवारांची संख्या यंदा वाढणार आहे, असे दिसते. गेल्या काही वर्षांचा विचार करता टीईटीचा निकाल अवघा तीन ते साडेतीन टक्के लागत होता, यंदा काहीशी दिलासादायक स्थिती असण्याची शक्यता आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभर २३ नोव्हेंबर रोजी ३७ केंद्रांवर टीईटी परीक्षा घेतली. अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. या परीक्षेच्या पेपर १ आणि २ प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरांबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास नोंदवण्याची मुदत २७डिसेंबरपर्यंत दिली होती. मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची १३ आनेवारी रोजी प्रसिद्ध केली गेली. आता अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.  शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी करण्यात आले होते. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ पेपर क्र. १ व पेपर क्र. २ ची अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १२/०१/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.
तरी पेपर क्र. १ व पेपर क्र. २ साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवार/परीक्षांचा अंतरिम निकाल दिनांक १६/०१/२०२६ रोजी http://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवार/परीक्षर्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी ६.०० वाजल्यापासून पाहता येईल. अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी/आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर दिनांक १६/०९/२०२६ ते दिनांक २१/०१/२०२६ रोजी सांयकाळी ६.०० वाजे पर्यंत उमेदवार/परीक्षार्थीना लाँगीन मधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची संबंधित सर्व उमेदवार/परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.

 

Check Your Result 

 

आक्षेप, त्रुटी नोंदविण्यास २१ जानेवारीपर्यंत मुदत
अंतरिम निकाल ऑनलाइन प्रणालीद्वारे उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर आक्षेप किंवा त्रुटी नोंदवण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत मुदत असून, उमेदवारांना त्यांच्या लॉगिनद्वारेच आक्षेप नोंदवता येईल. अन्य मार्गाने आलेल्या आक्षेपांचा किंवा अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत १ लाख ६ हजार उमेदवार पात्र
१ टीईटी परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ३ हजार ३३४ उमेदवारांनी पेपर १ साठी, तर २ लाख ७२ हजार ३३५ उमेदवारांनी पेपर २ साठी नोंदणी केली होती.
२ २०१३ पासून एकूण आठ वेळा टीईटी परीक्षा घेतली. यात परीक्षा दिलेल्या २९ लाख ७४ हजार ६०० उमेदवारांपैकी १ लाख ६ हजार ६६३ उमेदवार पात्र ठरले आहेत.
आतापर्यंत सर्वाधिक ६ निकाल २०१८ मध्ये ५.१३ टक्के, त्यापूर्वी २०१३ मध्ये ५.०२ टक्के लागला होता. अन्य सर्व परीक्षांचा निकाल २.३ टक्के ते ३.७० टक्के यादरम्यान आहे. यंदा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिका व खासगी अनुदानित शाळांमधील नऊ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता आता अंतिम झाली आहे. त्यात पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर रिक्त राहिलेली पदे व मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. या भरतीत आता ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही सहभागी होता येणार आहे. दरम्यान, परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या उत्तरसूचीवर पाच हजार आक्षेप तथा हरकती नोंदविल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल १६ जानेवारीपूर्वी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आता उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरु आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (एमएएचएटीईटी) अंतिम निकाल पेपर १ (१ ली ते ५ वी गट) आणि पेपर २ (६ वी ते ८ वी गट) प्रसिद्ध झाला असून, या परीक्षेत ३.३८ टक्के उमेदवार पात्र ठरले आहेत. उमेदवारांना त्यांचा निकाल शुक्रवार (दि. १४) पासून संकेतस्थळावर पाहता येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ट एकूण ३ लाख ५३ हजार ९५२ परीक्षार्थीपैकी ११ हजार १६८ परीक्षार्थी पात्र ठरले होते. या परीक्षेचा अंतरिम निकाल ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करून १० फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

शुक्रवारी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. पेपर १ (१ ली ते ५ वी गट) साठी १ लाख ५२ हजार ६०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यातील ४ हजार ७०९ उमेदवार पात्र ठरले, पेपर २- गणित विज्ञान (६ वी ते ८ वी गट) ७५ हजार ५९९ उमेदवार प्रविष्ट झाले, त्यातील २१ हजार ४१४ उमेदवार पात्र ठरले तर पेपर २- सामाजिकशास्त्र (६ वी ते ८ वी गट) १ लाख २५ हजार ७४८ उमेदवार प्रविष्ट झाले असून, ४ हजार ०४५ उमेदवार पात्र उरले आहेत. 

 


 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1 (इ. 1 ली ते 5वी गट) पेपर 2 (इ. 6 वी ते 8वी गट) चा अंतिम निकाल परिषदेच्या https://mahatet.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर परीक्षेचा अंतरिम निकाल दि. 31 जानेवारी 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. सदर निकालाबाबत दि. 01/02/2025 ते 06/02/2025 अखेर पर्यंत ऑनलाईन आक्षेप लॉगिनद्वारे नोंदवुन घेण्यात आले होते. तसेच ईमेलद्वारे दि. 08/02/2025 ते 10/02/2025 अखेरपर्यंत आक्षेप मागविण्यात आलेले होते. सदर आक्षेपावरील कार्यवाही पूर्ण करुन अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे. पेपर 1 व 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल दि. 14/02/2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल.
पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प./ शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांचेमार्फत यथावकाश पाठविण्यात येईल. 

या लिंक वर निकाल चेक करा( ४ पासून) 

 

MahaTET Result 2025

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड