Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कंत्राटी पद्धतीने पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती; पदभरतीत निवृत्त शिक्षकांना नोकरीची संधी! – Maharashtra Shikshak Bharti 2024

Maharashtra Shikshak Bharti 2024

Maharashtra Shikshak Bharti 2024

राज्यातील आदिवासी (पेसा) क्षेत्रातील म्हणजे तब्बल १३ जिल्ह्यांतील शिक्षक भरती न्यायालयीन प्रकरणामुळे रखडली असल्याने शिक्षण विभागाने आता यावर कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत रिक्त जागांवर निवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करावी, असे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे. तसेच, या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

त्यामुळे आता रिक्त असलेल्या नियमित जागांवर कंत्राटी शिक्षक भरती होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षी जिल्हा परिषदांनी ‘पेसा’ क्षेत्रातील रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविली. मात्र, या क्षेत्रातील उमेदवारांचा डी. एड, बी. एड. असा वाद उभा राहिला. हा वाद अगदीच टोकाला जाऊन तो थेट न्यायालयात गेला. यात अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रियेलाच राज्य शासनाने स्थगिती दिली होती.

सर्वोच्च न्यायालयातील निवाडा होईपर्यंत या नियुक्त्या करू नयेत, अशी भूमिका घेतल्याने संपूर्ण राज्यातील ‘पेसा’ क्षेत्रातील भरती प्रक्रिया अडचणीत आली होती. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने राज्य शासनाने आदेश काढला आहे. त्यानुसार ‘पेसा’ क्षेत्रातील नोकरभरती कंत्राटी पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. या भरती प्रक्रियेत निवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास नव्याने निवड प्राप्त उमेदवाराला दरमहा २० हजारांचे मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात असणार आहेत. टेट-२०२२ शिफारसपात्र उमेदवारांना संधी द्यावी, त्यानंतरही पदे रिक्त राहिल्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहिरातींद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी, कंत्राटी शिक्षक भरतीप्रक्रिया महिनाभरात पूर्ण करावी, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.

राज्यात शिक्षकांच्या साडेचार हजार जागा रिक्त

१३ जिल्ह्यांत ‘पेसा’ क्षेत्रातील शाळांमध्ये एक हजार ५०६ जागा रिक्त आहेत. त्यापैकी ८० टक्के म्हणजे साडेतीन हजार पदे भरण्यात येणार आहेत. यात पालघरला सर्वाधिक एक हजार ३१८ जागा रिक्त आहेत. त्यापाठोपाठ नाशिक- ७९२, अमरावती- २६९, नंदुरबार- २१४, यवतमाळ आणि नांदेड प्रत्येकी- १८३, जळगाव- १२४, चंद्रपूर- १११, ठाणे- ७८, गडचिरोली- ७१, धुळे- ७०, पुणे- ५०, अहमदनगर- ३२ पदे रिक्त आहेत.


पोलिस भरतीप्रमाणे शिक्षकांचीही भरती सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. आपल्याच जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरी मिळावी यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. आमच्या जिल्ह्यात आम्हाला नोकरी मिळत नाही, दुसऱ्या; दूरच्या जिल्ह्यात नोकरीसाठी जावे लागते अशी अनेक शिक्षकांची तक्रार असते. त्यावर उपाय म्हणून गृह जिल्ह्यातच नोकरी मिळावी म्हणून जिल्हानिहाय शिक्षक भरती केली जाईल असे ते म्हणाले. 

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवरून अनेकदा घोळ होतो. या शिक्षकांची सातत्याने बदली होत असल्याने एकाच शाळेवर त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही. म्हणून या शिक्षकांच्या बदल्या न करण्याचे धोरण लवकरच स्वीकारले जाईल, असे केसरकर यांनी सांगितले. ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील खासगी शाळांना त्या गावाची नगर पंचायत झाल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येतात. या अडचणी आता दूर केल्या जातील, त्यासाठीचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असे ते म्हणाले.

 

 


 

पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत, अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत.


पूर्वी जाहीर केलेली शिक्षक भरती सध्या सुरू आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त ३० टक्के पदांपैकी १० टक्के पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत. दुसरीकडे खासगी अनुदानित संस्थांना देखील या भरतीत सहभागी होता येणार आहे. जिल्हा परिषदांमधील साडेतीन हजार तर खासगी संस्थांमधील सहा ते साडेसहा हजार पदे देखील त्यावेळी भरली जाणार आहेत. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मागील दहा वर्षांतील सर्वात मोठी शिक्षक भरती करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील २२ हजार पदांचा समावेश आहे. दरम्यान, शासनाच्या निर्णयानुसार २० टक्के पदे रिक्तच राहतील, पण बिंदूनामावलीतील ‘NT-C’ प्रवर्गाच्या आक्षेपामुळे १० टक्के पदे रिक्त ठेवण्यात आली होती. 

 

आता ती पदे ऑगस्टमध्ये भरली जाणार आहेत. यावेळी ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही संधी मिळणार आहे. याशिवाय बिंदूनामावली अपूर्ण असल्याने ज्या महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या शाळांमधील शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही त्यावेळी रिक्त पदांवर शिक्षक मिळणार आहेत.

शिक्षक भरतीपूर्व ‘टीईटी’ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये

शिक्षक होण्यासाठी DEd-BEd उत्तीर्ण उमेदवारांना TET (शिक्षक पात्रता परीक्षा) पास व्हावी लागते. त्यानंतर बीएडधारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ‘TET’ घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासंबंधीची निविदा काढण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये ‘TET’ घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. त्यानंतर तीन-चार महिन्यांनी ‘TAIT’ होईल, असेही ते म्हणाले.

खासगी संस्थांना ‘पवित्र’वरूनच उमेदवार

खासगी अनुदानित संस्थांच्या मनमानीला आवर घालत आता त्यांची शिक्षक भरती देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे. एका रिक्त पदासाठी दहा उमेदवार त्या संस्थेत पाठविले जातात. मुलाखतीच्या माध्यमातून त्या दहापैकी एका उमेदवाराची शिक्षक म्हणून निवड करता येईल. त्या दहा उमेदवारांशिवाय अन्य दुसरा उमेदवार शिक्षक म्हणून संस्थेला घेताच येत नाही.


 

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणातील भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त पदे त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण पदांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रूपांतरित फेरीमध्ये ५ हजार ७१४ रिक्त पदांपैकी ३ हजार १५० पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून, २ हजार ५६४ पदांच्या विषयांसाठी त्या आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने ती पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. 

 

शिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारात २५ फेब्रुवारी रोजी ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्ता यादीद्वारे निवड करण्यात आली. त्यापैकी ६ हजार १८२ उमेदवार शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. उर्वरित उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.

गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने जागा रिक्त आहेत. त्यात माजी सैनिक, भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवारांच्या उपलब्धतेबाबत पुन्हा पडताळणी करून भरतीच्या कार्यवाहीचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवून शासनाला सादर केली. त्यानंतर माजी सैनिकांची ४८४ पदे रिक्त ठेवून उर्वरित पदे रूपांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली.

 


 

 

‘पवित्र पोर्टल’मधून जिल्ह्यात दाखल झालेल्या २२२ शिक्षकांना मार्चमध्ये नियुक्ती देण्यात आली. पदस्थापना देताना प्रामुख्याने बिगरआदिवासी तालुक्यांना प्राधान्य देत त्यांचा अनुशेष भरून काढण्यात आला होता. आंतरजिल्हा बदली आणि शिक्षक भरतीतून नवनियुक्त्या झाल्या असल्या तरी जिल्ह्यात मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची अजूनही एक हजार ८५७ पदे रिक्त आहेत. 

 

तसेच शिक्षण विस्तार अधिकारी- ४९, केंद्रप्रमुख-१०३, तर मुख्याध्यापकांची ३३८ पदे रिक्त आहेत. डी. एड., बी. एड. या पात्रतेसह टीईटी, सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या पात्र बेरोजगारांसाठी पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यात मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ व मुलाखतीसह चार हजार ८७९ अशा एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची कार्यवाही सुरू केली. त्यानुसार गुणवत्तेसह सर्व प्रकारच्या आरक्षणानुसार ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्तायादी प्रसिद्ध करत शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यात नाशिक जिल्ह्यासाठी प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर एकूण २३० उमेदवारांची गुणवत्तायादी प्रसिद्ध केली होती. यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी होऊन यादीतील १ ते २३० पात्र उमेदवारांची ९ मार्च २०२४ पदस्थापना देण्यात आली. यात १७३ मराठी माध्यम, ४५ गणित व विज्ञान, तर चार इंग्रजी माध्यमातील अशा एकूण २२२ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. या भरतीनंतर आंतरजिल्हा बदलीनेही शिक्षक मिळाले. यातच, मुख्याध्यपकांची पदोन्नती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे रिक्त जागांचा भार वाढला आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची ११ हजार ४०१ पदे मंजूर असून, यातील दहा हजार ४६९ पदे भरली आहेत, तर ९४२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

 

शिक्षण विस्तार अधिकारी १२४ पदे मंजूर असून, यापैकी १२४ भरलेली आहेत, तर ७५ पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुखांची २४४ पदे मंजूर असून, यातील १०३ पदे भरली आहेत, तर, १४१ पदे रिक्त आहेत. ६३९ मुख्याध्यापकांची पदे मंजूर असून, यातील ३०१ पदे भरली असून ३३८ पदे रिक्त आहेत. तालुकानिहाय विचार केल्यास मालेगाव, येवला, नांदगाव, निफाड तालुक्यांतील सर्वाधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

 

तालुका मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे

  • बागलाण ९१३ ७८७ १२६
  • चांदवड ६६९ ५६५ १०४
  • देवळा ४१२ ३६२ ५०
  • दिंडोरी १००५ ८९० ११५
  • इगतपुरी ९६९ ८४३ १२६
  • कळवण ६४९ ५७१ ७८
  • मालेगाव १२३० १००१ २२९
  • नांदगाव ७१७ ५६४ १५३
  • नाशिक ५४६ ४७६ ७०
  • निफाड १०२४ ८७९ १४५
  • पेठ ६१८ ५०९ १०९
  • सिन्नर ८०१ ७२७ ७४
  • सुरगाणा ८९० ६८८ २०२
  • त्र्यंबकेश्वर ७८२ ६६० १२२
  • येवला ८४६ ६९२ १५४

एकूण १२ हजार ७१ १० हजार २१४ १ हजार ८५७

 


Maharashtra Shikshak Bharti 2024: तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १४० प्राथमिक शाळा आहेत. माध्यमिक शाळा ६७, तर खासगी प्राथमिक शाळा ३८, अशा २४५ शाळा आहेत. या शाळा शनिवारपासून नियमित सुरू होत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांची एकूण मंजूर संख्या ५३४ असून, कार्यरत शिक्षकांची संख्या ४६२ आहे, तर ७२ शिक्षक पदे रिक्त आहेत. आता तालुकास्तरावरून शिक्षक बदल्या होत नाहीत. 

या बदल्या राज्यस्तरावरून ऑनलाइन केल्या जातात. तालुक्यातील शाळेचा परिसर साफसफाईसह वर्गखोल्यांची किरकोळ डागडुजी शाळा व्यवस्थापन समित्यांनी केली होती. तालुक्यातील कासवा, पाडळसे, इचखेडा या गावांतील शाळेवरील वादळाने उडालेल्या पत्र्यांबाबत तसेच दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पाठविला आहे.

अजूनही काही शाळांची दुरुस्ती असल्यास सबंधित शाळांकडून प्रस्ताव मागविले आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धुके यांनी दिली. १ लाख ७ हजार ७४३ पाठ्यपुस्तके येथील शिक्षण विभागास मिळाल्या होत्या. दोन टप्प्यात पुस्तकांचे वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


Maharashtra Shikshak Bharti 2024

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव न पाडता आचारसंहितेचे पालन करून स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास मान्यता मिळाल्याची अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. त्यामुळे २५ फेब्रुवारीला प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही होणार आहे. दरम्यान, समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्यादृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. तसेच, या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

 

स्थानिक निवड समितीद्वारे तदर्थ स्वरूपात शिक्षकी पदे भरण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सूचना जारी केली आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आरक्षण धोरणानुसार आरक्षण निश्चिती करताना व विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाकडून पडताळणी करून घेतल्यावर जाहिरातीची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये व परिसंस्थांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. स्थानिक निवड समितीद्वारे पूर्णवेळ तदर्थ स्वरूपातील शिक्षकी पदे भरताना आरक्षणासंदर्भातील प्रपत्रामध्ये संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिन र्याच्या सही-शिक्यानिशी तयार करून आरक्षण कक्षामध्ये पडताळणीसाठी संस्थेच्या लेटरहेडवर आरक्षणाची मागणी नमूद करून सादर करण्यास सांगितले आहे. तसेच संस्था प्रमुखांनी नामनिर्देशित केलेल्या आरक्षित प्रवर्गातील आरक्षण प्रतिनिधीचा स्थानिक निवड समितीमध्ये समावेश करून मुलाखतींचे आयोजन करण्याबाबतही सुचविले आहे.

 

३१ ऑगस्टपर्यंत मुदत – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी तदर्थ स्वरूपातील किं तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नेमणूक करण्यासाठी १५ ते ३० जून या कालावधीत स्थानिक निवड समितीचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निवड समितीचे आयोजन केल्याच्या ४८ तासांच्या आत निवड समिती अहवाल ऑनलाइन पद्धतीने अपलोड करावा व मूळ निवड समिती अहवाल ७२ तासांच्या आत कार्यालयाकडे सादर करण्यास सांगितले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये मान्यता दिलेल्या शिक्षकांना मुदतवाढीचे प्रस्ताव संस्थेच्या ठरावासह नेमणूक आदेश, रुजू अहवाल, शैक्षणिक आर्हता व इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्यासाठी १५ जून ते ३१ ऑगस्ट अशी मुदत दिली आहे.

 


राज्य सरकारने जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया ही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच खूपच घाईघाईने पूर्ण केली. या भरतीत निवड झालेल्या शिक्षकांच्या जिल्हा परिषदनिहाय याद्याही जिल्हा परिषदांना पाठविण्यात आल्या. या यादीनुसार पुणे जिल्हा परिषदेने या शिक्षकांच्या पात्रतेची आणि कागदपत्रांची तपासणी केली आणि नव्याने नियुक्ती दिल्या जाणाऱ्या शाळाही सांगितल्या. पण अद्याप नियुक्ती आदेशच देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिक्षक भरले, पण नियुक्ती आदेश केव्हा मिळणार असा प्रश्‍न निर्माण झाल्याचे नवनियुक्त शिक्षक नाव न छापण्याच्या अटीवर सांगत होते.

येत्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने, किमान आता तरी जिल्हा परिषदेने नियुक्ती आदेश द्यावेत, अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या सुमारे एक हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी १८२ नवे शिक्षक जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मात्र या नव्या शिक्षकांना अद्याप नियुक्ती आदेशच देण्यात न आल्याने, सध्या तरी या शाळांवरील शिक्षकांच्या जागा या रिक्तच असल्याचे गृहित धरावे लागणार असल्याचे मत या शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

मागील अनेक वर्षांपासून नवीन शिक्षक भरती आणि केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे अनेक शाळांवर उपशिक्षक हेच प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांची पदोन्नतीची प्रक्रिया ही लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या सुमारे चारशे जागा रिक्त झाल्या आहेत. पूर्वीच्या सुमारे सहाशे आणि पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या चारशे अशा एकूण सुमारे एक हजार जागा रिक्त झाल्या आहेत.

 

शिक्षकांच्या रिक्त झालेल्या जागांपैकी फक्त १८२ नवीन शिक्षक जिल्हा परिषदेला मिळाले आहेत. यंदाची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या ४०० जागा रिक्त होत्या. यापैकी या भरतीतील पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने १८२ नवे शिक्षक उपलब्ध करून दिले आहेत. मागील तब्बल बारा वर्षांपासून मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालीच नाही. आधी भरतीवर असलेली बंदी तर, ही बंदी उठल्यानंतर संचमान्यताच निश्‍चित न झाल्याने, शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होऊ शकली नव्हती. ही प्रक्रिया यंदा सुरू झाली असून, त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. राज्य सरकारने राज्यातील शिक्षक भरतीवर २०११ पासून बंदी घातली होती. ही बंदी २०१९मध्ये उठली आहे. परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली नव्हती.

 


राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वर्षभरापूर्वी केली होती. मात्र, यातील निम्म्याही जागा आतापर्यंत भरलेल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जानेवारी २०२३ मध्ये राज्यात ३० हजार शिक्षकांची भरत करण्याची घोषणा केल्यानंतर शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीचीप्रक्रिया राबवली गेली. २१,६७८ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यात मुलाखतीशिवाय १६,७९९ व मुलाखतीसह ४,८७९ पदांचा समावेश होता. त्यातील मुलाखतीशिवाय भरवयाच्या जागांपैकी ११,०८५ उमेदवारांची गुणवत्ता यादी घोषणेनंतर जवळपास एका वर्षाने म्हणजेच २५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करून या शिक्षकांची शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली. 

 

शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त काय म्हणाले?

■ यासंदर्भात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क केला असता आचारसंहितेमुळे त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल डायव्हर्ट केलेले होते.

आचारसंहितेचा अडसर आला का?
•मुलाखती शिवाय केलेल्या या पदांच्या भरतीनंतर मुलाखतीच्या भरतीप्रक्रियेसंदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात येणार होती. मात्र मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि शिक्षण भरती ठप्प झाली. आचारसंहितेची मुदत संपल्यानंतर उर्वरित पदांची भरती करण्याची घोषणा शिक्षण विभागाने मागील महिन्यात केली होती.
•लोकसभेची आचारसंहिता तर संपली मात्र राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू आहे. आधीच जानेवारी २०२३ मध्ये शिक्षक भरती जाहीर करूनही शिक्षण विभागाने ती जलदगतीने पूर्ण केली नाही. त्यानंतर आचारसंहितेच्या • कचाट्यात ही भरती अडकल्याने शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेले लाखो उमेदवार निराशेच्या गर्तेत गेले आहेत.

 


राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागाने शाळांमधील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची शिफारस केली होती. मात्र, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने एक महिन्यापासून नियुक्ती प्रकिया रखडली होती. दरम्यान, शिक्षण विभागास शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची शुक्रवारी (दि.१९) परवानगी प्राप्त झाली. त्यानुसार ज्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे तेथे नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

 

पवित्र पोर्टलमार्फत दिनांक २५ फेब्रुवारीला गुणवत्तेनुसार पात्रउमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरात निहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती. दरम्यान, निवडणूक आयोग यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आणि आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली.

 

आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले. तथापि या विषयाची तातडी, तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने राज्य शासनामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला.

 


 

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया थांबवावी लागली होती. परंतु निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळविण्यात आली होती.

त्याप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिवसानंतर पूर्ववत सुरू करण्यात आलेली होती. दरम्यान, विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम २४ मेला निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्यानुसार २४ मे पासून या क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू केली आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच सादर केला आहे. त्यावर कार्यवाही सुरू आहे. समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता मिळाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आचारसंहितेमधून शिक्षक भरती प्रक्रियेतील यापूर्वीची निवड यादी आणि रूपांतरित जागांसंदर्भातील कार्यवाही करण्यास निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही मंडळी अभियोग्यताधारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करत आहेत, हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. चुकीची माहिती फ्सरविणे आणि आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे, ही गंभीर बाब आहे, असेही मांढरे यांनी नमूद केले आहे.

 

सूट मिळविण्यासाठी प्रयत्न : मांढरे
■ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यात सूट मिळविण्यात आली होती. त्याप्रमाणेच यावेळी देखील शिथिलता मिळविण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत असल्याचे मांढरे यांनी सांगितले.


Maharashtra Shikshak Bharti 2024 Update

Maharashtra Shikshak Bharti 2024: राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 11,085 शिक्षकांची भरती केली. पण, जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या 5500 जागांवर माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, महिला, अनाथ, अंशकालीन अशा सहा प्रकारच्या संवर्गातील उमेदवार मिळालेले नाहीत. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ११ हजार ८५ शिक्षकांची भरती केली आहे. पण, जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या साडेपाच हजार जागांवर माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, महिला, अनाथ, अंशकालीन अशा सहा प्रकारच्या संवर्गातील उमेदवार मिळालेले नाहीत. त्याऐवजी इतर संवर्गातून ही पदे भरतीस परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षण आयुक्तालयाने शासनाकडे केली आहे.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने राज्य शासनाकडून मोठी शिक्षक भरती करण्यात आली आहे. राज्यातील बाराशे डीएड महाविद्यालयांना दहा वर्षांत टाळे लावावे लागले असून सध्या विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीसह व्यावसायिक शिक्षणाकडे वाढला आहे. शिक्षक भरती वेळेत होत नाही, पटसंख्येअभावी अतिरिक्त होण्याची भीती, तीन वर्षाचा शिक्षणसेवक कालावधी, अशी काही कारणे त्यामागे आहेत. पण, आता शिक्षक भरती नियमित होईल, असा निर्णय झाला आहे.

राज्य शासनाने नुकतीच ११ हजार शिक्षकांची भरती केली असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ज्यांना नेमणुका मिळालेल्या नाहीत, त्या सर्वांनाच समुपदेशनाद्वारे शाळांवर नेमणूक दिली जाणार आहे. १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. जूनअखेर समांतर आरक्षणाच्या साडेपाच हजार शिक्षकांच्या जागांची भरती होणार आहे. त्यासाठी लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर शासनाकडून परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शाळांना आता शिक्षक उपलब्ध होणार असून त्यातून जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची गुणवत्ता वाढेल, असा विश्वास शालेय शिक्षण विभागाला आहे.

केंद्र शाळांवरील इंग्रजी शिक्षकाचा विषय पेन्डिंग

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक केंद्र शाळेवर एक इंग्रजी विषयाचा शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय सोपा वाटावा हा त्यामागील हेतू होता. यासंदर्भात सध्या न्यायालयात याचिका दाखल झाली असून इंग्रजी शिक्षक नेमण्याचा निर्णय तूर्तास प्रलंबित आहे. दुसरीकडे शासनाने इंग्रजी शिक्षक नियुक्तीची नेमकी पात्रता काय असावी, यासंदर्भात समिती गठित केली आहे. आगामी काळात यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल.

खासगी संस्थांमध्ये ४८०० पदांची भरती
राज्यातील ज्या खासगी अनुदानित शाळांनी शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टलवर जाहिराती अपलोड केल्या आहेत, त्यांची शिक्षक भरती होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या जागा भरल्यानंतर खासगी अनुदानित संस्थांमधील चार हजार ८०० पदे भरली जातील, असे शिक्षण आयुक्तालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे ज्या संस्थांमध्ये पदे रिक्त झाली आहेत, त्यांनाही ‘पवित्र’वर जाहिराती अपलोड करण्याची संधी आचारसंहिता संपल्यावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.


Shikshak Bharti Update 2024

शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत आतापर्यंत ४ हजार ४७४ उमेदवारांना नियुक्तिपन्न देण्यात आले आहे. त्यातील ४ हजार ९३ उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. आता उर्वरित शिक्षक भरतीसंदर्भातील प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुलाखतीशिवाय शिफारशीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ११ हजार उमेदवारांची शिफारस फेब्रुवारीमध्ये करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया थांबली होती. मात्र, शिक्षण विभागाने भरतीबाबत निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार आयोगाने मतदान झालेल्या जिल्ह्यांत शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी दिली. आता विधान परिषदेतील पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने पुन्हा नियुक्ती प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

मुलाखतीचा टप्पा

मुलाखतीसह पदभरतीही गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. या प्रकारातील पदभरतीसाठी मुलाखत आणि अध्यापनकौशल्य यासाठी ३० गुणांसाठी आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती तयार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.


शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भातील आवश्यक ती कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांचेस्तरावर सुरु आहे. आज अखेर प्राप्त माहितीनुसार ४४७४ अभियोग्यता धारकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. त्यातील ४०९३ उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया दिनांक २०/०५/२०२४ रोजी पूर्ण होत असून त्या दिनांकानंतर उर्वरित शिक्षक पद भरतीबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. पदभरती संबंधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्‌यांवर प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.
विना मुलाखत पदभरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यात आली आहे. त्याच प्रकारे शासन निर्णय दिनांक 6 जुलै 2023 मधील तरतुदीनुसार मुलाखतीसह पदभरती देखील गुणवत्ता पूर्ण पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. या प्रकारातील पद भरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण 30 गुणांसाठी आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure) तयार करण्यात येत आहे.
समातर फेरी, न्यायिक प्रकरणे व तत्सम बाबीसंदर्भात शासन स्तरावरून काही बाबींवर कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासंदर्भात बुलेटिनच्या माध्यमातून योग्य वेळी सविस्तर माहिती देण्यात येईल.
समाज माध्यमां‌द्वारे काही व्यक्ती खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसारित करतात. कोणत्याही माहिती संदर्भात पुराव्यांची खात्री करून माहितीची विश्वासार्हता पडताळावी.
ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्या वेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.


Maharashtra Shikshak Bharti 2024 Update

राज्य निवडणूक आयोगाने शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू होणार नाही. त्यामुळे मतदान झालेल्या ठिकाणी शिक्षक भरतीची नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर मतदान झालेल्या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये लोकसभेचे मतदान पूर्ण झाले आहे. परंतु निवडणूक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर केल्याने आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाला होता. तसेच मे महिन्याच्या सुट्टीत बाहेर जाणारे शिक्षक व कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे ही तारीख बदलून शाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या शेवटी मतदान घ्यावे, या मागणीसाठी शिक्षक भारतीच्या वतीने सुभाष किसन मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने अनिश्चित कालावधीसाठी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आचारसंहितेचा अडथळा दूर झाला असून, यापूर्वी देण्यात आलेल्या आदेशानुसार ज्याठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या जिल्ह्यांनी उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी व स्प्रेडशीटमध्ये माहिती भरावी. याबाबत शुक्रवारी संबंधित जिल्ह्यांचा एकत्रित आढावा घेण्यात येईल, असे मांढरे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

 


 

जिल्ह्यात शिक्षकांची २ हजार पदे रिक्त असतानाही केवळ १ हजार ६८ पदांची भरती करण्यात येणार आहे. या शिक्षक भरतीमुळे तात्पुरते भरण्यात आलेल्या सुमारे ७०० शिक्षकांचे काम बंद करण्यात आले आहे. त्यातच नव्याने भरती प्रक्रिया राबविल्यानंतरही शिक्षकांची ९८६ पदे रिक्तच राहणार आहे. त्यामुळे रिक्त पदांचा डाेलारा सांभाळत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे आव्हान शिक्षण विभागाला पेलावे लागणार आहे. 

गेली १० ते १२ वर्षे नव्याने शिक्षक भरती झालेली नाही. त्यातच निवृत्त हाेणारे शिक्षक, आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची संख्याही फार मोठी असल्याने दरवर्षी रिक्त पदांचा आलेख वाढत चालला आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर हाेऊ लागला. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणीही पालकांकडून सातत्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे करण्यात येत होती. पण, ही मागणी केवळ ऐकण्यापुरतीच मर्यादित राहत हाेती. शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा शासनाला मुहूर्त मिळाला असून, जिल्ह्यात शिक्षकांची १ हजार ६८ पदे भरण्यात येणार आहेत. त्यातही ५४ उमेदवार कागदपत्रे पडताळणीच्या वेळी अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे आता केवळ १ हजार १४ पदांची भरती होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षकांची ९८६ पदे रिक्त राहणार आहेत. ही पदे कधी भरणार, असाही प्रश्न पालकांकडून करण्यात येत आहे.

आधी बदली मग नियुक्ती

शिक्षक भरती करण्यात येत असतानाच पूर्वीच्या शिक्षकांच्या तालुका अंतर्गत बदल्या झाल्याशिवाय नवीन शिक्षकांना शाळा देऊ नयेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. त्यामुळे आधी पूर्वीच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

आचारसंहितेचा फटका

शिक्षक भरतीच प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नवीन भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. निवडणुकीनंतर काही प्रमाणात आचारसंहिता शिथिल करण्यात आली हाेती. पण, त्यानंतर काेकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी नव्याने आचारसंहिता लागू करण्यात आली. ही निवडणूक पार पडल्यानंतर १० जूननंतरच शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

अद्याप नियुक्तीपत्रे नाहीत

शिक्षक भरती सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवीन भरती होणाऱ्या शिक्षकांचे नुकसान झाले. केवळ समुपदेशनाद्वारे शाळांवर नियुक्ती देण्याचे काम शिक्षण विभागाकडून शिल्लक राहिले होते. मात्र, निवडणुकीमुळे शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. त्यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शनही मागविले होते.

काम बंदच्या सूचना

शिक्षक भरतीची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली असल्याने तात्पुरत्या घेण्यात आलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून काम बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांना येत्या शैक्षणिक वर्षापूर्वीच कमी करण्यात आले. मात्र, त्या शिक्षकांना मुदतवाढ दिली असती तर रिक्त पदांची कसर भरून निघाली असती.

 


पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये पदभरती विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे राज्यातील १३ जिल्ह्यांतील पेसा क्षेत्रातील शाळांतील शिक्षक भरती प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली आहे. यामुळे राज्यभरात शिक्षकांची हजारो पदे भरली जात असताना पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीला केव्हा मुहूर्त मिळणार? अशी विचारणा उमेदवारांकडून होत आहे. तेरा जिल्ह्यांतील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये साडेचार हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण आयुक्तालयातर्फे २८ फेब्रुवारीला अनुसुचित जमाती प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी संबंधित जिल्ह्याकडे उपस्थित राहून करून घ्यावी अशी सूचना दिली होती, त्यामुळे पेसा शिक्षक भरतीला गती मिळेल अशी शक्यता होती. मात्र, पेसा शिक्षक भरती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 

 

आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. न्यायालयात दाखल याचिकेवर येत्या ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.


 

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना विनंती करण्यात आली असून, जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षक भरतीसंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना विनंती करण्यात आली असून, जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षक भरतीसंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळाद्वारे सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती. मात्र, निवडणूक झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षक भरतीच्या कार्यवाहीबाबतची माहिती दिली. पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे.

पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि तत्सम पदांतील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने, शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत न होण्याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीही लवकर ण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सन २०१७च्या भरतीमधील २९ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थगनादेशा उठवण्याच्या दृष्टीने अर्ज दाखला शासकीय करण्याबाबत अभियोक्त्यांना विनंती करण्यात आली आहे. त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. उर्वरित भरती प्रक्रिया, तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्ना प्रशासनाकडून सतत केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळाद्वारे सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती. मात्र, निवडणूक झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षक भरतीच्या कार्यवाहीबाबतची माहिती दिली. पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि तत्सम पदांतील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने, शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत न होण्याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीही लवकर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सन २०१७च्या भरतीमधील २९ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थगनादेश उठवण्याच्या दृष्टीने अर्ज दाखल करण्याबाबत शासकीय अभियोक्त्यांना विनंती करण्यात आली आहे. त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. उर्वरित भरती प्रक्रिया, तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही लोक कोणतीही अधिकृत माहिती नसताना, तसेच प्रशासकीय कार्यपद्धती, निर्णयप्रक्रिया अथवा नियमांची माहिती नसताना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यापासून सावध राहण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.


 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती. मात्र आता निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरती प्रक्रियेला परवानगी मिळाली असून, पुन्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पवित्र संकेतस्थळाद्वारे २५ फेब्रुवारी २०२४ ला गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्तायादी व्यवस्थापन जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या-त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती. सर्व जाहिराती या लिंक वर आपण सरळ बघू शकता.  

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेच्या काळात नियुक्तीच्या प्रक्रियेवर निर्बंध आले. या विषयीची तातडीने तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता.

या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीबाबतची कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे, असे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास १९ एप्रिलला प्राप्त झाले आहे. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

“शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित जिल्ह्यातील नियुक्ती संदर्भातील कार्यवाही करण्यात येईल.”


मित्रांनो, आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती. मात्र नवीन अपडेट नुसार निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरती प्रक्रियेला परवानगी दिली असून, आता पुन्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता पुढील टप्यानुसार, पवित्र संकेतस्थळाद्वारे २५ फेब्रुवारी २०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन, जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती. दरम्यान, केेंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली.

 

आचारसंहिता कालावधीत नियुक्तीच्या प्रक्रियेवर निर्बंध आले. या विषयीची तातडी, तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केेंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. या संदर्भात केेंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीबाबतची कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे, असे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास १९ एप्रिल रोजी प्राप्त झाले आहे. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे दिली. शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित जिल्ह्यातील नियुक्तीसंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल, असे मांढरे यांनी सांगितले.

 



संचमान्यतेच्या निकषांत बदल करून पुढील भरतीपासून शारीरिक शिक्षकांची पदे वाढवली जाणार आहेत. शारीरिक शिक्षकांबरोबर कला शिक्षकही नोकर भरतीत तब्बल 9 वर्षांनी भरले जाणार असल्याने पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, अहमदनगर, म. रा. शारीरिक शिक्षण समन्वय समिती, म. रा. शारीरिक शिक्षण महामंडळ, अमरावती, युवा शारीरिक शिक्षक संघटनांनी यासाठी पाठपुरावा केला. नवीन निकषांत शासनाने विशेष शिक्षकाचा दर्जा पुन्हा बहाल करताना, पूर्ण कार्यभारासाठी 6 वी ते 10 वीचा कार्यभार धरून बायफोकल पद्धतीने पद भरती होणार आहे. प्राथमिकला केंद्रस्तरावर नव्याने शारीरिक शिक्षक पद निर्माण केल्याने प्राथमिक विभागालाही शिक्षक मिळणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्य समन्वयक प्रमोद पाटील यांनी दिली. 

शालेयस्तरावर शिक्षक नेमणुकीसाठी प्रत्येक वर्षी शाळांची संचमान्यता करून पदे निश्चित केली जातात. 2014 पासून निकषांत बदल होऊन तुकडीवर आधारित शिक्षक निश्चिती रद्द करून स्तरानुसार वेगवेगळी संचमान्यता होऊ लागली. 2015 पासून शाळांमधील शारीरिक शिक्षकांचा विशेष शिक्षकाचा दर्जा काढून 6 वी ते 8 वी या उच्च प्राथमिकला वर्गीकृत करण्यात आले. त्यामुळे कार्यभार बसत नसल्याने पद भरतीत शारीरिक शिक्षक डावलला जाऊ लागला.

त्यामुळे 2019 च्या शिक्षक भरतीत 0.01 टक्केच शारीरिक शिक्षकांची पद भरती होऊ शकली होती. चालू भरतीतदेखील 36 जागांच्या आसपास उच्च माध्यमिकपर्यंतच्या अतिशय नगण्य जागांची जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. मात्र, शासनाने 15 मार्च रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात संचमान्यतेच्या निकषांत सकारात्मक बदल केले. त्यामुळे पदवीधारकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 


गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात शिक्षण भरती झाली नाही. काही दिवसांपूर्वी शासनाकडून शिक्षण भरती जाहिर केली. मात्र, सहा ते सात वर्षांपासून उमेदवार हे या भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यात 67 हजार रिक्त पदे आहेत. अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने परिस्थिती नक्कीच गंभीर आहे. डी एड आणि बी एड पूर्ण करुन उमेदवारांना वाट पाहावी लागत आहे. अनिवार्य असलेली अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतली गेली. त्यामध्ये 2 लाख 16 हजार 443 उमेदवार उत्तीर्ण झाली. हेच नाही तर गुणवत्ता यादी देखील जाहीर करण्यात आली.

 

केवळ 11 हजार जागा भरण्यात आल्या. या गुणवत्तांना न्याय म्हणून नाही तर राज्यातील जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा शिक्षकांविना होत्या. 25 टक्के पदांची प्रक्रिया सुरू केली. 50 हजार शिक्षकांची भरती होणार असे आव्हान देखील सरकारकडून करण्यात आले होते. सतत शिक्षक भरती होत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे.

 

राज्यातील विद्यार्थी शिक्षकांविना असल्याचे देखील बघायला मिळतंय. 6 आक्टोंबर 2023 आणि 23 जानेवारी 2024 खाजगीकरण विरोधी हजारो गुणवत्ता पुर्ण बेरोजगारांनी मोर्चे काढले. परिणामी राज्यसरकारने माघार घेत खाजगीकरणाचा जीआर मागे घेतला. राज्यातल्या प्रत्येक सर्व परीक्षा उत्तीर्ण असलेला बेरोजगार तरुण शालेय शिक्षण विभागाच्या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे देखील काही परीक्षार्थिनी म्हटले.

 

शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी शिक्षण संस्थांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांची शेवटी आता प्रतिक्षा संपल्याचे दिसले. मात्र, उमेदवारांची संख्या जास्त आणि जागा अत्यंत कमी भरल्या जात आहेत.

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या साईटवर तुम्हाला भरतीची माहिती मिळेल. पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या संकेतस्थळावर शिक्षक भरतीची सर्व माहिती ही आपल्याला मिळेल. राज्यात सध्या डी एड आणि बी एड धारकांची संख्या अधिक आहे आणि त्या तुलनेत जागा अत्यंत कमी प्रमाणात भरल्या जात असल्याने नक्कीच उमेदवारांमध्ये संताप हा बघायला मिळतोय.


Maharashtra Shikshak Bharti 2024: Petition regarding selection list announced on 25.2.2024 through Holy Portal Hon. High Court of Bombay and Hon. The Bench has entered at Aurangabad. In this regard Hon. After the arguments held at the High Court, Bench, Aurangabad, Mr. The High Court has given interim orders and directed to continue this recruitment process. (Received on 12 March 2024)

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक – पवित्र पोर्टल द्वारे दिनांक २५.२.२०२४ रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादीसंदर्भात याचिका मा. उच्च न्यायालय मुंबई व मा. खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेल्या आहेत. या संदर्भात मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाअंती मा. उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत. (प्राप्त दि. १२ मार्च २०२४).

. न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कार्यवाही होईल.
. तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जाची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळविण्यात येत आहेत.
तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यासंदर्भात नेमून दिलेल्या ई-मेल ऍड्रेस चाच वापर करावा.


Maharashtra Shikshak Bharti 2024 New Update

राज्य सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून यंदा पहिल्यांदाच सुरू केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्हा परिषदेला १८२ नवे शिक्षक मिळाले आहेत. या सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. आता येत्या आठवडाभरात या नव्या शिक्षकांना समुपदेशनाच्या माध्यमातून नियुक्तीचे आदेश देणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी गुरुवारी सांगितले. 

 

चालू शैक्षणिक वर्षांची (यंदाची) शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या २७५ जागा रिक्त होत्या. यापैकी या भरतीतील पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने जिल्हा परिषदेला १८२ नवे शिक्षक उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या रिक्त जागांपैकी ९१ जागा अद्यापही रिक्तच आहेत. गेल्या तब्बल बारा वर्षांपासून मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालीच नाही. आधी भरतीवर असलेली बंदी, तर ही बंदी उठल्यानंतर संच मान्यताच निश्‍चित न झाल्याने, शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होऊ शकली नव्हती. ही प्रक्रिया यंदा सुरू झाली असून, त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

 

राज्य सरकारने राज्यातील शिक्षक भरतीवर २०११ पासून बंदी घातली होती. ही बंदी २०१९ मध्ये उठली आहे, परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली नव्हती. दरम्यान, या भरती प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषदेला आणखी नवीन शिक्षक मिळतील.
– रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

 


 

राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निवड समितीतर्फे समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे. त्याबाबत प्रचलित कार्यपद्धतीनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळे पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादी स्थान मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

 

ही प्रक्रिया मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. त्यात जास्तीत जास्त उमेदवार मुलाखतीशिवाय या टप्प्यात सामावले गेले. त्यानंतर मुलाखतीसह या टप्प्यासंदर्भात प्रचलित कार्य पद्धतीनुसार कार्यवाही प्रस्तावित आहे. पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शी आणि नियमबद्ध पद्धतीने कमी वेळात केल्याबाबत उमेदवार, त्यांचे पालक, शिक्षण क्षेत्रातील जाणकारांसह अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया पाठविल्या आहेत. इतकेच नव्हे तर ज्यांची निवड या प्रक्रियेत झाली नाही, अशा उमेदवारांनीसुद्धा प्रक्रियेच्या निष्पक्ष व पारदर्शी कार्यपद्धतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाठविल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

मांढरे म्हणाले, प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्थापन केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमांवरील गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे, तक्रार निवारण समितीकडील अर्जाचे अवलोकन करून निर्णय घेणे आणि प्रचलित कार्यपद्धती अनुसरून प्रक्रिया पुढे नेणे अशा विविध आघाड्यांवर काम करावे लागत आहे. प्रशासकीय मुद्द्यांबाबत समाज माध्यमातून अनाठायी शंका उपस्थित करणे अथवा अन्यप्रकारे अडथळे निर्माण करणे यातून कालापव्यय होऊन पुढील प्रक्रियेत विलंब होत आहे.

 


Shikshak Bharti 2024 Details Update

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील शिक्षक भरती पार पडली. आता खासगी अनुदानित शाळांमधील चार हजार ८७९ शिक्षकांच्या भरतीला सुरवात होईल. त्यात सोलापूर जिल्ह्यातील २६६ शिक्षकांचा समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने नवीन आदेश काढून एका जागेसाठी तीन उमेदवार, असा निर्णय घेतला होता. पण, तो उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शासकीय (रिक्त जागांपैकी ७० टक्के) व खासगी अनुदानित शाळांमध्ये (रिक्त जागांपैकी ८० टक्के) एकूण २१ हजार ६७८ शिक्षकांची पदभरती सुरू आहे. त्यातील १६ हजार ७९९ पदे शासकीय शाळांवरील असून त्या उमेदवारांना मुलाखतीविनाच नेमणूक मिळणार आहे.

गुणवत्ता यादीनुसार ज्यांची निवड झाली आहे, आता त्यांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतील. त्यानंतर महिला, दिव्यांग शिक्षकांना प्राधान्याने सोयीच्या शाळा दिल्या जातील. उर्वरित शिक्षकांना रिक्त पदांनुसार समुपदेशनाद्वारे ज्या त्या शाळांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. या शिक्षक भरतीतून सोलापूर जिल्हा परिषदेला जवळपास ५०० शिक्षक मिळणार असून ६० खासगी संस्थांमध्येही २६६ शिक्षकांची भरती होणार आहे. तत्पूर्वी, खासगी संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरून निवडलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडतील.

 

नवीन शिक्षकांना निवृत्तीपर्यंत एकाच जिल्ह्यात नेमणूक
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये आता नव्याने नेमणूक होणाऱ्या शिक्षकांना निवृत्त होईपर्यंत त्यांच्या स्वजिल्ह्यात जाता येणार नाही. तसे संमतीपत्र त्यांच्याकडून घेतले जाणार आहे. जिल्ह्याअंतर्गत बदल्या होतील, पण आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद करण्यासंदर्भातील शासन निर्णय झाला आहे. दरम्यान, आता काही दिवसांत यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्यांनाही नियुक्ती मिळणार असून जिल्हा परिषदांनी त्या पात्र उमेदवारांना कार्यमुक्त करायचे आहे.

 

खासगी संस्थांमध्ये डोनेशन किती?
टीईटी उत्तीर्ण ज्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे, ज्यांनी खासगी शैक्षणिक संस्थांची निवड केली आहे, त्या उमेदवारांना संबंधित संस्थांमध्ये मुलाखती द्याव्या लागतील. सोलापूर जिल्ह्यातील ६० संस्थांमध्ये २६६ शिक्षकांची भरती होणार आहे. शिक्षक पदासाठी १५ ते २० लाखांपर्यंत डोनेशन घेतले जात असल्याची चर्चा आहे. पवित्र पोर्टलवरून भरती होणाऱ्या उमेदवारांची निवड गुणवत्तेवरून की डोनेशनवरून होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

राज्यात गेल्या २० वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा रविवारी रात्री उशिरा पूर्ण करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील शाळांमध्ये मुलाखतीशिवाय जवळपास ११ हजार नवीन शिक्षकांची भरती झाली आहे. त्यामुळे गेल्या १० ते १२ वर्षांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या काही उमेदवारांची शिक्षक म्हणून भरती झाली आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२ नुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून ५ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत प्राधान्यक्रम घेण्यात आले होते.

त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील आणि मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील रिक्त जागांसाठी उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली आहे. मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, ‘पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही प्रभावाखाली न येता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना समाज माध्यमांवर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले. तसेच अभियोग्यताधारकांच्या व्यक्तिगत संदेशांना सुद्धा उत्तर देण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास कोणासही संधी मिळू नये, यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांचे फोन रेकॉर्ड करावेत, फोटो ठेवावेत आणि अशांविरुद्ध थेट पोलिस तक्रार करावी, असे खुले आवाहन केले होते. अभियोग्यताधारकांना संभ्रमित करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या गेल्या.’ या प्रक्रियेदरम्यान काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्याचे मंत्रालय स्तरावरून शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी तातडीने आणि प्रगल्भतेने निराकरण केल्यामुळे प्रक्रिया पुढे नेणे सुकर झाल्याचे मांढरे यांनी सांगितले. या भरती प्रक्रियेतून निवड झालेले नवीन शिक्षक हे विद्यार्थी घडविण्याच्या कामात त्यांचे पूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा असल्याचे मांढरे यांनी सांगितले.

 


शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या (Shikshak Bharti 2024) माध्यमातून राज्यभर शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या पदभरती प्रक्रियेबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच संगणकीय प्रणालीच्या परीक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे; अशी माहिती शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे. 

शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयांचे गट, माध्यम, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त केलेले गुण, उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण, विषय इत्यादी बाबींचे (Shikshak Bharti 2024) संगणकीय प्रणालीतून परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल; असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

फसवणूक झाल्यास पोलिसांकडे जा (Shikshak Bharti 2024)
शिक्षक भरतीबाबत उमेदवारांची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या व्यक्तींबाबत पोलिसांकडे किंवा शिक्षण विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे यापूर्वी करण्यात आले आहे. पवित्र पोर्टल (Pavitra Portal) मार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पद भरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार केली जात आहे. या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून 14 फेब्रुवारीपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहेत. याच उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.

 

 

 

पवित्र पोर्टलमार्फत होत असलेली शिक्षक भरती मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणक 1 वर आधारित गुणवत्तेनुसार होत आहे. त्यामुळे संबंधित भरतीमध्ये अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी देतो, अशा प्रकारची खोटी आश्वासने देणाऱ्या दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील शिक्षक भरतीसाठी पात्र अभियोग्यताधारकांना केले आहे. मांढरे म्हणाले, शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून, पात्र अभियोग्यताधारकांना संस्था/ जिल्हा परिषदेमधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे, ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून, त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता घेण्यात आलेली आहे. असे असतानाही अभियोग्यता धारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही अनधिकृत दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. .

 

यासंदर्भात सर्वांना कळविण्यात येते की, ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असून, त्यामध्ये हस्तक्षेपाला वाव नाही, त्यामुळे अशाप्रकारे कोणी फसवणूक करत असेल, तर संबंधित पोलिस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी, अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडूनदेखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल. दरम्यान, असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींवर पोलिस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येत आहे. शिक्षक भरतीची खोटी आश्वासने देऊन मागील भरतीच्या वेळी काही दलालांनी उमेदवारांची फसवणूक केली असल्याची बाब काही अभियोग्यताध एकांनी व्यक्त केली आहे. संगणकाद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची फसवणूक करू शकतात. त्याला पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील, तर तातडीने ती बाब प्रशासनाच्या किंवा जवळच्या पोलिस स्टेशनच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहनदेखील मांढरे यांनी केले आहे.

 


राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोचली आहे. पात्र अभियोग्यताधारकांना संस्था किंवा जिल्हा परिषदेतील नियुक्ती संदर्भात संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून, त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेत आहोत, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे. याची सर्व उमेदवार व संबंधितांनी नोंद घ्यावी

पाच वर्षांहून अधिक कालावधीच्या प्रतीक्षेनंतर राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेला मुहूर्त सापडला आहे. सुमारे २१ हजार ६७८ रिक्त जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता नियुक्तीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मात्र अभियोग्यता धारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण करत असल्याचे निरीक्षण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नोंदविले आहे. ते म्हणतात, ‘‘भरती प्रक्रियेत त्यांची फसवणूक करण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. अमुक जिल्हा परिषद मध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करून देतो.

 

जवळच्या संस्थेत नोकरी देतो, अशी खोटी आश्वासने देऊन मागील भरतीच्या वेळी काही दलालांनी उमेदवारांची फसवणूक केली असल्याची बाब काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे.’’ संगणकाद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची फसवणूक करू शकतात. त्या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे मांढरे म्हणाले. दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती किंवा संपर्कातील व्यक्ती यांच्यावर पोलिस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

 


 

शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यताधारकांना संस्था/जिल्हा परिषदेमधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे, असे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. अभियोग्यता धारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही अनधिकृत दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत सर्वांना सुचित करण्यात येते की, ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असून त्यामध्ये मानवी हस्तक्षेपाला वाव नाही.

त्यामुळे अशाप्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलिस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी. फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही श्री. मांढरे यांनी दिली आहे. शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना आमिष दाखवून त्यांची दिशाभूल किंवा फसवणूक करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींवर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवली जात आहे.

 


 

शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक :

मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहशिक्षक पदावर नियुक्तीसाठी जाहिरातीमधील शासनाचे नियम आणि धोरणानुसार प्राधान्यक्रम द्यावा. मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम (डी.एड.) पूर्ण केलेल्या उमेदवारांना त्यांच्या माध्यमानुसार सहशिक्षक पदावर नियुक्तीकरिता बुधवारच्या (दि.१४ फेब्रुवारी) मध्यरात्रीपर्यंत प्राधान्यक्रम देता येईल, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी मंगळवारी दिले आहेत. या सुनावणीवेळी शिक्षण उपसंचालक राजे शिंदेही हजर होते. मुदतवाढीच्या संदर्भातील माहिती पवित्र पोर्टलवर दिल्याचेही सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षकांच्या भरतीच्या अनुषंगाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ साठी (टीएआयटी) जाहिरातीद्वारे अर्ज मागविले होते. याचिकाकर्ता संतोषकुमार आनंदराव मगर व इतर (रा. छत्रपती संभाजीनगर) या मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज केले होते.

दरम्यान, पुणे येथील शिक्षण आयुक्त यांनी २८ जानेवारी २०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून ज्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे, अशा उमेदवारांना सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नियक्तीकरिता प्रथम प्राधान्य देण्याबाबत कळविले होते. याचिकाकर्ते मराठी माध्यमातून शिकलेले असल्यामुळे त्यांना नियुक्तीकरिता सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा प्राधान्यक्रम देता येत नव्हता. म्हणून त्यांनी अॅड. केतन डी. पोटे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचे शिक्षण जरी मराठी माध्यमातून झाले असले तरी त्यांना गुणवत्तेनुसार मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नियुक्तीकरिता पसंतीक्रम देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती.

 

पवित्र पोर्टलवर दिनांक ०५/०२/२०२४ पासून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून व आजपर्यंत १,४१,४४७ अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत. तर १,३५,८५५ अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम लॉक देखील केले आहेत.

दरम्यान मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक (स्टॅम्प) ४५३८/२०२४ रिट याचिका क्रमांक १७५८/२०२४, १७५९/२०२४, १६०६/२०२४ दाखल याचिकांमध्ये निर्देश झाले आहेत. रिट याचिका क्रमांक १६०६/२०२४ या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. रिट याचिका क्रमांक १६०६/२०२४ मधील याचिकाकर्त्याची मागणी विचारात घेता त्या संदर्भात न्यायालयाचे स्पष्ट निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्यावरील कार्यवाही करता येत नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक १३/०२/२०२४ पर्यंत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे. 

प्रधान्यक्रम जनरेट करण्यासाठी व लॉक करण्यासाठी दिनांक 12 फ्रेबुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच शिक्षक भरती घेण्यात येणार आहेत. राज्यभरातील जिल्हापरिषदेचे सुमारे 1 हजार खासगी शिक्षण संस्थांमधील 20 हजारांहून अधिक जागांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या  आहे. यातच अंतर्गत तब्बल 16, 500 जागांवर मुलखात न घेता नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच उर्वरित जागांवर मुलाखती घेऊन नियुक्त केल्या जातील, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.

 

सर्व जाहिराती या लिंक वर आपण सरळ बघू शकता.

महत्त्वाच्या सूचना
– प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना आणि ‘यूजर मॅन्युअल दिले आहे.
– उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी संकेतस्थळ : https://tait2022.mahateacherrecruitment.org.in
– उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम लॉक करण्यासाठी कालावधी : ८ आणि ९ फेब्रुवारी
– प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल, त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल
– पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी ‘edupavitra2022@gmail.com’ या ईमेलवर पत्रव्यवहार करावा.

भरतीच्या प्रक्रियेतील आकडेवारी
– प्रमाणित अर्ज : १,६३,०५८
– प्राधान्यक्रम दिलेले : ७,८७०

मंगळवारपर्यंत ५७००० उमेदवारांची नोंदणीपवित्र पाेर्टलवर गेल्या साेमवारी रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी आठ हजार जणांनी प्राधान्यक्रम जनरेट केले हाेते.त्यानंतर मंगळवारी रात्री ८:०० पर्यंत ५७ हजार उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले हाेते. बुधवारपासून पाेर्टलवर तांत्रिक अडचण येण्यास सुरुवात झाल्याचे निदर्शनास आले.शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून बुधवारी दुपारी अचानकपणे ४:०० ते ६:०० या कालावधीत देखभाल दुरुस्तीसाठी पवित्र पाेर्टल बंद ठेवले हाेते.मात्र, त्यानंतरही प्राधान्यक्रम भरण्यास अडचणी येतच आहेत. ८ फेब्रुवारीपासून प्राधान्यक्रम लाॅक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार हाेती.मात्र, सायंकाळपर्यंत ही सुविधा सुरू झाली नाही. गुरुवारी सायंकाळी तर पाेर्टल ठप्प पडल्याचेही अनेक उमेदवारांनी सांगितले.

Educational Qualification For Maharashtra Shikshak Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
केंद्रप्रमुख 1. फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

2. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी. कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

किंवा

1. प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

2. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील.

Salary Details For MSEC Pune Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
केंद्रप्रमुख Rs.41,800/- to Rs.1,32,300/-

How To Apply For Maharashtra Shikshak Jobs 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वत:चा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे.
  • ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.
  • सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 15/06/2023 रोजी पर्यंत सुरु राहील.
  • त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
  • विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

Exam Pattern – परीक्षेचे स्वरूप:-

  1. परीक्षेचे टप्पे :एक लेखी परीक्षा
  2. परीक्षेचे स्वरूप:- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
  3. प्रश्नपत्रिका :एक 
  4. एकुण गुण:२०० लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम: – परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील :-

Maharashtra Shikshak Recruitment 2023

Selection Process For Maharashtra State Examination Council Pune Recruitment 2023

  • लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल
  • जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही
  • भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी / निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

Maharashtra Shikshak Vacancy details 2023

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Teachers Recruitment 2023 | education.maharashtra.gov.in 2023

Organizer Name Maharashtra Education Department
Recruitment Name Maha Teachers Recruitment 2023
Post Name Teachers
Total Number of Vacancies
Job Type Government Job
Job Location Maharashtra
Age Limit Open Category-18 to 38 years

Reserved category – 18 to 43 years.

Pay Scale / Salary Update Soon
Application Mode Online/ Offline
Last Date for Online Application Update Soon
Official Website education.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

79 Comments
  1. Raundale Prashant says

    Penting teacher post is not available,..???

  2. MahaBharti says

    shikshak bharti 2024 All Latest Recruitment Advertisements published

  3. RIHIT TAYDE says

    CRAFT TEACHER POST AVAILABLE ?

  4. RIHIT TAYDE says

    CRAFT TEACHERS POST AVAILABLE ?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड