सतरा हजार बेरोजगारांची नोंदणी – लॉकडाउनमध्येही रोजगार ‘अनलाॅक’

Maharashtra Job Fair 2020

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, असे असतानाही गेल्या तीन महिन्यांत कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाइन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. या कालावधीत विभागाच्या विविध व्यासपीठांवर एक लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी नोंदणी केली असून, या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

Maharashtra-Rojgar-Melava-2020.jpg

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले असून, त्यावर बेरोजगार उमेदवार नोंदणी करत आहेत; तर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्‌स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजकांमध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती मलिक यांनी यावेळी दिली.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मागील तीन महिन्यांत एप्रिल ते जून अखेर या वेबपोर्टलवर २ लाख ७२ हजार १६५ इतक्‍या इच्छुक उमेदवारांनी नोकरीसाठी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली.

ऑनलाईन मेळाव्यात ४० हजार जण सहभागी

जिल्हास्तरावर मागील तीन महिन्यांत २४ ऑनलाइन रोजगार मेळावे पार पडले आहेत. या मेळाव्यांमध्ये १६७ उद्योजकांनी सहभाग घेतला असून, १६ हजार ११७ जागांसाठी त्यांनी ऑनलाइन मुलाखती घेतल्या व ४०,२२९ तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २,१४० तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरू आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले.

सोर्स : सकाळ


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. Jagatp Kishor ramnath says

    Mala bhi job pahije ex army hu

  2. प्रवीण कांबळे says

    मला काम पयजा

  3. Vishal dalvi says

    Mla job pahije 12th pass

  4. Vishal khatal says

    Mala job haway

  5. Naresh pobatti says

    Civil engineer job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड