सतरा हजार बेरोजगारांची नोंदणी – लॉकडाउनमध्येही रोजगार ‘अनलाॅक’
Maharashtra Job Fair 2020
कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, असे असतानाही गेल्या तीन महिन्यांत कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाइन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. या कालावधीत विभागाच्या विविध व्यासपीठांवर एक लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी नोंदणी केली असून, या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले असून, त्यावर बेरोजगार उमेदवार नोंदणी करत आहेत; तर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजकांमध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती मलिक यांनी यावेळी दिली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मागील तीन महिन्यांत एप्रिल ते जून अखेर या वेबपोर्टलवर २ लाख ७२ हजार १६५ इतक्या इच्छुक उमेदवारांनी नोकरीसाठी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली.
ऑनलाईन मेळाव्यात ४० हजार जण सहभागी
जिल्हास्तरावर मागील तीन महिन्यांत २४ ऑनलाइन रोजगार मेळावे पार पडले आहेत. या मेळाव्यांमध्ये १६७ उद्योजकांनी सहभाग घेतला असून, १६ हजार ११७ जागांसाठी त्यांनी ऑनलाइन मुलाखती घेतल्या व ४०,२२९ तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २,१४० तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरू आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले.
सोर्स : सकाळ
I am Kamlesh R. Chaudhari
From – Jalgaon (MS)
Qualification – M.pharmacy ( Quality assurance Dept. )
I also search job in Pharmaceutical Industry.
Working interest – Quality assurance Dept.
Regulatory affairs Dept.
MI purnata berojgar houn Baslo majha javal 11year cha experience aahe tari mala noukrui Nahi milat aahe 1.5year pasun job shodhato majhe iti fitter aahe
I’m glass toughened process furness machine operator…. 8 year experience.. Iti pass.. ncvt pass …job pahijay
सर्व आपन चुकीची माहिती देऊन बेरोजगारांची फसवूनक करत आहात.. ही आकडेवारी सरासरी चुकीची दाखवत आहात.
Mala job pahije computer course zala ahe purn typing 30,40, English Marathi tally zali mscit zali ahe graduation pan zala ahe .