पवित्र प्रणालीवर स्व-प्रमाणपत्र घोषित करण्यास मुदतवाढ! – MahaRecruitment TAIT 2023 Pavitra Portal @ MahaTeacherRecruitment.org.in

MahaRecruitment TAIT 2023 Pavitra Portal - mahateacherrecruitment.org.in

Swa Pramanpatra Ghoshna- List of documents to be Upload For TAIT Exam- mahateacherrecruitment.org.in

MahaRecruitment TAIT 2023 Pavitra Portal : Candidates for recruitment to the post of teacher. The deadline to complete the self-certification was Sept. 15. However, out of 2,16,443 candidates who appeared for the exam, only 1,26,453 students have appeared till September 14 and 94,948 candidates have got their own certificates certified. Therefore, the deadline for candidates to complete their self-certification has been extended till September 22.

 

शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांना दि. १५ सप्टेंबर पर्यंत स्व- प्रमाणपत्र पूर्ण करण्याची मुदत दिली हाेती. मात्र, परीक्षा दिलेल्या २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांपैकी १४ सप्टेंबर पर्यंत केवळ १ लाख २६ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली असून ९४ हजार ९४८ उमेदवारांचे स्व- प्रमाणपत्र प्रमाणित झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांना स्व- प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी येत्या २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली. दरम्यान, इंटरनेट तसेच इतर अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. पाेर्टल संदर्भात अथवा स्व- प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात काही अडचण आल्यास edupavitra२०२२@gmail.com या ईमेलवर तक्रार करावी. त्यास उत्तर देण्यात येईल. यासाठी काेणतेही कर्मचारी, अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क साधू नये असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्यातील जिल्हा परिषद शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पाेर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी राज्य शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ टेट परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दि. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये आयाेजन केले हाेते. टेट परीक्षेसाठी २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली असून २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी परीक्षा दिली हाेती.

पवित्र पोर्टलवर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना दि. १ ते १५ सप्टेंबर या कालावधीमध्ये स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी सुविधा दिलेली आहे. मात्र, राज्यातील काही भागामध्ये इंटरनेट सुविधा व्यवस्थितरित्या सुरु नाही. त्यामध्ये दि.१४ सप्टेंपर्यंत केवळ ९५ हजार उमेदवारांचे स्व प्रमाणपत्र पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दिलेल्या मुदतीत https://tait२०२२.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर स्व- प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करावी. जे उमेदवार स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणार नाहीत ते उमेदवार नव्याने होणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत.

 


 

List of documents to be Upload For TAIT Exam – The recruitment of teachers, which has been stalled for six months, has finally started. The process of preparation of self-certificates of candidates who appeared in the Teacher Aptitude and Intelligence Test 2022 examination through the Pavitra portal has started from Friday (1st). A deadline has been given to complete the self-certification till September 15. For this TAIT Pavitra Portal Recruitment 2023, candidates need to Upload the Following Documents. Check List Of Documents Required for Pavitra Teacher Recruitment 2023. Download Pavitra Portal TAIT Exam Document list from below :

TAIT परीक्षेसाठी अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी : सहा महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती अखेर सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२ या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची स्वयंप्रमाणपत्रे तयार करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून (दि. 1) सुरू झाली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत स्व-प्रमाणन पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. या TAIT पवित्र पोर्टल भरती 2023 साठी, उमेदवारांनी खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. पवित्र शिक्षक भरती 2023 साठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी तपासा. पवित्र पोर्टल TAIT परीक्षा दस्तऐवज यादी खालील लिंक वरून डाउनलोड करा. या शिक्षक भरतीचे संपूर्ण नवीन अभ्यासक्रम या लिंक वर उपलब्ध आहे . तसेच TAIT टेस्ट सीरीज २०२३ – MAHA TAIT Test Series 2023 या लिंक वर सरावासाठी मोफत उपलब्ध आहे????.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

महत्वाच्या नवीन सूचना, शिक्षकांची भरती स्वप्रमाणपत्रासाठी 15 पर्यंत मुदत :  अर्ज करा !- Maharashtra Shikshak Bharti 2023

पवित्र पोर्टल शिक्षक भरती अर्ज कसा करायचा – संपूर्ण माहिती ! – Pavitra Portal Shikshak Bharti 2023

LIST OF DOCUMENTS REQUIRED TO UPLOAD FOR SELF-CERTIFICATION BY CANDIDATES FOR TEACHER ABILITY AND INTELLIGENCE TEST- 2022

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- 2022 दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणालीवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी अपलोड करणेसाठी आवश्यक कागदपत्राची यादी
1. उमेदवाराने TAIT 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र अथवा अद्ययावत छायाचित्र.
2. उमेदवाराने TAIT – 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी अथवा अद्ययावत स्वाक्षरी.
3. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र ( Domicile Certificate).
4. जातीचा दाखला / जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
5. जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
6. समांतर आरक्षणासाठी
A) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास) B) माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
C) पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
D) प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
E) भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
F) प्राविण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे बाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोचपावती (लागू
असल्यास)

7. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका.
8. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका.
9. शैक्षणिक अर्हताबाबत पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका ( लागू असल्यास)
10. शैक्षणिक अर्हताबाबत पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका ( लागू असल्यास)
11. पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत डीएड / डीटीएड / डीएलएड / टीसीएच इ. बाबतचे पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका ( लागू असल्यास).
12. पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत बीएड / बीएएलएड/बीएससीएड/बीपीएड/बीपीई इ. बाबतचे पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका ( लागू असल्यास).
13. पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत एमपीड इ. बाबतचे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास).
14. बीपीएड उमेदवारांकडे इतर शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र असल्यास तशी प्रमाणपत्रे (लागू असल्यास).
15. शिक्षक पात्रता परीक्षा (राज्य / केंद्र) अर्हताबाबत प्रमाणपत्र ( लागू असल्यास).

16. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास) 17. स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास) 18. 1991 चे जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास) 19. 1994 चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
टीप- 1. छायाचित्र व स्वाक्षरी ही .jpg/.jpeg या फॉरमॅटमध्ये कमाल 100 kb मर्यादेत साईज आवश्यक
आहे.
2. इतर सर्व कागदपत्र / प्रमाणपत्राकरिता .pdf/.jpg/.jpeg या फॉरमॅटमध्ये कमाल 500 kb मर्यादेत साईज आवश्यक आहे.

Download List Of Documents Required For Maha TAIT Pavitra Portal Shikshak Bharti 2023


MahaRecruitment TAIT 2023 Pavitra Portal – The word ‘teacher’ represents knowledge; transfer of the knowledge from the teacher to the taught. In fact, the foundation that builds a person in life is to great extent based on the knowledge he gets from his teacher. If there is somebody other than our parents who plays an important role in our mental development, it’s our teachers. Foradian pays a tribute to the positive and inspiring role that holds the ladder that we all climb as students.

 

१९६ व्यवस्थापनांच्या मुलाखतीसह पदभरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०१७ दिलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरती प्रकारांतर्गत १९६ खाजगी व्यवस्थापनातील इ.६ वी ते इ. १२ गटातील रिक्त पदांचे प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक १३/०४/२०२३ पासून दिनांक २५/०४/२०२३ पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे. ???? 196 व्यवस्थापनांच्या मुलाखतीसह पदभरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. #TAIT शिक्षक भरती उमेदवारांनी आपले पसंतीक्रम लॉक करून घ्यावेत.

पवित्र पाेर्टलवरील १९६ व्यवस्थापनाच्या शिक्षक भरतीस पुन्हा प्रारंभ झाला आहे. उमेदवारांनी आधी दिलेले प्राधान्य तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आले असून, आता नव्याने १३ एप्रिलपासून प्राधान्यक्रम लाॅक करण्यास प्रारंभ झाला आहे. याविषयी ‘लाेकमत’ने पाठपुरावा केला हाेता. २५ एप्रिलपर्यंत उमेदवारांना प्राधान्यक्रम लाॅक करता येणार आहेत. सन २०१७ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांसाठीच ही भरती पक्रिया आहे.

 

पवित्र पाेर्टलमार्फत १९६ व्यवस्थापनांच्या रिक्त पदांसाठी १५ नाेव्हेंबर २०२२ ते ७ डिसेंबर २०२२ या दरम्यान उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले हाेते. परंतु तांत्रिक कारणामुळे त्यावर पुढील प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या व्यवस्थापनांसाठी उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात येत आहे. यापूर्वी प्राधान्यक्रम नाेंदविलेल्या उमदेवारांनाही नव्याने प्राधान्यक्रम देण्याची नाेंद करणे आवश्यक आहे. गत काही महिन्यांपासून ही भरती प्रक्रिया रखडली हाेती, आता पवित्र पाेर्टल सुरू झाल्याने भावी शिक्षकांना माेठा दिलासा मिळाला आहे. प्राधान्यक्रम लाॅक केल्यानंतर इयत्ता ६ वी ते १२ वी या गटातील रिक्त पदांसाठी मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी १:१० असे उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्राधान्यक्रम लाॅक करण्याची २४ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

 

पवित्र पाेर्टल ७ जुलै २०२२ राेजी स्व-प्रमाणपत्र अपडेट करण्याविषयी सूचना देण्यात आल्या हाेत्या. उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र अपडेट केलेले आहेत. ज्या उमेदवारांनी ते अपडेट केले नाही किंवा तांत्रिक कारणामुळे काही उमेदवारांचे स्व-प्रमाणपत्र अपडेट दाखवत नसेल त्यांनी ते करून घेण्याची सूचना देण्यात आली आहे. स्व-प्रमाणपत्र अपडेट केल्याशिवाय प्राधान्यक्रम येणार नसल्याचे पवित्र पाेर्टलवर आलेल्या सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

 

१९६ व्यवस्थापनांच्या मुलाखतीसह पदभरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत

१. सदरची सुविधा सन २०१७ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांसाठीच आहे.
२. पवित्र पोर्टलमार्फत दिनांक १५/११/२०२२ ते ७/१२ /२०२२ या कालावधीमध्ये १९६ व्यवस्थापनांच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते. परंतू तांत्रिक कारणास्तव त्यावर पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या व्यवस्थापनांसाठी उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात येत आहेत.
३. यापूर्वी १९६ व्यवस्थापनांच्या पदभरतीस इच्छुक असलेल्यांनी प्राधान्यक्रम नोंदविलेले असतील त्यांनीही नव्याने प्राधान्यक्रम नोंद करणे आवश्यक आहे.
४. यापूर्वी दिनांक ७/७/२०२२ च्या सूचनांनुसार स्वप्रमाणपत्र अपडेट केलेले आहेत परंतु तांत्रिक कारणास्तव काही उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र अपडेट केलेले दिसून येत नसतील तर त्यांनी ते स्वप्रमाणपत्र अपडेट करावेत. ५. दिनांक १५/११/२०२२ रोजी पोर्टलवर दिलेल्या सूचनांनुसार प्राधान्यक्रम लॉक करण्याची कार्यवाही करावी.
६. प्राधान्यक्रम Generate करून lock करतेवेळी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार आपण पात्र असलेलेच प्राधान्यक्रम lock करावेत.
७. काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी Generete झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इत्यादिंशी सुसंगत नसेल तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी lock करू नयेत. ८. ज्या उमेदवारांनी यापूर्वी स्व प्रमाणपत्रामध्ये व्यावसायिक अर्हतेची नोंद करताना Degree मध्ये न करता certificate मध्ये केली असेल त्यांनी अशी नोंद Degree मध्ये करावी. उदा. B.Ed. ही अर्हता Degree मध्ये करणे आवश्यक आहे.

९. उमेदवारांना संगणक अर्हतेची नोंद करण्यासाठी Professional qualification type यामध्ये certificate या शीर्षकाखाली सुविधा दिलेली आहे. तेथे MSCIT ची सुविधा आहे, त्याशिवाय अन्य अर्हता नोंद करावयाची असल्यास Other निवड केल्यानंतर CCC etc सारखी संगणक अर्हता नोंद करता येईल. संगणकाशिवाय अन्य कोणत्याही D.Ed./B.Ed./B.P.Ed.यासारख्या अर्हता Other मध्ये नोंद करू नयेत. अश्या नोंद केल्यास त्या विचारात घेतल्या जाणार नाहीत.
१०. या १९६ व्यवस्थापनांच्या इ. ६ वी ते इ. १२ वी या गटातील रिक्त ज्या उमेदवारांनी पदासाठी कळविल्यानुसार यापूर्वी https://mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर स्व प्रमाणपत्र पूर्ण (Self Certified) आहे, त्यांनाच प्राधान्यक्रम उपलब्ध होतील.
११. ज्या उमेदवारांनी यापूर्वी https://mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेले नाही, त्यांनी सर्व प्रथम आपले स्व प्रमाणपत्र पूर्ण (Self Certified) करावे, त्यानंतरच त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध होऊ शकतील.
१२.लॉगीन करण्यासाठी पूर्वी नोंद असलेला mobile क्रमांक बदलला/हरवला असेल तर नजीकच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांचेकडे उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा दाखवून mobile क्रमांक बदल करून घेता येईल.
१३. उमेदवारांना त्यांचा TAIT – २०१७ चा परीक्षा क्रमांक माहित नसल्यास नजीकच्या (SED_TAIT_XXXXXXX) शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांचेकडे उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा दाखवून परीक्षा क्रमांक प्राप्त करून घेता येईल.
१४. TET मध्ये mismatch येत असेल तर आपण निवडलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक जिल्हा परिषद यांना तुमच्या ‘ओळखीच्या’ पुरावा दाखवून हा mismatch दूर करता येईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड