Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालकांची पदे भरण्याची मागणी – Granthpal Bharti Maharashtra 2024

Granthpal Bharti Maharashtra 2024

Granthpal Bharti Maharashtra 2024 – अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील अत्यंत महत्वाचे व एकाकी असलेले प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती विविध कारणांनी रेंगाळली आहे. या पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरु करावी, अशी मागणी राज्याच्या उच्च शिक्षण संचालकांकडे एका निवेदनातून महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाने केली आहे. कोविड संसर्गाच्या पृष्टभूमिवर पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. २५ मार्च २०२३ रोजी शासनाने पदभरतीचा शासन निर्णय काढून २०१७ पर्यंतच्या ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांची २२३ पदे भरण्यास मंजुरी दिली. मात्र, २०१७ च्या नंतर रिक्त पदे भरण्यास नाही. तसेच, २०१७ पूर्वीच्या मंजूर पदांची भरतीही विविध कारणांनी दीड वर्षापासून रेंगाळली आहे असे त्या निवेदनात नमूद आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

नॅक मूल्यांकन व इतर मूल्यांकन समितीच्या दृष्टीने महाविद्यालयात कायमस्वरूपी ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक असणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक महत्वाची भूमिका बजावतात. मात्र, महाविद्यालयातील एवढे महत्वाचे पद चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिली आहेत. राज्यातील २००१ पूर्वीच्या विनाआनुदानीत ७८ महाविद्यालयांना अनुदान मिळावे यासाठी २० वर्षापासून या महाविद्यालयातील कर्मचारी संघर्ष करीत आहेत. राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना पत्र देऊन राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील आतापर्यंत रिक्त ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती तातडीने करावी व २००१ पूर्वीच्या विनाआनुदानीत महाविद्यालयांना अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे.

प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक ही पदे महाविद्यालयातील प्राचार्य खालोखाल अत्यंत महत्वाची आहेत. महाविद्यालयात ही एकाकी पदे असून, पदे रिक्त आहे. याची उच्च शिक्षण मंत्र्यांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे. या पदांची भरती प्राचार्य पदाच्या भरतीप्रमाणे करावी. ज्या महाविद्यालयामध्ये पद रिक्त होईल, त्या महाविद्यालयाला पदभरतीसाठी तातडीने विना अट परवानगी द्यावी.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड