पोलीस निरीक्षकांची ८०० पदे रिक्त! – Maharashtra Kantrati Bharti 2023
Maharashtra Kantrati Bharti 2023
Maharashtra Kantrati Bharti 2023 – There is good news for young people looking for jobs. What has been waiting for is the GR of government recruitment. As many as 85 cadre government posts will also be filled directly through corporate companies. Thousands of government posts in as many as 138 cadres will now be filled directly through computer system. For this, nine private companies will be given the contract for recruitment of direct service posts.
निवडणूक बंदोबस्तासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पोलीस निरीक्षकांची राज्यात सुमारे ८०० पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. गृहखात्याकडून मागील दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक दर्जाची पदे भरली न गेल्याने ही पदे रिक्त आहेत. ३० ते ३५ टक्के पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने पोलीस दलावर या महत्त्वपूर्ण पदांअभावी कामाचा ताण वाढत असल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे गृह विभागाने ही रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी पोलीस दलातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सण, उत्सव, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने, गणेशोत्सव, ईद, पोळा, निवडणूक बंदोबस्तासह विविध प्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक अशी दहा ते बारा वर्षे सलग सेवा दिल्यानंतर पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती दिली जाते. त्यामुळे हे पद केवळ दांडग्या अनुभवातून पदोन्नतीने भरले जाते. राज्यात १ हजार ६९९ पोलीस ठाणी असून या पोलीस ठाण्यांसह पोलीस मुख्यालय, पोलीस अधीक्षकांच्या अधिनस्त विविध शाखांमध्ये पोलीस निरीक्षकांची पदे भरली जातात. राज्यात पोलीस निरीक्षकांची सुमारे ३ हजार ५०० पदे मंजूर आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
✅ZP हॉल तिकीट उपलब्ध; Download करा जिल्हा परिषद ऍडमिट कार्ड लिंक उपलब्ध!
✅मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!
✅WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज
⚠️आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!
✅आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मात्र मागील दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक दर्जाची पदे भरली न गेल्याने पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो सहाय्यक पोलीस निरीक्षकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षकांची तब्बल ८०० पदे रिक्त असल्याने कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांकडे प्रभारीची जबाबदारी सोपवली जात आहे. ३० ते ३५ टक्के पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने आकडा फुगत जातो. पोलीस दलावर या महत्त्वपूर्ण पदांअभावी कामाचा ताण वाढत असल्याची चर्चा पोलीस महासंचालक स्तरावरून पोलीस वर्तुळात आहे. मागील दोन वेळीच पदोन्नतीने पदे भरली जा वर्षांपासून पोलीस निरीक्षक दर्जाची पदे भरण्यासाठी गृहखाते, पोलीस महासंचालक स्तरावरून हालचाली न झाल्यामुळे ही पदे रिक्त असल्याचे बोलले जात आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या गोष्टीची वाट पाहिली जात होती तो शासकीय कंञाटी भर्तीचा जीआर अखेर निघाला आहे. यामुळे तब्बल 85 संवर्गातील शासकीय पदं ही कंञाटी कंपन्यांमार्फत थेट भरली जाणार आहेत. तब्बल 138 संवर्गातील हजारो शासकीय पदं यापुढे थेट कंञाटीपद्धतीनेच भरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.शिपाई ते इंजिनीअरची विविध पदे थेट कंञाटी पद्धतीनेच पदं भरली जाणार आहेत. यासाठी 9 खासगी कंपन्यांना सरळसेवा पदांच्या भर्तीची कंञाटं दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सर्व सरकारी कार्यालयात आता खासगी कंपन्यांनी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी काम करणार आहेत. हे अधिकारी नियुक्त करण्याचे सर्व अधिकार कंपन्यांना देण्यात आले आहेत. त्यांचा पगार निश्चित करण्यात आला असून तो सरकार देणार आहे. त्यातील पंधरा टक्के कमिशन कंपन्यांना मिळणार आहे. सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व आस्थापना विभागात लागणारे कर्मचारी याच कंपन्याकडून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दीडशेपेक्षा अधिक प्रकारची पदे निश्चित केले असून यानुसार हजारो कर्मचाऱ्यांची भरती होईल. यामध्ये इंजिनिअर, व्यवस्थापक, संशोधक, अधीक्षक, प्रकल्प समन्वयक, सल्लागार, ग्रंथपाल अशा अनेक प्रकारची पदे आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालयात आता अधिकारी ते शिपायापर्यंत सर्वच कंत्राटी पदे असणार आहेत.
संबंधित कंञाटी कंपन्यांना शासनाकडून रितसर कमिशन मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर कंञाटं मिळणाऱ्या कंपन्यांमध्ये काही सत्ताधारी आमदारांच्या कंपन्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. कंत्राटी भर्ती सुरळीत पार पाडावी यासाठी संबंधित खात्याचे मंञी या कंञाटी भर्तीवर लक्ष ठेवणार आहेत. या कंञाटी शासकीय भर्ती सर्वांसाठी खुली असणार आहे. कोणताही उमेदवार यासाठी अर्ज करु शकतो. तसेच यासाठी कोणतेही आरक्षण लागू नसेल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांना सरळ कंञाटी कामगार बनण्याची संधी मिळणार आहे.