१९ जानेवारी रोजी होणाऱ्या TET परीक्षेबद्दल अपडेट


Maha TET 2020 – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यावर्षी १९ जानेवारीला होणार असून, या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे प्रवेशपत्र आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या तसेच निश्चित कालावधीत परीक्षाशुल्क भरल्याबाबतच्या आवश्यक पुराव्यांसह परीक्षा परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आहे.

पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित किंवा विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षकपदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे शिक्षकांना अनिवार्य आहे.

पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठीच्या शिक्षकपदासाठी १९ जानेवारीला घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी उमेदवारांना २१ डिसेंबर २०१९ पासून प्रवेशपत्र आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांना या प्रवेशपत्राची प्रिंट काढून घेता येणार आहे. या परीक्षेचा पहिला पेपर १९ जानेवारीला सकाळी १०.३० ते दुपारी १, तर दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे.

Maha TET 2020 Answer Key  Download

MahTET 2020 Answer Key will be available Soon after the Examination. We will publish the Link to download the Link on MahaBharti. So For respective updates keep visiting us.Leave A Reply

Your email address will not be published.