JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

कारागृह विभाग स्टेनोग्राफर निम्न श्रेणी – अंतिम निकाल जाहीर | Maharashtra Prison Department Result 2025

Maha Prison Result

कारागृह विभागातील स्टेनोग्राफर या संवर्गातील रिक्त पदे भरणेकरीता पोलीस आयुक्तालय,  यांचे कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या कारागृह स्टेनो भरती  परीक्षेत प्राप्त गुणांनुक्रमानुसार निकाल खालील यादी मध्ये बघू शकता. या संदर्भातील अधिक माहितीवेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Stenographer Lower Grade – Final Result

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 

 


Maha Prison Pune Result, Written Exam Merit List Schedule

राज्यातील सर्व तुरुंग कैद्यांनी खचाखच भरले आहेत. मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात तर तीनपटीहून अधिक कैदी आहेत. यामुळे तुरुंगातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कामाचा प्रचंड भार येत असताना मुंबईच्या कारागृहातील विविध पदांसाठी ७१७ जण उत्तीण होऊन पाच महिने उलटले तरी त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. राज्यातील इतर कारागृहांमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होऊन अधिकारी कर्मचारी रुजू झाले. मात्र, मुंबईतील कारागृहाची प्रक्रिया रेंगाळल्यामुळे उत्तीर्ण उमेदवारांचे नुकसान होत आहे. राज्यातील सर्व कारागृहांची एकूण कैदीक्षमता २७ हजार १८४ असताना त्यात ३९ हजार ५२७ कैदी आहेत आर्थर रोड कारागृहाची क्षमता ९९० असताना तेथे तीन हजार २६८ कैदी असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अधिवेशनादरम्यान दिली. गेल्या आठवड्यात आर्थर रोड कारागृहात तर क्षुल्लक कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. या सर्व परिस्थितीचा तुटपुंजा कर्मचाऱ्यांवर भार येत असल्याने शासनाच्या वतीने तुरुंगातील विविध पदांसाठी राज्यात भरती प्रक्रिया राबवली. मुंबईतील कारागृहांसाठी ७१७पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली. मुंबईत असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातील उमेदवारांनी यासाठी अर्ज केले. ही भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे देण्यात आली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा घेत मेरिटनुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी फेब्रुवारी २०२५ मध्ये जाहीर केली. निकाल लागून पाच महिने उलटले तरी नियुक्ती केली जात नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे.

 

मुंबई पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारित्र्य पडताळणी, वेगवेगळे आरक्षण आणि संवर्ग याबाबतच्या कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम यादी द्या,त्यानंतर नियुक्ती प्रक्रिया राबवली जाईल, अशी मागणी तुरुंग प्रशासनाकडून केली जात आहे. तर दुसरीकडे उमेदवारांना वेगवेगळी कारणे पुढे करून या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात नियुक्ती मिळेल, अशी आश्वासने दिली जात आहेत. तुरुंग प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे नियुक्ती कधी मिळेल, असा प्रश्न उत्तीर्ण उमेदवार उपस्थित करीत आहेत.

 

 

कारागृह विभागातील स्टेनोया संवर्गातील रिक्त पदे भरणेकरीता पोलीस आयुक्तालय,  यांचे कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या कारागृह स्टेनो भरती  परीक्षेत प्राप्त गुणांनुक्रमानुसार निकाल खालील यादी मध्येबघू शकता. या संदर्भातील अधिक माहितीवेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

आपला निकाल बघा

 


कारागृह विभागातील पश्चिम विभागातील कारागृहांतर्गत कारागृह शिपाई (अराजपत्रित गट क) या संवर्गातील एकूण ५१३ रिक्त पदे भरणेकरीता पोलीस आयुक्तालय, पुणे शहर यांचे कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या कारागृह शिपाई पदभरती (पश्चिम विभाग) सन २०२२-२३ अंतर्गत दिनांक २९.०१.२०२५ ते २६.०३.२०२५ या कालावधीत शारिरीक व मैदानी चाचणी परीक्षेत व दिनांक ०९.०४.२०२५ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत प्राप्त गुणांनुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन कारागृह शिपाई एकूण ५१३ पदांची प्रवर्गनिहाय निवडसूची पोलीस आयुक्तालय, पुणे शहर यांचे https://punepolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. कारागृह विभागाचे कारागृह शिपाई संवर्गातील निवडयादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज उदा. शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, समांतर आरक्षण संबंधी पुरावा व इतर दस्तऐवज यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह स्वतः (प्रतिनिधी चालणार नाही) दस्तऐवज पडताळणीकरीता सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे संबंधीत दिनांकास सकाळी ०९.०० वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे-६ येथे समक्ष उपस्थित रहावे, तसेच दस्तऐवज पडताळणीचे वेळी उमेदवाराने स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत महाआयटी प्राप्त ओखळपत्र व आवेदन पत्र, स्वतःचे आधारकार्ड व त्यांची स्वसाक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

 

 कागदपत्र पडताळणी यादी PDF डाउनलोड करा

 


Pune Maha Prison Recruitment Result is published now. Candidates can download the result PDF from given link. Also the details and exam date are given in following notification. Candidates can check their Marks from following given PDF merit list File. 

दिनांक ०९/०४/२०२५ रोजी कारागृह शिपाई (पश्चिम विभाग) भरती २०२२-२०२३ मधील कारागृह शिपाई पदांकरिता एकूण ७७१२ उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती. सदर लेखी परीक्षेचा गुण्तक्ता दि.२१/०४/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. सदर गुणतक्त्याच्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपींनुसार पडताळणी करुन लेखी परीक्षेकरिता उपस्थित असलेल्या एकूण ७४७३ उमेदवारांचा मैदानी चाचणी, लेखी परीक्षेचे गुण व एनसीसी “क” प्रमाणपत्रधारक उमेदवारांचे बोनस/अधिक ५ गुण एकत्र करुन, सामाजिक व समांतर आरक्षणासह एकत्रित गुणतक्ता खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच सदर गुणतक्त्याचे अनुषंगाने सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक २६/०४/२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वा पर्यंत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून, आपला लेखी अर्ज संपूर्ण नांव, चेस्ट क्रमांक व मोबाईल नंबर नमूद करुन कागदपत्रासह सादर करावा. विहित वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

निकाल डाउनलोड करा 

 


अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे आस्थापनेवरील कारागृह शिपाई (पश्चिम विभाग) भरती-२०२२-२०२३ मधील ७७१२ पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा दि. ०९/०४/२०२५ रोजी पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे घेण्यात येवून सदर लेखी परीक्षेची उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात आली होती. सदर उत्तरतालिकेस अनुसरुन उमेदवारांनी सादर केलेल्या आक्षेपांनुसार फेरतपासणी करण्यात येवून दि. १५/०४/२०२५ रोजी शुध्दीपत्रकासह (Final Answer Key) प्रसिध्द करण्यात आली होती. सदर उत्तरतालिके नुसार लेखी परीक्षेकरिता उपस्थित राहिलेल्या एकूण ७४७३ उमेदवारांना मिळालेल्या गुणांचा गुणतक्ता यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर गुणतक्त्यातील गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी दि. २३/०४/२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहुन आक्षेप नोंदवावेत. तसेच आक्षेप नोंदविताना उत्तरपत्रिकेची (OMR Sheet) मुळ कार्बन प्रत व लेखी परीक्षेचे ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. उत्तरपत्रिकेची (OMR Sheet) मुळ प्रत सोबत न आणल्यास आपले आक्षेपांची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. 

 

 

लेखी परीक्षेचा निकाल पहा

 

 


Previous Updates

पुणे कारागृह विभागाचे मैदानी चाचणीचा निकाल

 


Maharashtra Prison Department Result 2024: कारागृह विभाग सरळसेवा लिपिक वरिष्ठ लिपिक पदभरती-२०२३-२४ अंतर्गत दिनांक – १९.३.२०२४ ते २१.३.२०२४ या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणांनुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेवून लिपिक एकुण १२५ पदे व वरिष्ठ लिपिक एकुण ३१ पदांची प्रवर्गनिहाय निवडसूची कारागृह विभागाचे www.mahaprisons.gov. in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती त्यानुसार सदर उमेदवारांची मुळ कागदपत्र तपासणी करण्यात आली मात्र त्यापैकी जे उमेदवार गैरहजर होते व जे मुळ कागदपत्र तपासणीमध्ये अपात्र झाले आहेत त्यांची निवड रद्द करण्यात आली असून त्याऐवजी प्रतिक्षायादीतील उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड मुळ दस्तऐवज पडताळणी, वैद्यकिय तपासणी व पूर्वचारित्र्य पडताळणीचे अधीन राहून करण्यात आली आहे करण्यात आली आहे. त्याची यादी सोबत जोडण्यात आली आहे. . 

कारागृह विभागाचे लिपिक व वरिष्ठ लिपिक संवर्गातील निवडयादीत नमुद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज जसे शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, समांतर आरक्षण संबंधी पूरावा व इतर सर्व दस्तऐवज यांची मुळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह स्वतः (प्रतिनिधी चालनार नाही) दस्तऐवज पडताळणीकरिता खालील नमुद ठिकाणी व वेळी समक्ष उपस्थित रहावे.

Karagruh Vibhag Document Verification 2024

Karagruh Vibhag Document Verification 2024

Download Maharashtra Prison Document Verification 2024

Nagpur Jail Police Bharti Result

Maharashtra Prison Department Result 2024: Under Police Bharti 2024, Maharashtra Karagruh Vibhag has published a list of candidates who had qualified in physical test held on 16th July 2024. Download Nagpur Central Jail Physical Result Pdf From below Link:

महाराष्ट्र कारागृह विभाग निकाल 2024: पोलीस भारती 2024 अंतर्गत, महाराष्ट्र कारगृह विभाग यांनी 16 जुलै 2024 रोजी झालेल्या शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा शारीरिक निकाल पीडीएफ खालील लिंकवरून डाउनलोड करा

DateTitleInfo
Jul 16, 2024Qualifed for Written Exam-Ngp City Police Constable ListDownload
Jul 16, 2024JAIL POLICE BHARTI -PHYSICAL TESTDownload


Maha Karagruh Vibhag Final Result PDF

Karagruh Vibhag Document Verification Schedule –  कारागृह विभाग सरळ सेवा लिपिक, वरिष्ठ लिपिक पद भरती २०२३-२४ अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी व पूर्व चारित्र्य पडताळणी यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार ८ ते ११ जुलै या कालावधीत ही प्रक्रिया पार पडणार आहे. कारागृह विभाग कागदपत्र वेळापत्रक आज  प्रकाशित झाले आहे. खाली जाऊन आपण डाऊनलोड करु शकता.

Karagruh Vibhag Document Verification 2024

कारागृह विभागाने लिपिक व वरिष्ठ लिपिक संवर्गातील निवड यादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात अपलोड केलेले कागदपत्र ज्यात शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, क्याचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, समांतर आरक्षण संबंधी पुरावा व इतर सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्व साक्षांकित प्रतींसह उमेदवाराला दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत समक्ष उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Karagruh Vibhag Final Result Download – कारागृह विभाग अंतिम निकाल आज  प्रकाशित झाले आहे. खालील लिंक वर जाऊन आपण डाऊनलोड करु शकता.

1   Sr.Clerk Selected List New01/07/2024पी डी फ1176DownLoadSr.Clerk Selected List  डाऊनलोड
2   Sr Clerk Waiting List New01/07/2024पी डी फ1461DownLoadSr Clerk Waiting List डाऊनलोड
3   Clerk Waiting List New01/07/2024पी डी फ2650DownLoadClerk Waiting List डाऊनलोड
4   Clerk Selected List New01/07/2024पी डी फ6369DownLoadClerk Selected List डाऊनलोड

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड