राज्य सरकारतर्फे रोजगाराची संधी आता अँप आधारित रिक्षा-टॅक्सी, ई-बाईक सेवा! – Maharashtra State Taxi App

Maharashtra State Rickshaw, Ebike App

Maharashtra State Taxi App – The New Update for Job Seekers in Maharashtra! The Maharashtra government is set to introduce its own mobile app-based passenger transport service for taxis, auto-rickshaws, and bike taxis. Transport Minister Pratap Sarnaik recently announced the initiative, stating that it aims to “create an alternative to the monopoly of private companies” such as Ola, Uber, and Rapido.

मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अॅप आधारित प्रवासी वाहनसेवा आता राज्य सरकार सुरू करणार आहे. या अॅपला जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रवासी वाहतुकीसाठी अॅप आधारित रिक्षा, टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता परिवहन विभागाच्या सहकार्यान ती राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने हे शासकीय अॅप लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

Sarkari Taxi Maharashtra

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

App विकसित करण्यासाठी ङ्गमहाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजीफआणि ङ्गमित्रफया संस्थेसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू झाली आहे. या माध्यमातून मराठी तरुण-तरुणींना विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी १० टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. अशी ग्वाही मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

अकरा टक्के व्याज परतावा देणार
मुंबै बँकेच्या मदतीने बेरोजगार तरुण-तरुणींना अर्थसहाय उपलब्धता होईल. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांतर्फे ११ टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे. त्यामुळे हे कर्ज बिनव्याजी असल्यासारखे आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड