खुशखबर! १० हजार पोलिसांची भरती १५ सप्टेंबरपासून सुरु होणार! उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती थोडी लांबली! – Maharashtra Police Recruitment 2025

Maharashtra Police Recruitment 2025

Maharashtra Police Bharti 2025 Recruitment process will begin from 15th September 2025!! This is really a big update for all cadidates preparing for Police Bharti 2025. The registration process will begin soon for this recruitment process. More details are given below.

मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहे. सध्या आपण सर्व पोलीस भरतीची आतुरतेने वाट बघत आहात, यातच आता काल, गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. पण, सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा, यामुळे पोलिस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतरच म्हणजे साधारणत: १५ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती राज्याच्या अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) कार्यालयातील सूत्रांनी दिली. २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची एकूण १० हजार पदांची भरती यावेळी होईल, असेही त्यांनी सांगितले. यात एक महत्वाचा अपडेट म्हणजे या वर्षीपासून  एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन राहणार आहे. चालत पर पूर्ण माहिती बघूया.. आणि हो पोलीस भरतीची माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी  या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Maharashtra Police Bharti 2025

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून ६ सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघतील. त्यानंतर पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मागील भरतीवेळी पावसाळ्यात उमेदवारांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता आगामी भरती पावसाळ्यानंतर गणेशोत्सव संपल्यावर होणार आहे. आगामी दहा हजार पोलिस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे १२ ते १३ लाख अर्ज अपेक्षित आहेत. सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे. सुरवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल.

दरम्यान, एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या पोलिस भरतीवेळी १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाखांवर अर्ज आले होते. आताही अर्जांची संख्या त्या प्रमाणातच राहील, यादृष्टीने पोलिस भरतीचे नियोजन केले जात आहे. पोलिस भरतीची मैदानी एकाचवेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल. मैदानीतून १:१० प्रमाणात (एका पदासाठी दहा उमेदवार) उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांच्या पुढाकारातून मागील तीन वर्षांत ही दुसरी मोठी पोलिस भरती होत आहे.

एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन

राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलिस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजरचुकीने हजर राहिला असेल आणि तो त्याठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला, तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात येईल, असा भरतीचा महत्त्वाचा निकष असणार आहे.

 

 

Maharashtra Police Recruitment 2025 – राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांच्या रिक्त जागा यांचा मेळ साधण्यासाठी येत्या दोन महिन्यांत १०,००० पोलिस शिपायांची भरती होणार आहे. या संदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. जानेवारीअखेरपर्यंत सर्व जिल्ह्यांची बिंदुनामावली शासनाकडून मागवण्यात आली आहे. या वर्षी ऑगस्ट २०२५ च्या आधी पोलीस भरतीची फिजिकल पूर्ण करण्याचे राज्य सकाळचे उद्धिष्ट असल्याचे समजते. या संदर्भातील अधिकृत माहिती आणि अपडेट लवकरच आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच about Maharashtra Police Bharti 2025! 

Maharashtra Police Recruitment 2025

 

Maharashtra Police Recruitment 2025 process will begin soon..!! To tackle the rising crime rates and fill vacant police positions, the Maharashtra government is set to recruit 10,000 police constables in the next two months! The recruitment process has already begun at the government level, and district-wise vacancy lists have been requested by the end of January for Maharashtra Police Bharti 2025. police bharti 2025 online form date Will be publishd soon. The goal is to complete the physical tests before August 2025, making this one of the most significant police recruitment drives of the year. Stay tuned—official updates will be published soon on Mahabharti!

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?

  • पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF, आणि कारागृह शिपाई: इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे。
  • पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे。

Documents Required for Maharashtra Police Recruitment 2025 Application Form

  • Aadhar Card. (आधार कार्ड.
  • Residence Certificate. (निवास प्रमाणपत्र.)
  • 10th Marksheet. (10वी मार्कशीट.)
  • 12th Marksheet. (12वी मार्कशीट.)
  • Graduation Certificate. (पदवी प्रमाणपत्र.)
  • Computer Proficiency Certificate. (संगणक प्रवीणता प्रमाणपत्र.)
  • Character Certificate. (चारित्र्य प्रमाणपत्र.
  • Signature. (स्वाक्षरी.)
  • Photograph. (फोटो) .

 

Maharashtra Police Bharti 2024 | Shipai Bharti 2024 

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी? 

What is the height of Maharashtra police? | Is height important for Constable?

महिला (Female) महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुष (Male) पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड