Granthpal Bharti Maharashtra 2026- राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदे भरण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने कार्यवाही सुरू केली आहे. उच्च शिक्षण संचालनालयाने विभागीय सहसंचालकांना यासंदर्भात आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले असून २०१७ नंतर रिक्त असलेल्या या पदांच्या भरतीची प्रक्रिया लवकर मरू होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांमधील ग्रंथालय व क्रीडा विभागाचे कामकाज अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील अत्यंत महत्वाचे व एकाकी असलेले प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती विविध कारणांनी रेंगाळली आहे. या पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरु करावी, अशी मागणी राज्याच्या उच्च शिक्षण संचालकांकडे एका निवेदनातून महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाने केली आहे. कोविड संसर्गाच्या पृष्टभूमिवर पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. २५ मार्च २०२३ रोजी शासनाने पदभरतीचा शासन निर्णय काढून २०१७ पर्यंतच्या ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांची २२३ पदे भरण्यास मंजुरी दिली. मात्र, २०१७ च्या नंतर रिक्त पदे भरण्यास नाही. तसेच, २०१७ पूर्वीच्या मंजूर पदांची भरतीही विविध कारणांनी दीड वर्षापासून रेंगाळली आहे असे त्या निवेदनात नमूद आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव रेड्डी, संचालक डॉ. देवळाणकर यांचे अ.भा. राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने या पदभरतीमध्ये स्पष्ट उल्लेख नसल्याचे निदर्शनास आणून दिले. उच्च शिक्षण राष्ट्रीय सचिव प्रा. प्रदीप खेडकर यांनी आभार व्यक्त केले आहेत नॅक मूल्यांकन व इतर मूल्यांकन समितीच्या दृष्टीने महाविद्यालयात कायमस्वरूपी ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक असणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक महत्वाची भूमिका बजावतात. मात्र, महाविद्यालयातील एवढे महत्वाचे पद चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिली आहेत. राज्यातील २००१ पूर्वीच्या विनाआनुदानीत ७८ महाविद्यालयांना अनुदान मिळावे यासाठी २० वर्षापासून या महाविद्यालयातील कर्मचारी संघर्ष करीत आहेत. राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना पत्र देऊन राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील आतापर्यंत रिक्त ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती तातडीने करावी व २००१ पूर्वीच्या विनाआनुदानीत महाविद्यालयांना अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे.
प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक ही पदे महाविद्यालयातील प्राचार्य खालोखाल अत्यंत महत्वाची आहेत. महाविद्यालयात ही एकाकी पदे असून, पदे रिक्त आहे. याची उच्च शिक्षण मंत्र्यांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे. या पदांची भरती प्राचार्य पदाच्या भरतीप्रमाणे करावी. ज्या महाविद्यालयामध्ये पद रिक्त होईल, त्या महाविद्यालयाला पदभरतीसाठी तातडीने विना अट परवानगी द्यावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















