शॉर्टहँड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, २७ डिसेंबर पासून परीक्षा होणार! – Maharashtra Typing Exam 2024 – mscepune.in
Maharashtra Typing Exam 2024
Maharashtra ShortHand Typing Exam 2024 Date
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शॉर्टहँड परीक्षेच्या वेळापत्रकात जाहीर करण्यात आले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार वेळापत्रकानुसार या परीक्षा येत्या २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. तसेच हे वेळा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
संगणक टंकलेखन परीक्षेसाठी राज्यभरातून एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा परिषदेने ‘मॅन्युअल टायपिंग’ आणि लघुलेखन परीक्षेसाठीचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत
अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत मॅन्युअल टायपिंग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तर, संगणक टंकलेखन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेकडून अनेक बदलही करण्यात आले आहेत.
परिषदेतर्फे जूनमध्ये घेण्यात आलेल्या टंकलेखन, लघुलेखन परीक्षांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे वेळापत्रकात बदल करावा लागला होता. आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी परिषदेकडून खबरदारी घेतली जाईल, असे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले.
Maharashtra Typing Exam 2024 – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणक टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. नऊ डिसेंबरपासून परीक्षा सुरू होणार असून राज्यभरात सुमारे लाखभर विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा सुधारित अभ्यासक्रम साठी या लिंक वरक्लिक करा.
परिषदेकडून संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंग व शार्टहँड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली. दुसऱ्या सत्रातील ही परीक्षा डिसेंबर-जानेवारी दरम्यान होणार आहे. त्यात संगणक टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र, शार्टहँड परीक्षेचे वेळापत्रक अद्याप निश्चित नाही. काही वर्षात मॅन्युअल टायपिंग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून संगणक टायपिंग परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेकडून अनेक बदल ही करण्यात आले आहेत. जूनमध्ये घेण्यात आलेल्या टायपिंग, शार्टहँड परीक्षांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या. वेळापत्रक बदलावे लागले होते. आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये परिषदेकडून खबरदारी घेतली जाईल, असे सांगण्यात येते.
अडचणींचा आढावा
संगणक टायपिंग, शॉर्टहँड परीक्षेत जूनमध्ये पहिल्याच दिवशीपासून तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता. परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेल्या अनेक केंद्रावर संगणक यंत्रणा सक्षम नसल्याने विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या. याबाबत परीक्षा परिषदेकडे संस्था, विद्यार्थ्यांनी तक्रारी मांडल्या होत्या. आता अशा सोयी-सुविधांचा आढावा घेऊन उपाययोजना केल्या जातील, असे सांगण्यात येते. यासह शॉर्टहँड परीक्षेचे वेळापत्रकही लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
मित्रांनो, सध्या राज्यात विविध विभागात अनेक बदल होत आहेत. राज्यातील सर्व टंकलेखन संस्थांमध्ये आता विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या हजेरीचा डेटा परीक्षा परिषदेला पाठवणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच अनधिकृत प्रवेश आणि परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक थंब विथ फेस रिकग्निशन डिव्हाइस संस्थांमध्ये बसविणे आवश्यक ठरले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यातील काही टंकलेखन संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण न घेता नोंदणी केली जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे, परीक्षा परिषदेने अनधिकृत नोंदणी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी असलेल्या संस्थांना ३१ ऑक्टोबरपर्यंत या यंत्रणा बसविण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे, तर कमी विद्यार्थ्यांची नोंदणी असलेल्या संस्थांना सहा महिन्यांचा अवधी दिला आहे.
राज्यात सुमारे ३ हजार टंकलेखन संस्था नोंदणीकृत असून, दरवर्षी ४ ते ५ लाख विद्यार्थी या संस्थांमधून प्रशिक्षण घेतात. नवीन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांनी किती वेळ सराव केला हे समजणे शक्य होईल, तसेच संस्थेत खरोखरच प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थीच परीक्षेला बसले आहेत का, याचीही शहानिशा करता येईल. अशा प्रकारे, विद्यार्थ्यांमध्ये अनियमितता रोखता येईल आणि गुणवत्ता असलेले मनुष्यबळ तयार होईल, असे मत राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संपूर्ण राज्यात 300 केंद्रावर Computer Typing Test संगणक टंकलेखनाची परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. याकरिता काही खास महाविद्यालयांची निवड केली जाते. पण तिथे गेल्यावर परीक्षार्थींना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा परीक्षार्थी जाणीवपूर्वक समस्या निर्माण करतात. यावर आळा बसावा म्हणून उमेदवार ज्या संस्थेत शिकणार तिथेच त्यांची टंकलेखनासह लघुलेखनाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी पहिल्यांदाच हा नवा प्रयोग घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
टंकलेखन व लघुलेखन परीक्षा घेण्यासाठी आतापर्यंत अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, सीईटी केंद्राची निवड केली जायची. पण या केंद्रावर नीट, जेईई, सीईटी, भरती परीक्षा घेतल्या जातात. यामुळे संगणक टंकलेखन परीक्षेसाठी केंद्र मिळणे अवघड जायचे. अनेकदा ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याची नामुष्कीही परीषदेवर यायची. शिवाय काही विद्यार्थ्यांकडून जाणीवपूर्वक तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जायच्या. त्यामुळे संबंधित परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांची नाहक बदनामी व्हायची. त्यामुळे ते महाविद्यालय पुढील काळात परीक्षा केंद्रासाठी नकार द्यायचे. यासर्व घटनाक्रमांकाचा आढावा घेता जिथे प्रशिक्षणार्थी शिकणार त्याच संस्थेत काही अटींचे पालन करीत परीक्षा केंद्र ठेवण्याचा प्रयोग आता होणार आहे. शेवटी, टंकलेखन आणि लघुलेखन परीक्षेविषयी परिषदेने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांना दिलासा देणाराच ठरेल. यातून मुलांच्या अडचणी दूर होतील. परीक्षा केंद्र मिळवताना उद्भवणार्या समस्याही यातून संपुष्टात येतील. यामुळे हा निर्णय धाडसी आणि लाखों विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल.
समाजाला सक्षम टंकलेखकांची गरज आहे. याकरिता त्यांनाही योग्य ती सुविधा मिळायला हवी. अगदी हाच उदात्त विचार करून टंकलेखनाची परीक्षा त्यांच्याच संस्थेत घेण्याचा प्रयोग आम्ही अटींची पूर्तता करून करणार आहोत. शेवटी हा प्रयोग प्रशिक्षणार्थींच्या हितासाठी घेतल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी तरुण भारतशी बोलताना मांडली.
Typing Exam New Rules 2024 – संगणक टंकलेखन परीक्षेत बोगस उमेदवारांसह गैखकारांना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जून २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षा प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रश्नांचा क्रम बदलण्यासह ई-मेलच्या प्रश्नाच्या वेळेत कपात केली असून, त्यासाठी ८ ऐवजी ५ मिनिटे दिली जाणार आहेत. स्पीड पॅसेज वेगात सोडवण्याचा सराव होण्यासाठी ३ मिनिटांचा सराव उतारा (ट्रायल पॅसेज) देण्यात येणार आहे.
इंग्रजी, मराठी आणि हिंदी ३० व ४० शब्दाति मिनिटाच्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये सबर्वांत प्रथम पाच मिनिटांचा ई-मेल व त्यानंतर लगेचच ७ मिनिटांचा स्पीड पैसेजचा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट, लेटर, ऑब्जेक्टिव्ह अशा क्रमाने प्रश्न सोडवता येणार आहेत. ट्रायल पैसेजला गुण मिळणार नसले तरी, तो सोडवणे विद्यार्थ्यांना अनिवार्य राहील.
संगणक टंकलेखन परीक्षा चार सत्रात होणार असून, पहिले सत्र सकाळी ९, दुसरे सत्र सकाळी १९, तिसरे सत्र दुपारी १.१५ वाजता आणि चौथे सत्र दुपारी ३.१५ वाजता सुरू होईल, लॉगिन केल्यानंतर ५ मिनिट ई-मेलचा प्रश्न सोडवण्यासाठी देण्यात येणार आहे. हा प्रश्न ऑटो सबमिट होणार आहे. त्यानंतर ३० सेकंदांचा टाइम अलर्ट (काउंटडाउन) देऊन ७ मिनिटांच्या स्पीड पॅसेजला विद्यार्थ्यांना सुरुवात करता येईल.
संगणक टंकलेखन परीक्षेत डमी उमेदवारांच्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा परिषदेने येत्या जून २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेत प्रश्नांचा क्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली. डिसेंबर २०२३ आणि त्यापूर्वी पार पडलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेदरम्यान केंद्रावर डमी उमेदवार बसवणे, त्यांच्याकडून परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करून देणे, बाजूच्या खोलीमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवाराकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे, अशा गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे. डमी उमेदवारांच्या माध्यमातून स्पीड पॅसेज सोडवता येऊ नये यासाठी, पूर्वीच्या प्रश्नांमधील क्रम बदलण्यात येणार आहे.
जून २०२४ मध्ये होणाऱ्या इंग्रजी, मराठी आणि हिंदी ३० व ४० शब्द प्रति मिनिटच्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये सर्वांत प्रथम पाच मिनिटांचा ई-मेल व त्यानंतर लगेचच ७ मिनिटांचा स्पीड पॅसेजचा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट, लेटर, ऑब्जेक्टिव्ह अशा क्रमाने प्रश्न सोडविण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येतील. यासह ई-मेलच्या प्रश्नाच्या वेळेत कपात केली असून त्यासाठी ८ ऐवजी ५ मिनिटे दिली जाणार आहेत.
असा होणार प्रश्नांच्या क्रमात बदल
- विद्यार्थ्यांनी लॉगइन केल्यानंतर ५ मिनिटांचा ई-मेलचा प्रश्न सोडविण्यास दिला जाईल. विद्यार्थ्यांना ई-मेलचे टंकलेखन संपल्यानंतर लगेचच सबमिट बटण दाबता येणार नाही.
- हा ई-मेलचा प्रश्न निर्धारित वेळेनंतरच म्हणजे पूर्ण ५ मिनिटे झाल्यावरच ऑटो सबमिट होणार आहे. ई-मेलचा प्रश्न संप- ल्यानंतर ३० सेकंदांचा टाइम अलर्ट (काउंटडाउन) देऊन लगेचच ७ मिनिटांच्या स्पीड पॅसेजला सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर स्टेटमेंट, लेटर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न अशा क्रमाने प्रश्न विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जातील.
तीन मिनिटांचा सराव उतारा
- सुरुवातीलाच स्पीड पॅसेजचा प्रश्न दिल्यामुळे विद्यार्थ्यांना पॅसेज वेगात सोडविण्याचा सराव व्हावा यासाठी ३ मिनिटांचा सराव उतारा (ट्रायल पॅसेज) दिला जाणार आहे.
• या ट्रायल पॅसेजला गुण मिळणार नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांना तो सोडविणे बंधनकारक राहील. चार सत्रांत परीक्षा होणार असून पहिले सत्र सकाळी ९. दुसरे सत्र ११, तिसरे सत्र दुपारी १:१५ आणि चौथे सत्र ३:१५ वाजता सुरु होईल
लोकसभा निवडणुका तसेच विविध प्रवेश परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, संगणक टंकलेखन परीक्षा आणि संगणक लघुलेखन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. येत्या जून महिन्यांत परीक्षा होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेचे अधिकारी, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहे. पर्यायाने हे कर्मचारी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. तसेच एप्रिल व मार्च २०२४ मध्ये संपूर्ण राज्यभरात एमएच-सीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षा पार पडतात. त्यासाठी राज्यातील विविध इंजिनिअरिंग तसेच पॉलिटेक्निक कॉलेज व खासगी संगणक लॅब मोठ्या प्रमाणावर आरक्षित केलेल्या आहेत. त्यामध्ये एप्रिल २०२४ मधील परीक्षेसाठी तब्बल १ लाख ६० हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे संगणकावर आधारित परीक्षा व संगणक लघुलेखन परीक्षा विहित मुदतीत घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एप्रिल-२०२४ मध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परीक्षांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे
Maharashtra Typing Exam 2024 – राज्यात टंकलेखन परीक्षेपाठोपाठ संगणकाच्या सहाय्याने लघुलेखन स्टेनोग्राफी परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रात यापूर्वी तोंडी ऐकविला जाणारा उतारा (पॅसेज) आता संगणकाच्या मदतीने हेडफोनद्वारे ऐकविण्यात येईल. विद्यार्थ्यांना तो ऐकून त्याचे कागदावर लिप्यंतर करून तो मजकूर संगणकावर टाइप करीत परीक्षा द्यावी लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संगणक टायपिंग प्रमाणपत्र आणि लघुलेखन परीक्षेचे आयोजन करण्यात येते. येत्या एप्रिल २०२४ मध्ये प्रथमच ऑनलाइन लघुलेखन परीक्षेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये इंग्रजी ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५०, १६० तर मराठी, हिंदी ६०, ८०,१०० आणि १२० शब्द प्रतिमिनिट आदी १६ विषयांचे पेपर होणार आहेत.
नवीन ऑनलाईन पध्दतीचे फायदे
१. चार मिनिटांचा उतारा एकदाच ऐकविला जाईल.
२. उतारा निर्धारित वेळ आणि वेगात वाचून पूर्ण होईल.
३. उताऱ्याचा लिखित कागद नसल्याने कॉपी होणार नाही.
४. परीक्षेतील पारदर्शकता वाढणार
लघुलेखन परीक्षेसाठी परीक्षा परिषदेमार्फत प्रचलित पध्दतीनुसार ४ मिनिटांचे लिखित पॅराग्राफ (परिच्छेद) असलेले कागद परीक्षा केंद्रांना पाठविले जात होते. विषयतज्ज्ञ संस्थाचालक तो उतारा निर्धारित वेळेत आणि वेगात परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वाचून दाखवित असत आणि विद्यार्थ्यांकडून त्याचे लिप्यंतर करून घेत तो मजकूर संगणकावर टाइप करायचे. मात्र, आता संगणकावर ऑनलाइन पद्धतीने हेडफोनव्दारे ४ मिनिटांचा उतारा त्या त्या परीक्षेनुसार निर्धारित केलेली वेळ आणि वेगात विद्यार्थ्यांना एकदाच ऐकविण्यात येईल आणि ते लक्षपूर्वक ऐकून त्यांचे लिप्यंतर कागदावर करीत तो परिच्छेद टाइप करावा लागणार आहे.
एप्रिल २०२४ परीक्षेसाठी प्राप्त अर्ज
टंकलेखन परीक्षा : १ लाख ५० हजार लघुलेखन परीक्षा : ८ हजार
घसरण ८० वरून ८ टक्क्यांवर
■ डिसेंबर २०२३मध्ये सुमारे साडेसात हजार उमेदवारांनी लघुलेखन विषयाची परीक्षा दिली.
■ त्यापैकी केवळ ६३३ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. पूर्वीचा ८० टक्के लागणारा निकाल आता थेट ८ टक्के एवढा घसरला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या डिसेंबर २०२३ टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा जुलैमध्ये झालेल्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (टंकलेखन) परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तसेच, सदर निकालाची ऑनलाइन प्रिंट घेता येणार असून विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाइन स्वरूपात संबंधित संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येतील.
GCC-TBC-30, 40 WPM – Maharashtra Typing Exam 2023 @ mscepune.in – The GCC TBC Computer Typewriting Examination, affiliated to the Maharashtra State Examination Council, Pune, will be held in April 2024. For this, the online admission process has started from all the recognized institutions in the state. Nandkumar Bedse reports. Similarly, strict action will be taken against any recognised institutions found to have indulged in illegal activities, the release said.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य कामे केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर आपल्या जवळच्या मान्यता प्राप्त टायपिंग संस्थांची यादी तपासून पाहावी. त्यानंतर त्या संस्थेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रमाणपत्रावरील त्याच संस्थेचे नाव व पत्ता बरोबर असल्याची खातरजमा करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यात वर्षातून दोन वेळा जीसीसी टीबीसी संगणकीय टायपिंग परीक्षा घेतल्या जातात. प्रत्येक विषयासाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम असून याची प्रती विषय ६,५०० रुपये इतके शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर लघुलेखन परीक्षा देखील घेतल्या जातात. त्यासाठी देखील प्रवेश सुरू झाले असल्याची माहिती परिषदेमार्फत देण्यात आली आहे.
संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतानाच परीक्षेचा प्राथमिक अर्ज ऑनलाईन भरून घेतला जाणार आहे. यामुळे ऐनवेळी परीक्षा अर्ज भरून घेणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे या गैरप्रकारांना आळा बसेल, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Typing result is published now. Candidates in Maharashtra and goa state can apply GOVERNMENT CERTIFICATE IN TYPING BASIC COURSE (GCC –TBC Marathi/Hindi/English 30 and 40 WPM) EXAMINATION through online mode. The registration process for this is through the portal mscepune.in. GCC-TBC-30 WPM, GCC-TBC-40 WPM, GCC-SSD-CTC Examinations updates & details are given below. Check your online result from following given link.
महाराष्ट्र व गोवा राज्यातील शासनमान्यता प्राप्त संगणक टायपिंग संस्थामधील नियमित विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC मराठी/हिंदी/इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि) 2023 ची परीक्षा निकाल आज जाहीर झाला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.
GCC-TBC 30 WPM Result FEB/MARCH 2023
GCC-TBC 40 WPM Result FEB/MARCH 2023
पात्रतेचे निकष:
१) उमेदवार ८ वि उत्तीर्ण असावा.
२) विद्यार्थ्याची नोंदणी संबंधित संस्थेने केलेली असावी.
३) उमेदवाराची ८०% उपस्थिती असावी.
४) शासनमान्य टायपिंग संस्थेत नियमित विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
MSCE GCC-TBC Exam Notification PDF